हरभऱ्याला निर्यात अनुदान दिल्यास दर वाढतील?

देशात यंदा हरभऱ्याचे १३९ लाख टनांचे विक्रमी उत्पादन झाले. सरकराने मात्र २३ लाख टनांचीच खरेदी केली. त्यामुळे बाजारात सध्या हमीभावापेक्षा १००० रुपये कमी दर मिळत आहे. त्यामुळे सरकारने निर्यात अनुदान दिल्यास बाजारातही दर वाढतील, असे व्यापारी आणि निर्यातदारांनी म्हटले आहे.
हरभऱ्याला निर्यात अनुदान दिल्यास दर वाढतील?
Chana Agrowon

आजचं मार्केट बुलेटीन. दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी.

युक्रेनमध्ये वसंत ऋतुतील पेरणी आटोपली

युद्धाच्या झळा सहन करणाऱ्या युक्रेनमध्ये वसंत ऋतुतील पेरणी संपली आहे. येथे आता हिवाळी बार्ली पिकाची काढणी सुरु झाली. युक्रेनमध्ये यंदा १३४ लाख हेक्टरवर वसंत ऋतुतील पेरणी झाली. यात ४७ लाख हेक्टरवर सूर्यफुलाची लागवड झाली. सूर्यफुल हे वसंत ऋतुतील महत्वाचे पीक आहे. त्यानंतर ४६ लाख हेक्टरवर यंदा मका पेरला गेला. सोयाबीन लागवड यंदा मागीलवर्षीच्या तुलनेत कमी झाली. यंदा सोयाबीनखालील क्षेत्र १२ लाख हेक्टरवर पोचले. सोयाबीनसोबतच सूर्यफुलाची पेरणीही कमी झाली. त्यामुळे पुढील हंगामातही सूर्यफुल तेलाच्या उपलब्धतेविषयची चिंता व्यक्त होत आहे.

सुताचे दर किलोमागे ४० रुपयांपर्यंत नरमले

जागतिक अर्थव्यवस्था सध्या संकटातून जात आहे. त्याचा परिणाम शेतीमाल बाजारावरही होत आहे. चालू हंगामात आंतरराष्ट्रीय बाजारात भाव खाणाऱ्या कापूस दरावर या स्थितीचा परिणाम जाणवत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत घसरण होत असल्याने कापसाचे दरही कमी झाले. कारण सुताला उद्योगातून मागणी कमी झाली. त्यामुळे सुताचे दर किलोमागे ३० ते ४० रुपयांनी नरमले. परंतु चालू हंगामात जागतिक कापूस उत्पादन कमीच राहीले. त्यामुळे सुताचा साठा कमी आहे. परिणामी कापूस दरातील नरमाई लगेच थांबेल, असे जाणकारांनी सांगितले.

अमेरिकेच्या सोयाबीनला चीनची पसंती

चीन आत्तापर्यंत ब्राझीलच्या सोयाबीनचा मुख्य ग्राहक होता. मात्र ब्राझीलमध्ये यंदा सोयाबीन उत्पादन घटले. त्यामुळे ब्राझीलच्या सोयाबीनचे दर तेजीत होते. त्यातच निर्यातीत अनेक अडथळे निर्माण होत होते. त्यामुळे अमेरिकेच्या सोयाबीनला पसंती मिळाली. जानेवारी ते मे २०२२ या कालावधीचा विचार करता चीनची ब्राझीलमधून होणारी सोयाबीन खरेदी जवळपास ३ टक्क्यांनी घटली. यंदा चीनने ब्राझीलमधून १५६ लाख टन खरेदी केली. मागीलवर्षी याच काळातील सोयाबीन आयात २०५ लाख टन होती. तर अमेरिकेतून होणारी आयात ३७ लाख टनांनी वाढली. यंदा चीनने २१५ लाख टनांची अमेरिकेतून खरेदी केली तर मागील हंगामातील खरेदी १६८ लाख टनांवर होती. त्यामुळे अमेरिकेच्या सोयाबीनचेही दर वाढले. याचा लाभ भारतीय सोयाबीन दरालाही झाला होता.

जगातील महत्वाच्या अर्थव्यवस्था महागाईच्या विळख्यात

जागतिक पातळीवर सध्या महागाईचा आगडोंब उसळला आहे. जगातील महत्वाच्या अर्थव्यवस्था महागाईला तोंड देत आहेत. त्यामुळे जगात आर्थिक मंदीचे सावट असल्याची चर्चा अर्थतज्ज्ञांमध्ये सुरु आहे. जागत सर्वाधिक महागाई टर्की या देशात वाढली. येथे ७३.५ टक्क्यांनी भाव वाढले. त्यानंतर रशियाचा नंबर लागतो. रशियात वस्तुंची महागाई १७ टक्क्यांवर पोचली. युरोपातील महागाईचा दर ८.१ टक्के आहे. तर अमेरिकेत ८ टक्के आणि जर्मनीत ७.९ टक्क्यांवर महागाई वाढली. भारतातही सर्वच वस्तुंचे भाव ७ टक्क्यांपर्यंत वाढले. जगातील महत्वाच्या अर्थव्यवस्था महागाईच्या आगीत होरपळत आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

हरभऱ्याला निर्यात अनुदान दिल्यास दर वाढतील?

चालू हंगामात सरकारने कडधान्य आयातीला पाडघड्या घातल्या. त्यामुळे कडधान्याचे दर दबावात आले. त्यातही तूर आणि हरभरा दरात मोठी मंदी आली. देशातील एकूण कडधान्य पिकांखालील क्षेत्रापैकी ३५ ते ४० टक्के क्षेत्र एकट्या हरभरा पिकाखाली आहे. तर एकूण कडधान्य उत्पादनात हरभऱ्याचा वाटा ५० टक्क्यांवर येतो. बाजारभाव हमीभावापेक्षा एक हजार रुपयांपर्यंत कमी आहेत. केंद्राने यंदा देशात १ लाख ३९ हजार टन हरभरा उत्पादन झाल्याचा अंदाज जाहिर केला. मात्र त्यापैकी केवळ २३ लाख टनांचीच हमीभावाने खेरदी केली. म्हणजेच एकूण उत्पादनाच्या केवळ १६.४८ टक्के मालाची खरेदी सरकारने केली. उर्वरित ११६ लाख टन हरभरा शेतकऱ्यांना खुल्या बाजारात विकावा लागणार आहे.

सध्या हरभाऱ्याला सरासरी ४३०० रुपये दर मिळत आहे. तर हमीभाव ५२३० रुपये आहे. अशा परिस्थितीत हरभरा निर्यात करणे आवश्यक आहे. त्यामुळे सरकारने हरभरा निर्यातीसाठी १० टक्के निर्यात अनुदान द्यावे, अशी मागणी कडधान्य व्यापारी आणि निर्यातदारांनी केली. सरकारने ७ टक्के असलेले निर्यात अनुदान दोन वर्षांपुर्वी बंद केले होते. ते पुन्हा सुरु करण्याची मागणी पुढे रेटली जात आहे. सरकारने निर्यात अनुदान दिल्यास बाजारात हरभरा भाव वाढतील. यामुळे खुल्या बाजारातही शेतकऱ्यांना किमान हमीभाव तरी मिळेल, असे व्यापारी आणि निर्यातदारांचे म्हणणे आहे. परंतु बाजारातील जाणकारांच्या मते बहुतेक शेतकऱ्यांनी आता हरभरा विकला आहे. त्यामुळे बाजारात भाव वाढले तरी फायदा व्यापाऱ्यांचाच होणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com