Chana Rate : हरभरा दरात सुधारणा होईल का ?

देशात सध्या हरभऱ्याचा बाजारभाव दबावात आहे. सध्या हरभरा पेरणीसाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये पेरण्या वेग घेण्याचा अंदाज आहे.
Chana  Rate
Chana RateAgrowon

सोयाबीनमध्ये ओलावा जास्त

1. बाजारात सोयाबीन दर सध्या स्थिर दिसत आहेत. अद्यापही सोयाबीनमध्ये ओलावा जास्त दिसतोय. त्यामुळे ओलावा आणि गुणवत्तेप्रमाणं सोयाबीनला बाजारात दर मिळतोय. जास्त ओलावा आणि काडी-कचरा असलेल्या सोयाबीनला ४ हजार २०० रुपयांपासून ४ हजार ६०० रुपये दर मिळतोय. तर एफएक्यू दर्जाच्या सोयाबीनचे व्यवहार प्रतिक्विंटल ४ हजार ७०० ते ५ हजार १०० रुपयांच्या दरम्यान होत आहेत. सोयाबीनला महिनाभर ५ हजार ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊनच विक्री करावी, असं आवाहन जाणकारांनी केलंय.

Chana  Rate
Cotton Market : कापूस बाजार अद्यापही दबावात का?

कापसाचा बाजार सुधारु शकतो

2. सुतगिरण्यांकडून सध्या कमी उठाव असल्याने कापसाचा बाजार दबावात असल्याचे सध्या सांगितले जाते. सध्या कापसाला अगदी ६ हजार रुपयांपासून ८ हजार ५०० रुपयांपर्यंत दर मिळतोय. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. मात्र जाणकारांच्या मते, सध्या शेतकऱ्यांच्या घरात कापूस आल्याने व्यापारी कमी भावात खरेदी करण्याचा प्रयत्न करतील. पण शेतकऱ्यांनी दोन महिने वाट पाहिल्यास कापूस दरात सुधारणा होऊ शकते. शेतकऱ्यांना सरासरी ९ हजार रुपये दर मिळू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

तूर तेजीत राहणार

3. देशात तुरीचा तुटवडा असल्याने दर तेजीत आहेत. मात्र आफ्रिकेतील देशांमधून तूर आयात वाढत आहे. त्यामुळे तुरीच्या दरावर पुढील काळात दबाव राहील, अशा बातम्या येत आहेत. मात्र आफ्रिकेच्या तुरीला देशात जास्त पसंती मिळत नाही. तर देशी तूर आणि म्यानमारच्या लेमन तुरीची टंचाई आहे. त्यामुळे आफ्रिकेतून आयात वाढली तरी देशातील तुरीचे दर तेजीतच राहतील. सध्या तुरीला मिळणारा ७ हजार ते ८ हजार रुपयांचा दर कायम राहील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

Chana  Rate
Soybean Rate : सोयाबीन, कापूस, मक्याच्या आवकेत वाढ

हिरव्या मिरचीचे दर तेजीत

4. राज्यातील बाजारात सध्या हिरव्या मिरचीची आवक कमीच आहे. त्यामुळे मिरचीचे दर तेजीत आहेत. पुणे, मुंबई आणि नागपूर तसेच कोल्हापूर बाजारात हिरव्या मिरचीची आवक काहीशी जास्त दिसते. मात्र इतर बाजारांमधील आवक कमीच आहे. त्यामुळे हिरव्या मिरचीचे दर तेजीत आहेत. सध्या हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल २ हजार ७०० ते ४ हजार ५५० रुपये दर मिळतोय. हिरव्या मिरचीचे हे दर पुढील दोन महिने टिकून राहू शकतात, असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.

हरभरा दरात सुधारणा होईल का ?

5. देशात आता रब्बीच्या पेरण्या (Rabi Sowing) सुरु झाल्या. त्यातच यंदा २० ऑक्टोबरपर्यंत देशाच्या विविध भागांमध्ये पाऊस झाला. तसेच सध्या किमान तापमानतही घट झाली आहे. त्यामुळे हरभरा पेरणीसाठी (Chana Sowing) पोषक वातावरण आहे. देशासह राज्यात हरभरा पेरण्या सुरुही झाल्या. स्थिती पोषक असल्याने पेरण्या पुढील काही दिवसांमध्ये वेग घेण्याची शक्यता आहे. त्यातच सध्या नाफेड साठा (NAFED Chana Stock) कमी करण्यासाठी हरभऱ्याची विक्री (Chana Sale) करत आहे. त्यामुळे बाजार हरभऱ्याचा दबावातच आहे. त्यातच प्रक्रिया उद्योगाकडून उठाव कमी आहे.

पुढे डाळ आणि बेसनला मागणी येतेय त्याप्रमाणात उद्योग हरभरा खरेदी करत आहे. त्यामुळे बाजारात मोठी खरेदी होत नाही. त्याचा दबाव दरावर आहे. तर नाफेडही बाजारात दर वाढणार नाही, याची दक्षता घेत विक्री करताना दिसतेय. नाफेडला नवा हरभरा खरेदी करण्यासाठी गोदामे रिकामी करायची आहेत. त्यामुळे नाफेडची खरेदी सुरुच राहील, असा अंदाज व्यक्त केला जातोय. परिणामी बाजारावर पुरवठ्याचा दबाव असल्याने हरभरा दरात फार मोठे चढ-उतार होताना दिसत नाहीत. सध्या बाजारात हरभऱ्याला प्रतिक्विंटल ४ हजार २०० ते ४ हजार ७०० रुपये दर मिळतोय. हरभरा परेणी कशी राहते? त्याचाही दबाव हरभरा बाजारावर येऊ शकतो, असे जाणकारांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com