Chana Rate : काबुली हरभरा यंदा फायदेशीर ठरेल का?

देशात सध्या काबुली हरभऱ्याची टंचाई जाणवत आहे. त्यातच काबुली हरभऱ्याला मागील काही महिन्यांपासून मागणी वाढली. आता सण आणि रबीच्या पेरणीला बियाण्यासाठी काबुली हरभऱ्याला उठाव मिळतोय.
Chana Rate
Chana RateAgrowon
Chana Rate
Soybean Conclave : सोयाबीनसाठी मध्यप्रदेशने सर्वंकष धोरण ठरवावे

सोयाबीन स्थिरावलं

1. सोयाबीनचा बाजारभाव मागील आठवडाभरापासून एका भावपातळीभोवती फिरत आहेत. देशातील महत्वाच्या बाजारपेठांमध्ये सोयाबीनची आवक आता वाढतेय. तर पावसानं पिकाचं नुकसान वाढलंय. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसामुळं सोयाबीन पिकाला फटका बसतोय. तर नव्या मालामध्ये ओलावा अधिक येतोय. सध्या नव्या सोयाबीनला सरासरी ४ हजार ३०० ते ४ हजार ७०० रुपये दर मिळतोय. तर जुन्या सोयाबीनचे सरासरी ५ हजार रुपयांनी व्यवहार होत आहेत. यंदाच्या हंगामात सोयाबीनला किमान ५ हजारांचा दर मिळेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

तुरीच्या दरात तेजी

2. तुरीच्या बाजारात मागील आठवडाभरात २०० रुपयांपर्यंत सुधारणा झाली. सणांमुळं बाजारात तुरीला उठाव वाढलाय. मात्र पुरवठा तुलनेत कमीच आहे. तुरीची आयात सुरु असूनही पुरवठा कमी पडतोय. पुढील महिन्यापासून नवी तूर बाजारात येईल. मात्र आवकेचा दबाव येण्यास वेळ लागेल. तोपर्यंत सध्या उपलब्ध तुरीवरच गरज भागवावी लागेल. सध्या तुरीला प्रतिक्विंटल ७ हजार ते ७ हजार ७०० रुपये दर मिळतोय. पुढील काळात तुरीचे दर आणखी सुधारण्याची शक्यता, व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

हिरव्या मिरचीचे दर टिकून

3. बाजारात सध्या हिरव्या मिरचीला चांगला दर मिळतोय. हिरव्या मिरचीच्या दरातील तेजी मागील दोन महिन्यांपासून टिकून आहे. यंदाच्या पावसाळ्यात काही दिवस सतत पाऊस झाले. त्यामुळं मिरची पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. परिणामी बाजारातील आवक मर्यादीत राहीली. दुसरीकडं मागणी मात्र कायम आहे. त्यामुळं हिरव्या मिरचीला सरासरी प्रतिक्विंटल ३ हजार ते ५ हजार रुपये दर मिळतोय. हिरव्या मिरचीचे हे दर पुढील काही दिवस टिकून राहतील, असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय.

Chana Rate
Soybean Cotton : पावसाच्या शक्यतेमुळे शेतकरी चिंतातूर

कापूस दरात चढ-उतार

4. मागील हंगामापासून कापसाच्या वायद्यांमध्ये फार मोठे चढ-उतार आले. वायद्यांमध्ये कापूस दरात स्थिरता दिसली नाही. मार्च २०२१ मध्ये एमसीएक्सवर कापसाचे दर प्रतिखंडी ४२ हजार रुपयांवर होते. एक कापूस खंडी ३५६ किलो रुईची असते. कापसाचे वायदे जुलै २०२२ मध्ये १ लाख ५ हजारांवर पोचले. त्यानंतर २९ सप्टेंबरला ६३ हजार आणि आज ७१ हजार रुपयांवर स्थिरावले. बाजार समित्यांमधील दर मात्र काहीसे स्थिर दिसले. सध्या कापसाला सरासरी ८ हजार ते १० हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. कापसाला यंदा सरासरी ९ हजार रुपयांचा दर मिळू शकतो. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन कापूस विक्री करावी, असं आवाहन जाणकारांनी केलयं.

काबुली हरभरा यंदा फायदेशीर ठरेल का?

5. देशभरात सध्या खरिप पिकांची काढणी (Chana Harvest) जोमात सुरु आहे. खरिपाची पिकं काढल्यानंतर शेतकरी रबीच्या लागवडीची (Rabi Sowing) तजवीज करत आहेत. देशात रबी हंगामात हरभरा पीक (Chana Crop) महत्वाचं असतं. पण मागील वर्षभरापासून हरभरा दर (Chana Rate) दबावात आहेत. मात्र काबुली हरभरा भाव खातोय. वर्षभरात काबुली हरभऱ्याचे दर तेजीत होते. त्यातच मागील काही दिवसांपासून काबुली हरभऱ्याला सणांमुळं मागणी वाढली. परिणामी काबुली हरभऱ्याचे दर तेजीत आहेत.

सध्या काबुली हरभऱ्याला प्रतिक्विंटल ८ हजार १० हजार रुपये दर मिळतोय. मात्र पुढील काळातही काबुली हरभरा भाव खाण्याची शक्यता आहे. सणांनंतर देशात लग्न समारंभाचा काळ सुरु होतो. तसचं मागील वर्षभर दर तेजीत राहिल्यानं यंदा काबुली हरभऱ्याची लागवड १० ते १५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं पुढील काळात काबुली हरभऱ्याला बियाणे आणि प्रक्रियेसाठी उठाव राहीलं. तर दुसरीकडं पुरवठा कमी होतोय. नवा काबुली हरभरा फेब्रुवारी २०२३ नंतरच बाजारात येईल. त्यामुळं पुढील काळात काबुली हरभऱ्याचे दर १२ हजारांचाही टप्पा गाठू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय. तरीही रब्बीच्या पेरणीसाठी स्थिती कशी राहील? त्यातच पिकाला पोषक वातावरण राहील का ? यावरच काबुली हरभऱ्याचा बाजार ठरेल, असं जाणकारांनी सांगितलं.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com