Turmeric : भारतीय हळदीला का वाढतेय मागणी?

जागतिक पातळीवर हळद उत्पादनात (India's Turmeric Production) भारत, चीन आणि म्यानमार हे महत्वाचे देश आहेत. मात्र मागील तीन वर्षांपासून भारताच्या हळदीला मागणी (Turmeric Demand) वाढली आहे. चालू वर्षात भारतातून विक्रमी हळद निर्यातीची शक्यता आहे.
Turmeric
TurmericAgrowon

देशात यंदाही खतांचा असंतुलित वापर

शेतकरी खरिपासाठी एप्रिल महिन्यापासूनच खतांची खरेदी सुरु करतात. यंदा एप्रिल ते जून या तीन महिन्यांत देशातील खतांची खरेदी वाढली. यंदा खतांचा वापर गेल्यावर्षीपेक्षा २१ टक्क्यांनी अधिक झालाय. परंतु खतांचा समतोल वापर झालेला नाही. युरियाचा वापर २५ टक्के अधिक राहिला. तर डीएपी खतांचा मागणी ७० टक्क्यांनी वाढली. दुसरीकडं एमओएपी खतांची मागणी मात्र २० टक्क्यांनी घटलीय. तर संयुक्त खतांचाही वापर १४ टक्क्यांनी कमी राहिला. यावरून खरिपात खतांचा असंतुलित वापर झाल्याचं दिसून येतं. त्यामुळं पिकांच्या उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

Turmeric
Soybean : पामतेल नरमल्याचा सोयाबीनवर परिणाम होणार?

पामतेल दरातील घसरण कायम

इंडोनेशियात पामतेलाचा साठा वाढलाय. त्यातच इंडोनेशियाने ऑगस्ट महिन्यासाठी पामतेल निर्यातीवरील शुल्क कमी केले. त्याचा परिणाम मलेशियाच्याही पामतेल बाजारावर होतोय. आंतरराष्ट्रीय बाजारात पामतेलाचा पुरवठा वाढलाय. मात्र मागणी कमी झाली. त्यामुळं दर नरमले आहेत. सध्या बुर्सा मलेशिया एक्सचेंजवर ऑक्टोबरचे वायदे ३ हजार ६४६ रिंगीट प्रति टन या दराने झाले. रिंगीट हे मलेशियाचं चलन आहे. डाॅलरमध्ये हा दर ८१८ डाॅलर होतो. मात्र हा दर विक्रमी दरापेक्षा ४० टक्क्यांनी कमी आहे. पुढील काळत पामतेलाचे दर ३ हजार ते ४ हजार १०० रिंगीटच्या दरम्यान राहू शकतात, असं जाणकारांनी सांगितलं.

Turmeric
शेतकरी नियोजन पीक: हळद

कमी पावसामुळे अन्नधान्य पिकांचा पेरा कमी

देशात माॅन्सून दाखल झाल्यानंतर खरिपाच्या पेरण्यांना वेग येतो. जुलै महिन्यातील पाऊस खरीप पिकांसाठी महत्वाचा असतो. मात्र जुलैमध्ये देशात असमान पाऊस पडला. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या मते उत्तर प्रदेशात ६८ टक्के कमी पाऊस पडला. तर झारखंडमध्ये ५१ टक्के , बिहारमध्ये ४९ टक्के आणि मणिपूरमध्ये ४० टक्के कमी पाऊस झाला. त्यासोबतच त्रिपुरा, पश्चिम बंगाल, उत्तराखंड आदी राज्यांत पावसाचं प्रमाण कमी राहिलं. कमी पावसाचा भातासह इतर पिकांच्या पेरणीवर परिणाम होतोय. देशात आतापर्यंत एकूण अन्नधान्य पिकांचा पेरा साडेचार टक्क्यांनी कमी झालाय. त्यामुळे अन्नधान्य उत्पादनावर परिणाम होऊ शकतो, असं जाणकारांनी सांगितलं.

अमेरिकेत मका पिकाला अति उष्णतेचा फटका

जगात मका पुरवठ्यात अमेरिका आघाडीवर आहे. अमेरिका अनेक देशांना मका निर्यात करते. पण यंदा कमी पाऊस आणि अति उष्णतेचा फटका मका पिकाला बसतोय. सध्या अमेरिकेत मका पीक वाढीच्या अवस्थेत आहे. काही भागांत मक्याच्या कणसांमध्ये दाणे भरत आहेत. अमेरिकेतील महत्वाच्या १८ राज्यांमध्ये ६१ टक्के पीक चांगल्या अवस्थेत आहे. तर १४ टक्के पिकाची स्थिती चांगली नाही, असं अमेरिकेच्या कृषी विभागानं म्हणजे यूएसडीएनं सांगितलंय. त्यामुळं यंदा अमेरिकेतील मका उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. अमेरिकेत मका उत्पादन किती राहतं, त्याचा जगभरातील मक्याच्या दरावर परिणाम होईल, असं जाणकारांनी सांगितलं.

भारतीय हळदीला का वाढतेय मागणी?

जगात भारत हळद उत्पादनात (Turmeric Production) आघाडीवर आहे. एकूण जागतिक उत्पादनात (India's Turmeric Production) भारताचा वाटा तब्बल ८० टक्क्यांवर आहे. त्यानंतर चीन ८ टक्के उत्पादन करतो. तर म्यानमार ४ टक्के, नायजेरिया ३ टक्के आणि बांगलादेशचा ३ टक्के वाटा आहे. भारतातील हळदीची गुणवत्ता आणि दर्जा चांगला असतो. त्यामुळे तिला जगात मोठी मागणी असते. कोरोना महामारीनंतर रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी हळदीचा मोठा बोलबोला झाला. त्यामुळे जगभरात हळदीचा वापर वाढलाय. त्यामुळं भारताची हळद निर्यातही वाढलीय.

भारत बांगलादेश, आखाती देश, दुबई, युरोपियन युनियन, युनायटेड अरब अमिराती आणि मोरोक्को आदी देशांना हळद निर्यात करतो. मागील वर्षात भारतातून १ लाख ५३ हजार टन हळदीची निर्यात झाली होती. तर २०२०-२१ मधील निर्यात १ लाख ८३ हजार टनांवर पोहोचली होती. कोरोनाकाळात वाढलेल्या मागणीमुळे विक्रमी निर्यात शक्य झाली. मागील तीन वर्षांपासून हळदीची मागणी वाढलेली आहे. ती कायम राहण्याचा अंदाज व्यक्त होतोय. २०२२-२३ मध्ये भारताची हळद निर्यात २ लाख टनांपर्यंत पोहोचेल, असा जाणकारांचा अंदाज आहे. हळदीची निर्यात वाढल्यास देशांतर्गत बाजारातही त्याचा परिणाम दिसेल. हळीदाला उठाव वाढल्याने दराला आधार मिळेल. हळदीचे दर मागील काही महिन्यांपासून स्थिरावले आहेत, असं जाणकारांनी सांगितलं.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com