Agrowon Podcast : हरभरा उत्पादकता घटल्याने दर वाढतील का?

सध्या हरभरा दराचा प्रश्न गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चीला जात आहे. सरकारने यंदा हरभऱ्याला प्रतिक्विंटल ५ हजार ३३५ रुपये हमीभाव जाहीर केला.
Agrowon Podcast
Agrowon PodcastAgrowon

१) सोयाबीन बाजार स्थिर (Soybean Rate)

आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात चढ उतार सुरु आहेत. आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे १५.०७ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडच्या वायद्याने ४८७ डाॅलरचा टप्पा गाठला होता. देशातील बाजारात सोयाबीनचे दर स्थिर आहेत.

आज सोयाबीनला सरासरी ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. तर प्रक्रिया प्लांट्सचे भाव ५ हजार ३०० ते ५ हजार ४५० रुपयांच्या दरम्यान होते.

बाजारातील आवक वाढल्यानं पुढील काही दिवस सोयाबीन दरपातळी स्थिर राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

२) कापसातील नरमाई कायम (Cotton Rate)

देशातील कापूस दरातील नरमाई आजही कायम होती. बाजारात कापूस आवक वाढली आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच कापूस आवक वाढली. त्यामुळे दरावर दबाव आला. सध्या दैनंदिन आवक सरासरी १ लाख ३० हजार ते १ हजार ६० हजार गाठींच्या दरम्यान होत आहे.

तर दरपातळी सरासरी ७ हजार ८०० ते ८ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान आहे. बाजारातील कापूस आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

३) डाळिंबाचे दर तेजीत (Pomegranate rate)

राज्यातील बाजारात सध्या डाळिंबाची आवक घटली आहे. राज्यातील मुंबई, नाशिक, पुणे आणि सोलापूर बाजारात सरासरी आवक २०० क्विंटलच्या दरम्यान दिसते. मात्र ही आवक सरासरीपेक्षा खपूच आहे. तर इतर बाजारांमधील आवक नगण्य आहे.

त्यामुळे डाळिंबाला सध्या प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार ते १० हजार रुपये भाव मिळत आहे. डाळिंबाची आवक कमी असल्याने हे दर टिकून राहतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

४) हिरव्या मिरचीला उठाव (Green Chill)

बाजारातील हिरव्या मिरचीची आवक मागील काही दिवसांपासून घटली आहे. त्यामुळे मिरचीला सध्या चांगला दर मिळत आहे. राज्यातील मोठ्या बाजार समित्या वगळता इतर बाजारातील आवक ही सरासरी ३० क्विंटलपेक्षा कमी आहे.

त्यामुळे सध्या हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल २ हजार ५०० ते ३ हजार रुपये दर मिळतोय. पुढील काळातही हे दर टिकून राहतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

Agrowon Podcast
Cotton Production : भारताचे कापूस उत्पादन ३१३ लाख गाठींपर्यंत घटले

५) उत्पादनातील घटीचा दराला आधार मिळेल का?

सध्या हरभरा दराचा प्रश्न गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चीला जात आहे. सरकारने यंदा हरभऱ्याला प्रतिक्विंटल ५ हजार ३३५ रुपये हमीभाव जाहीर केला. पण सध्या बाजारात हरभऱ्याला ४ हजार २०० रुपयांपासून ५ हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले.

सरकारने यंदा देशात विक्रमी हरभरा उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला. पण हरभरा उत्पादकता घटल्याचे शेतकरी सांगत आहेत. यंदा महाराष्ट्रात सर्वाधिक २९ लाख हेक्टरवर हरभरा लागवड झाली. पण मराठवाडा आणि विदर्भ या महत्वाच्या हरभरा उत्पादक विभागांमध्ये यंदा उत्पादकता कमी येत असल्याचे शेतकरी सांगत आहेत

हरभऱ्याच्या काही घाट्यांमध्ये दाणा भरला नाही. त्यामुळं उत्पादन घटल्याचे शेतकरी सांगत आहेत. यंदा उत्पादन २० टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचंही काही शेतकऱ्यांनी कळवलं. त्यामुळं यदा हरभरा उत्पादनाचा सरकारचा अंदाज चुकणार, असे व्यापारी आणि उद्योग सांगत आहेत.

देशात १५ मार्चपासून नाफेडची हरभरा खरेदी सुरु होणार आहे. नाफेड किती हरभरा खरेदी करणार याची आकडेवारी अद्याप आली नाही. पण उत्पादनात दिसणारी घट आणि नाफेडच्या खरेदीचा हरभरा दराला आधार मिळू शकतो, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com