Potato Rate : बटाट्याचे दर का वाढले ?

पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, पंजाब आणि गुजरात या महत्वाच्या बटाटा उत्पादक राज्यांमध्येही दर तेजीत आहेत. देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या बटाटा उत्पादक पश्चिम बंगालमध्ये दर गेल्यावर्षीपेक्षा ६० टक्क्यांनी अधिक आहेत.
Potato
PotatoAgrowon

राज्यात मोसंबी दर दबावातच

राज्यात सध्या मोसंबीची काढणी सुरु आहे. पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळं यंदा आधीच कमी फळं लागली. त्यातच सध्या होत असलेल्या पावसाचाही फटका मोसंबी पिकाला बसतोय. दुसरीकडं बाजारात मोसंबीला उठाव कमी मिळतोय. पावसाळी आणि थंड वातारणामुळं मोसंबीला मागणी काहिशी कमी आहे. परिणामी मोसंबी दरावर दबाव आलाय. राज्यात सध्या मोसंबीला ३००० ते ४००० रुपये दर मिळतोय. मोठ्या शहरांतील बाजारात दर जास्त असला तरी उत्पादक पट्ट्यात मात्र दर दबावातच आहेत. वातावरण चांगलं होऊन बाजारात मागणी वाढत नाही तोपर्यंत मोसंबी दर दबावात राहण्याची शक्यता आहे, असं जाणकारांनी सांगितलं.

Potato
Cotton Boll Worm : यंदाही कापूस पीक बोंड अळीच्या संकटात

कापसाचे दर तेजीतच राहणार

सध्या कापसाची टंचाई असल्यानं दर तेजीत आहेत. बाजार समित्यांतील आवक नगण्य असून १० हजार ८०० रुपयांपर्यंत दर मिळतोय. तर एमसीएक्सवरील ऑगस्टच्या वायद्यांनी ५० हजारांचा टप्पा पार केलाय. शुक्रवारी ऑगस्टचे वायदे ५० हजार ५४० रुपये प्रतिगाठीने पार पडले. तर सीबाॅटवर कापूस ११५.८० सेंट प्रतिपाऊंडने विकला गेला. हा दर नवीन आवक होईपर्यंत कायम राहण्याची शक्यता व्यक्त होतेय. पण यंदा कापूस लागवड वाढली मात्र नुकसान वाढलंय. त्यामुळं उत्पादन गेल्यावर्षीएवढंच होईल, असा अंदाज व्यक्त होतोय. असं झाल्यास कापसाचे दर तेजीतच राहतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

Potato
तूर, उडीद आणखी भाव खाणार का?

यंदा उडीद भाव खाण्याची शक्यता

देशात यंदा उडदाची पेरणी मागील वर्षीपेक्षा ५.१० टक्क्यांनी कमी झाली. तर मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रात जुलै आणि ऑगस्टमध्ये झालेल्या पावसानं पिकाला फटका बसला. तर उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्येही काही भागांमध्ये कमी पावसामुळं पिकाचं नुकसान झालं. त्यामुळं व्यापारी, मिल्स आणि उद्योगही यंदा उत्पादनात घट होण्याचा अंदाज गृहीत धरूनच व्यवहार करत असल्याचं जाणकारांनी सांगितलं. त्यातच भारताला उडदासाठी जास्त पर्याय नाहीत. भारताला म्यानमार हाच प्रमुख उडीद पुरवठादार देश आहे. बर्मामधूनही काही प्रमाणात आयात होते. त्यामुळं उत्पादनात जास्त घट झाल्यास उडीद दराला आधार मिळेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

Potato
Maize : मका तेजीतच राहणार?

मक्याचे दर टिकून राहणार

देशात सध्या मागणीच्या तुलनेत मक्याचा पुरवठा कमी आहे. तसचं खरिपातील पिकाचंही पावसामुळं नुकसान होतंय. उत्तर भारतातील काही मका उत्पादक राज्यांमध्ये कमी पावसाचाही फटका पिकाला बसतोय. त्यामुळं खरिपातील मका उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यातच सध्या मक्याला मागणी आहे. त्यामुळं बाजारात मक्याचे दर तेजीत आहेत. राज्यातील बाजारात मक्याला २४०० ते २९०० रुपये दर मिळतोय. खरिपातील उत्पादन हाती येईपर्यंत मक्याचा पुरवठा वाढणार नाही. त्यामुळं पुढील काळात मक्याच्या दरात आणखी वाढ होऊ शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

बटाट्याचे दर का वाढले ?

सध्या बाजारात बट्याचा पुरवठा (Potato Supply) कमी आहे. पश्चिम बंगालमध्ये यंदा बटाटा उत्पादन (Potato Production) घटलं. पश्चिम बंगाल हे बटाटा उत्पादनात (Bengal Potato Production) देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. पश्चिम बंगालमध्ये देशातील एकूण उत्पादनापैकी २३ टक्के उत्पादन होतं. पश्चिम बंगालमधील बटाटा उत्पादन गेल्यावर्षीच्या ११० लाखनांवरून यंदा ८५ लाख टनांवर आलंय. यापैकी ६१ लाख टन बटाटा गोदामांमध्ये साठवलेला आहे. या गोदामांमधून आतापर्यंत केवळ ३२ टक्के माल बाजारात आलाय. एरव्ही गोदामांमध्ये एकूण उत्पादनाच्या केवळ ४० टक्के माल साठवला जातो. व या काळापर्यंत तो बाजारात येतो. मात्र यंदा कमी उत्पादन आणि वाढते दर (Potato Rate) यामुळं बटाट्याची साठेबाजी वाढली. त्यामुळं महत्वाच्या उत्पादक पश्चिम बंगालमध्येच बटाट्याचे दर वाढले आहेत.

पश्चिम बंगालमधील घाऊक बाजारात सध्या २१ ते २३ रुपये प्रतिकिलोने बटाट्याचे व्यवहार होत आहेत. हे दर मागीलपर्षीच्या तुलनेत ६० टक्क्यांनी अधिक आहेत. त्यामुळं उत्तर प्रदेश, पंजाब आणि गुजरात या बटाटा उत्पादक राज्यांमध्ये दर सुधारले. सध्या या राज्यांमध्ये बटाट्याचे घाऊक दर १६ ते १८ रुपये प्रतिकिलोवर आहेत. राज्यातही बटाट्याला प्रतिक्विंटल १७०० ते २१०० रुपये दर मिळतोय. बाजारात आवक वाढल्यास दर कमी होतील. मात्र उत्पादन घटल्यानं बटाटा दर पुढील काही दिवस तरी तेजीत राहतील, असं जाणकारांनी सांगितलं.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com