Cotton Rate : कापूस दर टिकतील का?

देशात सध्या कापूस सुताचे दर नरमले आहेत. सुताला अपेक्षेप्रमाणं मागणी वाढली नाही. त्यामुळं सूत आणि कापूस दरावर दबाव आलेला दिसतोय. त्यातच सध्या बाजारात कापूस आवक वाढत आहे. पुढील काळात कापूस आवक वाढल्यानंतर दर काहीसे दबावात येण्याची शक्यता आहे.
Cotton
CottonAgrowon

सोयाबीन दरात सुधारणा

1. देशातील सोयाबीन बाजारात सध्या काहीसे चढ-उतार होत आहेत. सोयाबीनचा नवा हंगाम आता सुरु झालाय. मात्र यंदा सोयाबीन आवक काहीशी उशीरा वाढेल. सध्या देशात किती सोयाबीन उत्पादन होईल, याबाबत निश्चिती नाही. त्यामुळं उद्योगाकडून सावध खरेदी सुरु आहे. परिणामी बाजारभावात काहीसे चढ-उतार होत आहेत. बाजारात सध्या सोयाबीनला प्रतिक्विंटल ४ हजार ९०० ते ५ हजार १०० रुपये दर मिळतोय. आज दरात १०० रुपयांची सुधारणा झालेली दिसली. यंदा शेतकऱ्यांना किमान ५ हजार रुपयांचा दर मिळेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

Cotton
Soybean Verity : पाण्याचा ताण सहन करणारी सोयाबीन जात विकसित

कांदा दर उत्पादन खर्चापेक्षा कमीच

2. कांदा दरात मागील आठवडाभरात काहीशी सुधारणा झाली. मात्र दर अद्यापही उत्पादनखर्चापेक्षा कमीच आहेत. जास्त तापमानामुळं चाळीत साठवलेल्या कांद्याचं नुकसान वाढलंय. त्यामुळं शेतकरी मिळेल त्या दरात कांदा विक्रीचा प्रयत्न करत आहेत. मात्र चांगल्या प्रतीच्या कांद्याला दरही चांगला मिळतोय. तर कांदा उपलब्धता कमी होत असल्यानंही दरात सुधारणा पाहायला मिळतेय. सध्या कांद्याला प्रतिक्विंटल ८०० ते १४०० रुपये दर मिळतोय. कांदा दरात आणखी काहीशी सुधारणा होऊ शकते, असं कांदा व्यापाऱ्यांनी सांगितलं.

Cotton
Onion Market : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करा

गावरचे दर तेजीत

3. बाजारात सध्या गवारला चांगला दर मिळतोय. गवारची आवक अद्यापही कमीच आहे. त्यातच पितृपक्षमुळे गवारली वाढलेली मागणी नवरात्रीत कायम राहीलेली दिसते. त्यामुळेही गवारचे दर तेजीत आहेत. राज्यातील मोठ्या बाजार समित्या वगळता आवक सरासरी १० क्विटंलपेक्षा कमीच होतेय. त्यामुळं गवारचे दर ४ हजार ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान पोचले. गवारचा हा दर टिकून राहील, असा अंदाज भाजीपाला व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.

झेंडूला नवरात्रीमुळं उठाव

4. नवरात्रीमुळं झेंडूच्या फुलांना मागणी वाढलेली आहे. झेंडूला गणपती उत्सवापासून उठाव मिळालाय. झेंडूची बाजारातील आवकही मर्यादीत होतेय. तर नुकतंच झेंडू उत्पादक काही भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळं पिकाचं काहीसं नुकसान झाल्याचंही शेतकऱ्यांनी सांगितलं. त्यामुळं दसऱ्याच्या काळात झेंडूची आवक अपेक्षेपेक्षा कमी राहण्याची शक्यता व्यक्त होतेय. सध्या झेंडूला ३ हजार ते ५ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. पुढील काळात झेंडूच्या दरात काहीशी सुधारणा होऊ शकते, असा अंदाज फूल बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.

कापूस दर टिकतील का?

5. देशातील कापूस सुताच्या दरात (Cotton Yarn Rate) पुन्हा घट पाहायला मिळाली. सुताला अपेक्षेप्रमाणं मागणी (Cotton Demand) वाढलेली नाही. त्यामुळं दर नरमले. पण सुताचे दर (Yarn Rate) कमी झाल्यानंतर या दरात मागणी वाढण्याची शक्यता असल्याचं काही जाणकारांच मत आहे. सध्या देशातील कापसाचे दर हे पाकिस्तानमधील दरापेक्षा कमी झाले आहेत. यामुळेही भारतीय कापूस आणि सुताला मागणी वाढू शकते. देशातील अनेक बाजारांमध्ये सध्या कापसाची आवक वाढत आहे. तर दरही काहीसे नरमले आहेत. उद्योगांनी यंदा कापूस उत्पादन वाढेल, असं म्हटलंय. मात्र शेतकऱ्यांच्या मते पिकाचं नुकसान जास्त असल्यानं उत्पादन गेल्यावर्षीएवढंच राहील.

दुसरीकडं कापड उद्योगात मागणी नव्हती. कपड्यांना मागणी कमी असल्यानं मागील महिन्यापर्यंत सुताला उठाव कमी होता. सुताला हळूहळू मागणी वाढतेय. मात्र मागणी अपेक्षेप्रमाणं वाढली नाही. त्यामुळं सुताचे दर दबावातच आहेत. पण आता कपड्यांना सणांमुळं उठाव वाढतोय. त्यामुळं नरमलेल्या दरात सुताला उठाव मिळू शकतो, असा अंदाज काही जाणकारांनी व्यक्त केलाय. सध्या कापसाचा दरही कमी झालेला आहे. देशात प्रतिखंडीचे भाव ६८ हजार ते ७१ हजार रुपयांवर पोचले आहेत. एक कापूस खंडी ३५६ किलो रुईची असते. तर कापसाला प्रतिक्विंटल ७ हजार ते १० हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. आवकेचा दबाव वाढल्यानंतर कापूस काही काळ नरमण्याची शक्यता असली तर यंदा शेतकऱ्यांना किमान ९ हजार रुपयांचा दर मिळेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com