Cotton Market : कापसाचे दर आणखी वाढतील का?

बाजारातील सध्याची परिस्थिती पाहता दर किमान ५ हजार ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजार अभ्यासकांनी व्यक्त केलाय.
 Cotton Market
Cotton MarketAgrowon

देशातील बाजारात आजही कापसाच्या दरात (Cotton Rate) क्विंटलमागं १०० रुपयांची वाढ पाहायला मिळाली. आता कापसाचा किमान दर ८ हजार रुपयांवर पोचला. सरकीच्या दरातही सुधारणा झाली होती. मात्र तरीही बाजारातील आवक वाढलेली दिसली नाही. मग कापसाचे दर कितीवर पोचले? शेतकऱ्यांना कापसासाठी किती दर मिळू शकतो? पाहुयात बुलेटीनच्या शेवटी.  

 Cotton Market
Cotton Rate : कापसाची झळाळी कायम

1. सोयाबीनचे दर स्थिर

देशातील सोयाबीन बाजारात आज संमिश्र वातावरण राहीले. काही बाजारात आज सोयाबन दर नरमले होते. तर काही ठिकाणी दर स्थिर होते. प्रक्रिया प्लांट्सचे दर कमी झाल्याचा परिणाम बाजारावर जाणवला. आज सोयाबीनला सरासरी ५ हजार ३०० ते ५ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. बहुतेक शेतकरी सोयाबीनचा भाव सरासरी ६ हजार रुपये प्रतिक्विंटलवर जाण्याची वाट पाहत असल्याचं जाणवलं. बाजारातील सध्याची परिस्थिती पाहता दर किमान ५ हजार ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजार अभ्यासकांनी व्यक्त केलाय.
 

 Cotton Market
Cotton Rate : दोन ते तीन वेचण्यातच कपाशीची उलंगवाडी

2.  टोमॅटो दर दबावात

 बाजारात सध्या टोमॅटोचे दर दबावात आले आहेत. बदलत्या वातावरणात टोमॅटोला काहीसा कमी उठाव मिळत असल्याचं टोमॅटो व्यापाऱ्यांनी सांगितलं. तर दुसरीकडं काही प्रमाणात आवकही वाढली. त्यामुळं दर कमी झाल्याचं सांगितलं जातं. सध्या बाजारात टोमॅटोला प्रतिक्विंटल सरासरी १५०० रुपये ते २ हजार ३०० रुपये दर मिळतोय. टोमॅटोचे हे दर पुढील काही दिवस टिकून राहू शकतात, असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय. 

3. उडदाचे दर तेजीत

 देशात सध्या उडदाचे दर तेजीत आहेत. त्यामुळं नाफेड आयात उडदाची खरेदी करत आहे. परिणामी उडदाच्या दराला आधार मिळतोय. सध्या खरिपातील उडदाला ६ हजार ४०० ते ७ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. तर आयात उडदाचे दरही ८ हजार १५० रुपयांपर्यंत आहेत. परिणामी उडदाचे दर कमी होण्याची शक्यता कमीच असून दर टिकून राहतील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय. 

4. ज्वारी खातेय भाव

देशातील बाजारात सध्या ज्वारीचे दर तेजीत आहेत. खरिपात यंदा ज्वारीचं क्षेत्र काहीसं वाढलं होतं. मात्र पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा पिकावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. त्यामुळं उत्पादन काहीसं कमी राहीलं. तर दुसरीकडं रब्बीतील ज्वारी पेरणी आता सुरु झाली. बाजारात सध्या ज्वारीची आवकही कमी दिसतेय. त्यामुळं मालदांडी ज्वारीला सरासरी ४ हजार ते ५ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. तर रब्बी ज्वारीला सरासरी ३ हजार ४ हजार २०० रुपये दर मिळतोय. ज्वारीचे दर टिकून राहू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय. 

5.  देशातील बाजारात सध्या कापसाची आवक कमी आहे. मात्र उद्योगांकडून कापसाला उठाव मिळतोय. त्यामुळं कापसाचे दर मागील काही दिवसांपासून वाढलेले दिसत आहेत. आजही काही बाजार समित्यांमध्ये कापसाच्या दरात क्विंटलमागं १०० रुपयांची सुधारणा पाहायला मिळाली. पण सर्वसाधारणपणे विचार केल्यास दर स्थिर दिसत होते. आज बहुतांशी राज्यातील कापसाचा किमान दर ८ हजार रुपयांवर पोचला होता. तर कमाल दरानं ९ हजार रुपयांचा टप्पा पार केला होता. सरकीच्या दरातही काही बाजारांमध्ये आज क्विंटलमागं सरासरी ५० रुपयांची सुधारणा झाली होती. सरकीचा किमान दर आता ३ हजार ७०० रुपयांवर पोचला. तर कमाल दरानं ४ हजारांची पातळी गाठली. काही बाजारांमध्ये ४ हजार ५०० रुपयांचा दर मिळाला. पण सरासरी दर यापेक्षा कमी होता. आज महाराष्ट्रातील कापसाचा दर सरासरी ८ हजार ते ९ हजार रुपयांच्या दरम्यान राहिला. तर गुजरातमध्येही सरासरी ८ हजार ते ९ हजार ३०० रुपयाने कापसाचे व्यवहार झाले. पंजाब, हरियाना, राजस्थान, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि कर्नाटकात याच दरम्यान कापसाचे व्यवहार झाले. बाजारात सध्या कापसाचे दर वाढत आहेत. मात्र त्या प्रमाणात आवक वाढलेली दिसत नाही. पुढील काही दिवस शेतकऱ्यांना कापसासाठी सरासरी ९ हजार रुपये दर मिळू शकतो. त्यामुळं बाजाराचा आढावा घेऊनच विक्री फायदेशीर ठरेल, असं आवाहन जाणकारांनी केलंय. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com