भारतानं तांदूळ निर्यातबंदी केली तर काय होईल?

जागतिक पातळवीर सध्या तांदळाची टंचाई भासत आहे. जागतिक तांदूळ बाजारात भारताचा वाटा ४० टक्के आहे. भारताने गहू निर्यातबंदी केल्यानंतर तांदूळ निर्यातीवर बंधने येण्याची भीती व्यक्त होत आहे.
भारतानं तांदूळ निर्यातबंदी केली तर काय होईल?
Rice Export Agrowon

आजचं मार्केट बुलेटिनः दिवसभरातील पाच महत्त्वाच्या घडामोडी.

१. भारताची गहू निर्यात ७० लाख टनांवर पोचणार

निर्यातबंदीपूर्वी केलेले गहू निर्यातीचे (whet Export) करार, सरकारी पातळीवरील निर्यात आणि अन्नसुरक्षा (Food Security) धोक्यात असलेल्या देशांना निर्यात करण्याची भारतानं तयारी दाखवलीये. त्यामुळं निर्यातबंदी (Export Ban) असतानाही चालू आर्थिक वर्षात भारताची गहू निर्यात (India's Wheat Export) ७० लाख टनांवर पोचेल, असा अंदाज संयुक्त राष्ट्रांच्या फूड अँड ॲग्रीकल्चर ऑर्गनायझेशन अर्थात एफएओनं व्यक्त केलाय. तर २०२१ च्या जागतिक गहू उत्पादनात गेल्या हंगामाच्या तुलनेत ०.८ टक्क्यांनी घटण्याचा अंदाजये. यंदा ७७१ दशलक्ष टन गहू उत्पादन हाती येईल, अशी शक्यताये. मागील चार वर्षात गहू उत्पादनातील ही पहिलीच घटये. त्यामुळं गव्हाचे दर (Wheat Price) वाढलेत, असंही एफएओनं आपल्या अहवालात म्हटलंय. एफएओच्या या अहवालानंतर गव्हाचे दर तेजीत राहण्याचा अंदाज जाणकार व्यक्त करतायेत.

२. मे महिन्यातील ट्रॅक्टर विक्री ८ टक्क्यांनी घटली

देशांतर्गत ट्रॅक्टरच्या विक्रीत एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात ८ टक्क्यांची घट झालीये. देशांतर्गत विक्री घटली तरी मासिक आणि वार्षिक आकडेवारीनुसार ट्रॅक्टर निर्यातीत वाढ दिसून आलीये. ट्रॅक्टर अँड मेकॅनायझेशन असोसिएशनच्या आकडेवारीनुसार, मे २०२२ मध्ये देशभरात ८१ हजार ९४० ट्रॅक्टर्स विकल्या गेले. एप्रिल २०२२ मध्ये ८९ हजार २०१ ट्रॅक्टर्सची विक्री झाली होती. मागीलवर्षी मे मध्ये ट्रॅक्टर विक्री ५५ हजार ६०९ वर पोचली होती. मागील वर्षभरात समाधानकारक पीक उत्पादन, सरासरी माॅन्सून आदी कारणांमुळं एप्रिल २०२२ मध्ये ट्रॅक्टरची चांगली विक्री झाल्याचं या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितलं.

३. केंद्राने ४४ हजार टन हरभरा खरेदीला परवानगी देण्याची मागणी

राज्य सरकारने पाठविलेला हरभरा उत्पादनाचा अंदाज आणि केंद्र सरकारची आकडेवारी यात तफावतये. त्यामुळं ३० मे रोजी देण्यात आलेल्या मुदतवाढीत ८. २० लाख टनांऐवजी ७. ७६ लाख टन हरभरा खरेदीसाठी परवानगी देण्यात आली. त्यामुळं राज्य सरकारला अपेक्षित असलेली ४४ हजार टन खरेदी होऊ शकली नाही. परिणामी, १८ जूनपर्यंत मुदतवाढ देऊनही वाढीव कोटा लगेच पूर्ण झाल्याने हरभरा खरेदी ठप्प झालीये. त्यामुळं हरभरा खरेदी पुन्हा सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी राज्य सरकारनं केंद्रीय कृषी विभागाकडं केलीये. या संदर्भात सहकार विभागाचे अपर प्रधान सचिव अनुपकुमार यांनी पत्र पाठविलंय. आणखी ४४ हजार टन हरभरा खरेदी करण्यास परवानगी द्यावी, यासाठी ते प्रयत्न करत आहेत.

