Tur Market : वाढत्या आयातीमुळे तुरीचे भाव पडतील का?

दुसरीकडे सरकारने तूर आयातीसाठी पायघड्या घातल्या आहेत. सरकारनं यंदा १० लाख टन तूर आयातीचे उद्दीष्ट ठेवले. तर आातदार आणि व्यापाऱ्यांच्या मते यंदा आठ ते सव्वाआठ लाख टनांपर्यंतच आयात करता येईल.
Pulses Market
Pulses MarketAgrowon

१) आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन वाढले

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन (Soybean), सोयातेल (Soya Oil) आणि सोयापेंडच्या (Soya Meal) दरात दुपारपर्यंत सुधारणा पाहायला मिळाली. दुपारी २ वाजेपर्यंत सोयाबीन १५.२५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते.

तर सोयापेंडचे दर ४७८ डाॅलर प्रतिटनावर पोचले. देशातील बाजारात मात्र सोयाबीन दर (India Soybean Rate) दबावातच आहेत. आजही सोयाबीनला सरासरी ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयांचा सरासरी दर मिळाला.

सध्या दर दबावात असले तरी पुढील काळात दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

२) कापूस दरात चढ उतार सुरुच

आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरातली चढ उतार सुरुच आहेत. आज दुपारी २ वाजेपर्यंत कापसाचे वायदे ८६ सेंट प्रतिपाऊंडवर पोचले होते. मात्र देशातील कापूस दर (Cotton Rate) ८ हजार ते ८ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान कायम आहेत.

दुसरीकडे दर नरमल्याने बाजारातील आवक कमी झाली. पण आंतरराष्ट्रीय बाजारातही (International Market) कापसाचे भाव तेजीत आहेत. त्यामुळं देशातही कापसाचे दर पुढील काही दिवसांमध्ये सुधारु शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

३) कांद्याचे भाव दबावातच

कांद्याचे भाव मागील काही दिवसांपासून काहीसे कमी झाले आहेत. बाजारातील आवक जास्त असल्यामुळे दरावर दबाव असल्याचे सांगितले जाते.

सध्या कांद्याला १ हजार ते १ हजार २०० रुपये दर मिळतोय. हा दर उत्पादन खर्चापेक्षाही कमी असल्याचं शेतकरी सांगत आहेत. मात्र पुरवठा जास्त असल्याने दबाव आला.

पुढील काळात कांद्याची आवक वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळं दरात फार मोठ्या तेजीची सध्यातरी अपेक्षा नाही, असं कांदा अभ्यासकांनी सांगितलं.

४) कोबीचे दर नरमले

राज्यातील बाजारात कोबीची आवक काहीशी नरमली. मात्र दर मागील १५ दिवसांच्या तुलनेत कमी दिसत आहेत. सध्या कोबीला प्रतिक्विंटल ४०० ते ६०० रुपये दर मिळतोय.

पण पुढील काळात कोबीला उठाव मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोबीच्या दरात थोडी वाढ होऊ शकते, असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Pulses Market
Tur Rate : आज तूर बाजारात काय घडलं? सर्वाधिक दर काय होता?

५) तुरीसाठी यंदा काय दर मिळू शकतो?

देशातील बाजारात तुरीचा भाव सध्या काहीसा नरमला. बाजारातील आवकही वाढत आहे. तर पुढील काळात आवकेचा दबाव वाढेल. शेतकऱ्यांच्या हाती माल येईल तशी बाजारातील विक्रीही वाढणार आहे.

दुसरीकडे सरकारने तूर आयातीसाठी पायघड्या घातल्या आहेत. सरकारनं यंदा १० लाख टन तूर आयातीचे उद्दीष्ट ठेवले. तर आातदार आणि व्यापाऱ्यांच्या मते यंदा आठ ते सव्वाआठ लाख टनांपर्यंतच आयात करता येईल.

पण अंदाज काही असले तरी यंदा आयात वाढणार, हे सरकारच्या एकूणच धोरणांवरून दिसते. आफ्रिकेतील देशांमधून होणारी आयात पुढील काळात कमी होईल.

पण म्यानमारमधून आयात वाढेल. याचा बाजारावर दबाव येईल, अशी चर्चा सध्या बाजारात सुरु आहे. पण देशात यंदा तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. त्यामुळे तुरीचे दर जास्त नरमतील असं वाटत नाही.

दरात क्विंटलमागं २०० ते ३०० रुपयांपेक्षा जास्त तेजी मंदी येण्याची शक्यता नाही. म्हणजेच तुरीचे भाव सध्याच्या दरपातळी दरम्यान राहू शकतात, असा अंदाज कडधान्य बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

सध्या बाजारात तुरीला ६ हजार ५०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. हा दर यंदाच्या हंगामात टिकून राहू शकतो, असंही अभ्यासकांनी सांगितलं.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com