Soybean : सोयाबीन बाजारातील स्थिती काय?

देशात सध्या सोयाबीन लागवडीने वेग घेतला आहे. आत्तापर्यंत ७० लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. यंदाही गेल्यावर्षीऐवढी लागवड होईल, असा दावा सोपाने केला.
Soybean
Soybean Agrowon

आजचं मार्केट बुलेटीन. दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी.

खरिपातील मुगाला हमीभावापेक्षा १५०० रुपयांपर्यंत कमी दर

देशात खरिपाच्या पेरण्यांनी आता वेग घेतला आहे. खरिपातील पिकांपैकी मूग (Green Gram) आणि उडिद ही पिके लवकर शेतकऱ्यांच्या हाती येतात. तर गुजरातमध्ये खरिपात लवकर लागवड झालेला मूग बाजारात येत आहे. यंदा केंद्र सरकारने मुगासाठी ७७५५ रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहिर केला. मात्र गुजरातमध्ये खुल्या बाजारात सध्या मुगाला हमीभावापेक्षा एक हजार ते १५०० रुपये कमी दर मिळत आहे. त्यामुळे सरकारने येथे हमीभाव खरेदीची प्रक्रिया सुरु केली असून २१ जुलैपासून खरेदी सुरु होईल. यामुळे शेतकऱ्यांना मुगासाठी किमान हमीभाव तरी मिळेल, आणि शेतकऱ्यांचे नुकसान टळेल.

Soybean
शिंदखेडा तालुक्यात उंदरांकडून मुग, मका, कापसाचे नुकसान

तुरीची लागवड यंदा २८ टक्क्यांनी घटली

मागील हंगामात कडधान्याला (Pulses) हमीभावापेक्षाही कमी दर मिळाला. त्यामुळे चालू खरिपात तुरीही इतर कडधान्याची लागवड (Pulses Sowing) कमी होईल, असा अंदाज व्यक्त होत होता. त्यातच यंदा पावसाने दडी दिली. त्यामुळे लागवडी उशीरा सुरु झाल्या. खरिपात तूर लागवडीखालील क्षेत्रात सध्या घट दिसतेय. आजपर्यंत म्हणजेच ८ जुलैपर्यंत देशातील तूर लागवड गेल्यावर्षीच्या तुलनेत २८.६ टक्क्यांनी घटली. मागीलवर्षी ८ जुलैपर्यंत देशात २३ लाख २२ हजार हेक्टर क्षेत्र तूर लागवडीखाली आले होते. मात्र यंदा केवळ १६ लाख ५८ हजार हेक्टरवर तूर लागवड झाली. ही स्थिती अशीच राहिली तर यंदा देशात तुरीचे उत्पादन कमी होऊ शकते. दुसरीकडे बाजारातील आवक कमी झाल्यामुळे तुरीचे दर काहीसे सुधारले आहेत.

Soybean
Tur Rate : तूर दरवाढीचा लाभ कुणाला?

साखर निर्यातकोटा न वाढविल्याने उद्योगातून नाराजी

मे महिन्याच्या अखेरीस साखर निर्यातीवर (Restriction On Sugar Export) केंद्राने निर्बंध आणले. जूनच्या पहिल्या आठवड्यात ऑनलाइन आलेल्या अर्जांमधील मागणीच्या केवळ ४० टक्के साखर निर्यातीस परवानगी दिली होती. सहा जूनला आठ लाख टन साखर निर्यात करण्याला मंजुरी दिली. व ही साखर एक महिन्यात निर्यात करावी, असेही म्हटले होते. केंद्राच्या सूचनेनुसार ही साखर सहा जुलैपर्यंत निर्यात होणे अपेक्षित होते. मात्र पावसाळी परिस्थिती व अन्य कारणांमुळे निर्यातीत अडथळे आले. म्हणून ही साखर २० जुलैपर्यंत निर्यात करण्यास केंद्राने मुदतवाढ दिली आहे. परंतु नव्याने निर्यातीसाठी परवानगी न मिळाल्याने साखर उद्योगात नाराजी असल्याचे सूत्रांनी सांगितले. केंद्राने साखर निर्यातीचा कोटा वाढवून दिला असता तर दरवाढीला मदत मिळाली असती, असे जाणकारांनी सांगितले.

Soybean
Sugar Export: अतिरिक्त साखर निर्यातीला हिरवा कंदील?

भारताची तांदूळ निर्यात यंदा घटली

भारत जगातील जवळपास १५० देशांना तांदूळ निर्यात (Rice Export) करतो. परंतु एकूण निर्यातीपैकी ५७ टक्के निर्यात ही नेपाळ, बेनीन, बांगलादेश, सेनेगल, टोगो, कोटे डी आयव्हरी, गिनी, मलेशिया, इराण, संयुक्त अरब अमिराती या देशांना होते. सध्याच्या अन्नधान्य टंचाईच्या काळात इतर देश धान्याचा साठा करत असताना भारत मात्र निर्यात करतोय. २०१९-२० च्या तुलनेत २०२०-२१ मध्ये तांदूळ निर्यात ८७ टक्क्यांनी वाढली. मात्र २०२१-२२ मध्ये पुन्हा कमी झाली. सध्या भारतातही तांदळाचा साठा कमी झालाय. त्यातच खरिपात लागवडी उशीरा सुरु झाल्या. देशातून तांदूळ निर्यात अशीच सुरु राहिली तर दर वाढू शकतात. त्यामुळे सरकार निर्यातबंदी करु शकते, असा अंदाज व्यक्त होतोय.

सोयाबीन बाजारातील स्थिती काय?

यंदा जून महिन्यात माॅन्सून चांगला बरसला नाही. त्यामुळे सोयाबीनची पेरणी (Soybean Sowing) रखडत झाली. मात्र जुलैमध्ये पेरण्यांनी वेग घेतला. सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया (Soybean Processors Association Of India) अर्थात सोपाच्या मते देशात आत्तापर्यंत ७० लाख हेक्टरवर पेरणी झाली. यात मध्य प्रदेशात ३० लाख ५० हजार हेक्टर तर महाराष्ट्रात २६ लाख हेक्टरवर सोयाबीन पेरा झाला. तर राजस्थानमध्ये ७ लाख हेक्टरवर पीक आहे. देशात मागील हंगामात १२० लाख हेक्टर क्षेत्र सोयाबीनखाली होते. यंदाही पेरा या पातळीपर्यंत वाढू शकते, असा विश्वास सोपाने व्यक्त केला. सोयाबीन लागवडीसाठी देशात पुरेसे बियाणे आणि खते उपलब्ध आहेत. त्यामुळे पुढील आठवडाभरात सोयाबीन पेरणी गतीने होईल, असा विश्वास सोपाचे कार्यकारी संचालक बी.एन पाठक यांनी व्यक्त केला. पाठक यांच्या मते देशात चालू हंगामातील सोयाबीनचा मोठा साठा शिल्लक आहे. चालू हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीन रोखल्याने दर तेजीत होते. मात्र आता दर नरमले आहेत.

केंद्राने यंदा सोयाबीनसाठी ४३०० रुपये हमीभाव जाहिर केला. परंतु सध्या बाजारात सोयाबीनला ६ हजार ते ६ हजार ३०० रुपये दर मिळत आहे. म्हणजेच हमीभावापेक्षा ५० टक्के अधिक दर बाजारात सोयाबीन मिळतोय. यंदा सोयाबीन लागवडीला उशीर होतोय. तसेच पुढील काळात हवामान कसे राहते, यावर देशातील सोयाबीन उत्पादन अवलंबून आहे. परंतु सध्या दर पुढील काही महिने टिकून राहील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com