४. टंचाईमुळे केळीला मिळतोय विक्रमी दर

सध्या राज्यात मध्य प्रदेशच्या बऱ्हाणपूर भागात कापणी योग्य केळी कमी प्रमाणातये. यावर्षी केळीची मागणी उत्तर भारतातील बाजारपेठेमध्ये बऱ्यापैकी टिकूनये. सध्या केळीची कापणी इतकी कमी झाली आहे की सावदा रेल्वेस्थानकातून दररोज भरून जाणारा रेल्वे केळी रॅक आता एक दिवसाआड जातोय. उत्तर भारतातील श्रीनगर, पुलवामा, पठाणकोट या ठिकाणी चांगल्या दर्जाच्या केळीला मोठी मागणीये. कागदी खोक्यात पॅकिंग करून ट्रकमधून ही केळी पाठवली जातेय. उत्कृष्ट केळीची मागणी हरियाना आणि पंजाबमध्ये देखील वाढली. या सर्व भागांत पाठविल्या जाणाऱ्या केळीला २ हजार ते २१०० रुपयांपेक्षा जास्त भाव व्यापाऱ्यांकडून दिला जातोय.

५. भारतानं तांदूळ निर्यातबंदी केली तर काय होईल?

चीननंतर तांदळाचा सर्वाधिक वापर भारतामध्ये होतो. जगाच्या एकूण तांदूळ व्यापारात भारताचा वाटा ४० टक्केये. भारतानं २०२१ मध्ये विक्रमी २१५ लाख टन तांदूळ निर्यात केला होता. २००७ मध्ये भारताने जेव्हा तांदूळ निर्यात बंद केली. तेव्हा जागतिक बाजारात तांदुळाच्या किमती आभाळाला भिडल्या होत्या. त्यामुळं प्रमुख तांदूळ निर्यातदार देश म्हणून भारताच्या हालचालीकडे जगाचं लक्ष असतं. भारत जगभरातील १५० देशांना तांदळाची निर्यात करतो. युद्ध आणि उत्पादन घटीनं जगभरात अन्नटंचाई तीव्र झालीये. त्यामुळं अनेक देशांना महागाईचा सामना करावा लागतोय. अशातच केंद्र सरकारनं गहू निर्यातीबंदी केल्यानंतर तांदूळ निर्यातीवरही मर्यादा येईल अशी भिती होती. त्यामुळं व्यापाऱ्यांनी तांदूळ खरेदी वाढवली आणि दीर्घ मुदतीच्या डिलिव्हरीसाठी करार सुरु केलेय. परंतू जाणकारांच्या मते, सध्या देशात तांदळाचे दर कमीये आणि सरकारी गोदांमध्ये तांदळाचा मोठा साठाये. सध्या देशात सरकारी गोदामांमध्ये तांदळाचा ५७८.२ लाख टन साठाये. त्यामुळं भारत इतर देशांच्या तुलनेत कमी दरात तांदूळ निर्यात करतोय. तसेच निर्यात केल्या जाणाऱ्या तांदळाचे दरही मागील पाच वर्षातल्या नीचांकी पातळीवर आहेत. मागणीही चांगलीये. त्यामुळं भारत तांदूळ निर्यातीवर बंधने आणण्याची शक्यता कमीचये, असं जाणकारांनी सांगितलंय. भारतानं तांदूळ निर्यातबंदी केल्यास इतर निर्यातक देश दर वाढवतील. याचा फटका तांदूळ टंचाई भासत असलेल्या देशांना होऊ शकतो. जागतिक तांदूळ बाजार भारताच्या निर्यात धोरणावर अवलंबूनये, असं जाणकारांनी सांगितलं.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com