Agrowon Podcast : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनमध्ये चढ उतार

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात चढ उतार दिसत आहेत. ब्राझीलमध्ये यंदा उत्पादनात मोठी वाढ झाली.
Soybean Rate
Soybean RateAgrowon

१) कापूस भाव दबावातच (Cotton Rate)

देशातील बाजारात कापूस दर दबावात आहेत. बाजारातील आवकेचा दबाव कायम असल्यानं दरपातळी स्थिर आहे. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील बाजारात दैनंदीन आवक सरासरीपेक्षा खूपच जास्त आहे.

एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात गेल्या हंगामात सरासरी ३० हजार गाठी आवक होती. ती सध्या १ लाख ३० हजार ते १ हजार ४५ हजार गाठींच्या दरम्यान होतेय. त्यामुळं दरपातळी सरासरी ७ हजार ८०० ते ८ हजार ४०० रुपयांदरम्यान दिसते. बाजारातील आवक पुढील काळात कमी होऊन दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

२) तुरीतील तेजी कायम (Tur Rate)

देशातील बाजारात तुरीची आवक कमी आहे. त्यामुळं तुरीच्या दरात मोठी तेजी आली. डाळीचेही भाव प्रतिकिलो १२० ते १३० रुपयांच्या दरम्यान पोचले. तर बाजारातील दर ८ हजार ते ८ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान आहेत.

बाजारातील तुरीचे दर कमी होत नाही म्हटल्यावर सरकार आता स्टाॅकमधील तूर बाजारात विकण्याचा विचार करत आहे. नाफेडकडील तूर लवकरच बाजारात येऊ शकते, असा अंदाजही व्यक्त केला जातो. पण यंदा पुरवठा कमी असल्यानं तुरीचे दर तेजीतच राहू शकतात, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

३) काबुली हरभरा भाव टिकून (Chana Rate)

देशातील बाजारात सध्या काबुली हरभऱ्याचे भाव टिकून आहेत. शेतकऱ्यांच्या काबुली मालाला सध्या बाजारात सरासरी ७ हजार ते १० हजार रुपयांपर्यंत दर मिळतोय. यंदा देशातील काबुली हरभरा उत्पादनात घट झाल्याचं शेतकरी सांगत आहेत.

तर दुसरीकडे निर्यातीसाठी मागणी टिकून आहे. त्यामुळं काबुली हरभऱ्याचे दरही ऐन अवकेच्या हंगामात स्थिर आहेत. काबुलीचे दर पुढील काळातही टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

Soybean Rate
Chana Market : नाफेडने आतापर्यंत किती हरभरा खरेदी केला?

४) द्राक्षाला सरासरी भाव (Grape Rate)

मागील काही दिवसांमध्ये झालेल्या वादळी पाऊस आणि गारपीटीने द्राक्ष पिकाला मोठा तडाखा दिला. वादळी पावसामुळं काही भागातील द्राक्ष बागा आडव्या झाल्या. तर गारपीटीने तडे गेले. गुणवत्ता खालवलेल्या द्राक्षाला ३० रुपयांपर्यंतही दर मिळत नाहीत.

निर्यतक्षम, गणवत्तेच्या द्राक्षाला ७० ते ९० रुपयांपर्यंत दर मिळत असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. द्राक्षचा बाजार पुढील काही दिवस कायम राहू शकतो, असं व्यापाऱ्यांनी सांगितलं.

५) सोयाबीन दराची स्थिती काय आहे? (Soybean Rate)

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात चढ उतार दिसत आहेत. ब्राझीलमध्ये यंदा उत्पादनात मोठी वाढ झाली. अर्जेंटीनात मात्र उत्पादन कमी झालं. पण ब्राझीलनं ती कसर भरून काढली. अर्जेंटीनात उत्पादन कमी झाल्यानं येथील बाजारात दर सुधारले.

शेतकऱ्यांनी आणखी दरवाढीच्या अपेक्षेने सोयाबीन मागं ठवेलं होतं. परिणामी अर्जेंटीनातील उद्योगांना सोयाबीनची टंचाई भासत होती. त्यामुळं अर्जेंटीना सरकारने सोयाबीनसाठी सोयाडाॅलर धोरण जाहीर केलं. अर्जेंटीनाचे चलन पेसो आहे.

Soybean Rate
Soybean Cotton Market : कापूस, सोयाबीन, मक्याची आवक घटली; कांद्याचे दर अजूनही दबावात

सध्या २१७ पेसो प्रतिडाॅलर असा विनिमय दर आहे. पण अर्जेंटीनाने सोयाबीनसाठी ३०० पेसो प्रतिडाॅलर असा विनियम दर जाहीर केला. यामुळं शेतकरी सोयाबीन विकत असून आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडचा पुरवठा वाढत आहे.

परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात चढ उतार होत आहेत. आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे १५ डाॅलर प्रतिटनांवर होते. तर सोयापेंडचे वायदे ४२३ डाॅलर प्रतिटनांवर होते. आंतरराष्ट्रीय बाजारात मागील काही दिवसांपासून चढ उतार दिसत आहेत.

पण देशातील बाजारात ५ हजार ते ५ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान दर आहेत. सोयाबीनची आवक जवळपास २ लाख क्विंटलच्या दरम्यान आहेत. सोयाबीनची आवक कायम असल्यानं दर वाढीवर दबाव आहे. पण सरासरी दरपातळी कायम आहे. तर आवक मर्यादीत झाल्यानंतर दरात सुधारणेचा अंदाज आहे, असे सोयाबीन बाजारातील अभ्यासाकांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com