Tur Rate : तुरीचा दर काय राहू शकतो?

सध्या तुरीच्या दरातील तेजी कमी झाली. देशात तुरीचा पुरवठा कमी असतानाही दर कमी झाले. तर चालू हंगामातही तूर उत्पादन घटण्याची शक्यता आहे. मात्र सरकारच्या स्टाॅक लिमिटच्या भीतीमुळं दर दबावात आल्याचं व्यापाऱ्यांंचं म्हणण आहे.
tur rate
tur rateagrowon

हिरव्या मिरचीचे दर सुधारण्याची शक्यता

1. हिरव्या मिरचीला सध्या चांगला दर मिळतोय. राज्यात मिरची पीक घेणाऱ्या जिल्ह्यांमध्येपाऊस आणि कीड-रोगानं पिकाचं नुकसान झालं. त्यामुळं बाजारातील आवक सध्या कमी आहे. पुणे आणि मुंबई या बाजार समित्यांमध्ये आवक जास्त दिसत असली तरी दरही अधिक आहेत. सध्या मिरचीला सरासरी प्रतिक्विंटल ४ हजार ते ५ हजार रुपये दर मिळतोय. पुढील काळात सणांमुळे मिरचीला मागणी वाढेल. मात्र पुरवठा तुलनेत कमी राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे हिरव्या मिरचीच्या दरात सुधारणा होऊ शकतो, असं जाणकारांनी सांगितलं.

tur rate
Sweet Orange : मोसंबी फळगळीवर उपाययोजना

मोसंबीचे दर अद्यापही दबावातच

2. बाजारात मोसंबीची आवक कमी असूनही दर दबावात आहेत. मोसंबीचं सर्वाधिक उत्पादन मराठवाड्यात होतं. मात्र यंदा चालू बहारामधील उत्पादन जवळपास निम्म्यावर आलं. तर पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळं फळांची गुणवत्ताही खालावली. गुणवत्तापूर्ण फळांची उपलब्धता कमी आहे. मात्र तरीही या फळांना चांगला दर मिळत नाहीये. बदलत्या वातावरणामुळं सध्या मोसंबीला मागणी कमी आहे. त्यामुळं मोसंबीला प्रतिक्विटंल सरासरी ३ हजार ते ४ हजार ५०० रुपये दर मिळतोय. गणेशोत्सव आणि सणांच्या काळात मागणी वाढून दर सुधारु शकतात, असं जाणकारांनी सांगितलं.

tur rate
Onion : नगर जिल्ह्यात पंचवीस-तीस लाख टन कांदा चाळीत पडून

कांद्याला मिळतोय कमी दर

3. कांदा दरावरील दबाव अद्यापही कायम आहे. राज्यातील महत्वाच्या लासलगाव, मालेगाव, पिंपळगाव, येवला, पुणे आणि मुंबई या बाजार समित्यांमध्ये कांदा आवक अधिक होतेय. सध्या उन्हाळ, पांढरा आणि लाल कांदा बाजारात येतोय. आवकेचा दबाव असल्यानं दर दबावात असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. राज्यात सध्या कांद्याला सरासरी प्रतिक्विंटल ७०० रुपये ते १४०० रुपये दर मिळतोय. तर कमाल दर १८०० रुपयांपर्यंत मिळाला. एक ते दीड महिन्यानंतर बाजारात कांदा आवक कमी होऊन दर सुधारू शकतात. त्यामुळं सध्याच्या दरात क्विंटलमागे ३०० रुपयांपर्यंत सुधारणा होईल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

tur rate
Green Chili : मिरची आगार संकटातच

4. सणासुदीचे दिवस तोंडावर असतानाही बेदाण्याचा बाजार मात्र अद्याप सुस्तच आहे. यंदाच्या हंगामात बाजार कोसळल्याने बऱ्यापैकी द्राक्ष बेदाण्याला गेली. यंदा सोलापूर जिल्ह्यात सुमारे ५० हजार टन, सांगली ४० हजार टन आणि नाशिक जिल्ह्यात ३० हजार टन बेदाणा तयार. राज्यात अद्यापही ६० हजार टन बेदाण्याची विक्री बाकी आहे, असं सूत्रांनी सांगितलं. सणांमुळे बेदाण्याला मागणी वाढते. मात्र यंदा अजूनही उठाव मिळाला नाही. उलट गतवर्षीच्या तुलनेत ५ ते १० टक्क्यांनी दरात चढ-उतार सुरु आहे. सध्या बेदाण्याला प्रतिकिलोला कमाल २०० ते २३० रुपये इतका दर मिळतोय. पुढील काळात मागणी वाढल्यास दरात किलोमागं २० ते ३० रुपयांपर्यंत सुधारणा होऊ शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

तुरीचा दर काय राहू शकतो?

5. तुरीच्या दरातील (Tur Rate) तेजी कमी झाली आहे. सध्या देशात तुरीची उपलब्धता खूपच कमी आहे. बाजार समित्यांमधील आवकही (Tur Arrival) घटली. गुणत्तेच्या तुरीचा पुरवठाही (Tur Supply) हळूहळू कमी होतोय. मात्र मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असतानाही स्टाॅक लिमिटच्या ()Stock Limit भीतीमुळं बाजार दबावात असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. जाणकारांच्या मते, सध्या देशात केवळ ६ लाख टन तुरीचा साठा (Tur Stock) उपलब्ध आहे. तर नवीन तूर बाजारात येईपर्यंत देशाला ११ ते १२ लाख टन तुरीची आवश्यकता असेल. या काळात आफ्रिकेमध्येच तूर उपलब्ध असेल. त्यामुळं आफ्रिकेतून आयात केली जाईल. मात्र आफ्रिकन तुरीला कमी मागणी असते. अनेक राज्यांमध्ये आफ्रिकन तूर खाल्ली जात नाही.

सध्या आफ्रिकेत तुरीचे दर घसरले आहेत. याचाही परिणाम देशातील दरावर झाल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. दुसरीकडं बर्मा देशात तुरीचा साठा कमी आहे. त्यामुळं बर्मात तुरीचे दर तेजीत आहेत. परिणामी याचा देशातील बाजाराला आधार मिळतोय. तर देशात यंदा तुरीची लागवड कमी झाली. त्यामुळं उत्पादनही कमीच राहण्याचा अंदाज आहे. बाजारातील परिस्थिती पाहता नवीन माल बाजारात येईपर्यंत ८ हजार ५०० ते ९ हजार रुपये दर राहू शकतात, असा अंदज जाणकारांनी व्यक्त केला. सध्या तुरीला ७ हजार ते ७ हजार ५०० रुपये दर मिळतोय. तर पुढील महिनाभरात तुरीच्या दरात ३०० रुपयांपर्यंत सुधारणा होऊ शकते. सरकारनं स्टाॅक लिमिट लावलं तरी तुरीचा सध्याचा भाव जास्त दबावात येणार नाही, असं जाणकारांनी सांगितलं.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com