Soybean Rate : सोयाबीन दराचा कल काय?

देशातील बहुतांशी भागांमध्ये सोयाबीन काढणी सुरु झाली आहे. मात्र पावसामुळे काही ठिकाणी सोयाबीन काढणीच्या कामात अडथळे येत आहेत. तर बाजारात सोयाबीन आवक वाढल्यानंतर दर कमी होऊ शकतात, असे काहीजण सांगत आहेत.
Rate stable for soybeans
Rate stable for soybeans

कापसाचे दर टिकून

1. देशात सध्या कापूस बाजारात चढ-उतार सुरु आहेत. त्यामुळं उद्योगांकडून अजून मोठी खरेदी सुरु झालेली नाही, असं जाणकारांनी सांगितलंय. उद्योग कापूस खरेदीसाठी दर स्थिर होण्याची वाट बघत आहेत. कापसाचे दर स्थिरावल्यानंतर मोठे उद्योग कापूस खरेदीत उतरतील. सध्या कापसाला प्रति क्विंटल किमान ७ हजार ५०० ते १० हजार रुपये सरासरी दर मिळतोय. उद्योगांकडून कापूस खरेदी वाढल्यानंतर कापसाला सरासरी ९ हजार रुपयांचा दर मिळू शकतो. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन कापसाची विक्री करावी, असं आवाहन जाणकारांनी केलयं.

Rate stable for soybeans
Soybean Rate : सोयाबीन उत्पादकतेला सततच्या पावसाचा फटका

टोमॅटो दरात तेजी

2. बाजारात टोमॅटो दरातील तेजी कायम आहे. पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळं टोमॅटो पिकाचं मोठं नुकसान झालं. त्यामुळं बाजारातील आवक सध्या कमी आहे. राज्यातील पुणे, मुंबई आणि नागपूर या बाजार समित्यांमधील आवक ही सरासरी एक हजार क्विंटलपेक्षा अधिक आहे. मात्र इतर बाजारांमधील आवक ही ५० क्विंटलपेक्षाही कमी होतेय. त्यामुळं दर तेजीत आहेत. सध्या टोमॅटोला प्रतिक्विंटल २ हजार ते ३ हजार ५०० रुपये दर मिळतोय. टोमॅटोचे दर पुढील काही दिवस टिकून राहतील, असं भाजीपाला व्यापाऱ्यांनी सांगितलं.

Rate stable for soybeans
Banana Rate : केळी उत्पादकांची लूट सुरुच

केळीचे दर दबावात

3. बाजारात सध्या केळीचे दर दबावात आहेत. केळीला मागणी नाही, दर्जा खराब असल्याचं कारण सांगून व्यापारी शेतकऱ्यांना वेठीस धरत असल्याची तक्रार शेतकरी करत आहेत. तिकडं बाजार समित्या केळीला १२०० ते १३०० रुपये प्रतिक्विंटलचा दर जाहीर करतात. पण व्यापारी या दरात खरेदी करत नाहीत. जाहीर दराऐवजी व्यापारी केळीला केवळ १ हजार ते ११०० रुपये दर देतात. त्यामुळं केळी उत्पादक अडचणीत आहेत. मात्र पुढील काळात केळी दर काहीसे सुधारु शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

वांग्याच्या दरात वाढ

4. राज्यात वांग्याचे दर वाढलेले आहेत. सध्या बाजारातील आवक कमी आहे. राज्यातील सर्वच बाजार समित्यांमधील वांग्याची आवक घटलेली आहे. त्यातच मागणी मात्र टिकून आहे. त्यामुळं वांग्याच्या दरात मागील काही दिवसांमध्ये वाढ झालेली दिसून आली. सध्या वांग्याला किमान २ हजार ५०० रुपये दर मिळतोय. तर कमाल दर ६ हजार रुपयांचा मिळतोय. वांगी दरातील तेजी पुढील काही दिवस टिकून राहील, असा अंदाज भाजीपाला व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.

सोयाबीन दराचा कल काय?

5. राज्यात आणि देशातील अनेक भागांत सध्या सोयीबन पीक काढणीला (Soybean Harvesting) आलंय. मात्र पावसामुळं काढणीच्या कामाचा खोळंबा होतोय. पावसामुळं शेतात हार्वेस्टर घालण्यास शेतकरी इच्छूक दिसत नाहीये. सध्या पावसाचा जोर कमी असला तरी लगेच काढणी केल्यास पिकाचं नुकसान (Soybean Crop Damage) होऊ शकतं. त्यामुळं शेतकरी कोरड्या वातावरणातच काढणीचं काम करत आहेत. एरव्ही सोयाबीन आवकेचा (Soybean Arrival) हंगाम सुरु होण्यापुर्वी सोयाबीनचे दर (Soybean Rate) सुधारलेले असतात. तर बाजारात सोयाबीनची आवक दाटल्यानंतर दर नरमतात. मात्र यंदा उलटं चित्र दिसलं. खाद्यतेल बाजारातील परिस्थितीनुसार सोयाबीनचाही बाजार बदलत गेला. यंदा हंगामाच्या आधीच सोयाबीन नरमलं.

मागील हंगामात सोयाबीनला सरासरी ७ हजार रुपये दर मिळाला. मात्र शेवटच्या तीन महिन्यांमध्ये दराने ५ हजार रुपयांची पातळी गाठली. त्यामुळं बाजारात सोयाबीन आवक वाढल्यानंतर दरात आणखी घसरण होऊ शकते, असा अंदाज काही जणांकडून वर्तविला जातोय. मात्र जाणकारांच्या मते सोयाबीनला सरासरी ५ हजार रुपये दर मिळू शकतो. सध्या बाजारात सोयाबीनची प्रत आणि ओलावा यानुसार ४ हजार ६०० ते ५ हजार १०० रुपये दर मिळतोय. यंदा बाजारात आवक वाढली तरी दर यापेक्षा जास्त कमी होणार नाहीत. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री केल्यास फायदेशीर ठरेल, असंही जाणकारांनी सांगितलं.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com