Top 5 News: हमीभावाने हरभरा खरेदीची स्थिती काय?

खुल्या बाजारात हरभरा दर हमीभावापेक्षा कमी असल्याने नाफेडच्या खरेदीला शेतकऱ्यांचा प्रतिसाद
हरभरा खरेदी
हरभरा खरेदीAgrowon

1. सूर्य तळपल्याने राज्यात उन्हाचा चटका असह्य होत आहे. विदर्भात तापमानाचा पारा ४५ अंशांपार गेल्याने उष्णतेची लाट (Heat Wave) आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत विदर्भातील ब्रह्मपुरी येथे उच्चांकी ४६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उद्या विदर्भात उष्ण लाट कायम राहणार आहे. आग्नेय मध्य प्रदेशापासून विदर्भ, तेलंगणा, रायलसीमा, तमिळनाडू पर्यंत हवेचा कमी दाबाचा (Low pressure) पट्टा सक्रिय आहे. यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत असून, उद्यापासून मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा अंदाज (Rain Possibility) हवामान विभागाने वर्तविला.

2.राज्यात चालूवर्षी उन्हाळ कांदा लागवडी (Summer Onion Sowing) मोठ्या प्रमाणावर वाढल्या. डिसेंबर व जानेवारी महिन्यात झालेल्या कांदा लागवडी एकसोबतच काढणीसाठी आल्या आहेत. त्यानंतर कांदा पोसण्याच्या अवस्थेत मार्च महिन्यापासून तापमानात सातत्याने वाढ झाली. त्यामुळे कांदा काढणीसाठी मजुरांची उपलब्धता (Labor availability) कमी आहे. परिणामी चालूवर्षी कांदा काढणीचा खर्च (Onion harvest cost) ३० टक्क्यांनी वाढला. शेतकऱ्यांना कांदा काढणीसाठी ९ हजारांपासून ते ११ हजार रुपयांपर्यंत खर्च करावा लागत आहे. मात्र खर्चाच्या तुलनेत दर मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.

हरभरा खरेदी
विजेत्या २४ स्टार्टअप्सना मिळणार १५ लाखंची वर्क ऑर्डर

3.देशात यंदा ऊस लागवड (Sugarcane planting) वाढली होती. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला चांगला दर (Sugar Rate) मिळत आहे. त्यामुळे देशातून निर्यात वाढली. परिणामी यंदा देशातील कारखान्यांनी साखर निर्मितीला पसंती दिली. इस्माच्या (ISMA) मते देशात हंगाम सुरु झाल्यापासून म्हणजेच १ ऑक्टोबर पासून १५ एप्रिलपर्यंत ३३० लाख टन साखर निर्मिती झाली. याच काळात मागील वर्षी २९२ लाख टन साखर हाती आली होती. म्हणजेच यंदा साखर उत्पादनात ३८ लाख टनांची वाढ झाली. त्यातच सध्याही आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे देशातून आणखी निर्यात वाढू शकते, असे जाणकारांनी सांगितले.

4. मागील वर्षभरापासून जागतिक खाद्यतेल बाजारात (Edible Oil Market) उलथापालथ सुरु आहे. कोरोनाकाळात पामतेलासह (Palm Oil) इतर खाद्यतेलांचे घटलेले उत्पादन असो किंवा रशिया-युक्रेन (Russia-Ukraine War) युद्धामुळे ठप्प झालेली सूर्यफुल तेल (Sunflower Oil) निर्यात असो, अशा अनेक कारणांनी खाद्यतेल दरात जणू फोडणीच मिळाली. त्यात भर घातली ती इंडोनेशियाच्या पामतेल निर्यातबंदीने. २०२२ चाच विचार केला तर जानेवारीपासून युद्ध आणि इंडोनेशियाची पामतेल निर्यातबंदी हे महत्वाचे घटक ठरले. यामुळे खाद्यतेलाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले. २०२१ मध्ये कच्च्या पामतेलाचा दर १२०० डाॅलर प्रतिटन होता. तो मार्च २०२२मध्ये १९०० डाॅलरपर्यंत पोचला. याचा थेट फटका ग्राहकांना बसत आहे.

हरभरा खरेदी
आगुदर पोटाची लढाई जिकु...

5. देशात सध्या हरभरा बाजार (Chana Market) दबावात आहे. उत्पादन सरकारच्या अंदाजापेक्षा कमी राहणार असल्याचं यापुर्वीच व्यापारी आणि उद्योगाने स्पष्ट केलं. मात्र देशातील मागणी आणि पुरवठ्याचे गणित बघता बाजार दबावात दिसतोय. यंदा सरकारने हरभऱ्यासाठी ५ हजार २३० रुपये हमीभाव जाहिर केला. मात्र खुल्या बाजारात दर ४ हजार ५०० ते ५ हजार १०० रुपयांपर्यंत मिळले. त्यामुळे सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांनी नाफेडला (Nafed) विक्री केली. यंदा नाफेडच्या खरेदीला वेग आला. खुल्या बाजारात सुर्वसाधारण दर ५ हजार १०० रुपयांपर्यंत पोचल्यास शेतकरी व्यापाऱ्यांनाच माल विकली. मात्र दर अद्यापही कमीच आहेत. त्यामुळे नाफेडला विक्री वाढली, असे जाणकारांनी सांगितले. नाफेडच्या आकडेवारीनुसार देशात ३० एप्रिल २०२२ पर्यंत ९ लाख ३० हजार टन हरभरा खरेदी झाली होती. यात सर्वाधिक वाटा गुजरातचा होता. येथे नाफेडने ४ लाख २१ हजार टन खरेदी केली. तर महाराष्ट्रात ३ लाख ९३ हजार टन हरभरा शेतकऱ्यांनी नाफेडला विकला. नाफेडच्या खरेदीत गुजरात आणि महाराष्ट्र ही दोनच राज्ये मुख्य ठरली. सध्या कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातही हरभरा खरेदी सुरु झाली. पुढील काळात येथील खरेदी वाढू शकते. तर इतर खरेदी संस्थांनी १ लाख टनांच्या दरम्यान खरेदी केली आहे. त्यामुळे देशात एप्रिल महिन्यापर्यंत देशात हमीभावाने खरेदीचा आकडा १० लाख टनांच्या पुढे गेला आहे. यामुळे हरभरा उत्पादकांना काही अंशी दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com