Soybean Rate : वायदेबंदीमुळं सोयाबीन उत्पादकांना फटका?

खाद्यतेलाचे दर वाढल्यानंतर नेहमीप्रमाणं केंद्रानं २०२१ मध्ये सोयाबीन आणि मोहरीच्या वायद्यांवर बंदी घातली. परंतु तेलबियांवरील वायदेबंदीनंतरही खाद्यतेलाचे दर कमी झाले नाहीत. दरात मोठे चढ-उतार होतच राहिले. म्हणजेच खाद्यतेलातील दरवाढीला वायदे जबाबदार नव्हते, हे सरकारच्याच आकडेवारीवरून स्पष्ट झाले. त्यामुळे सोयाबीन आणि मोहरीच्या वायद्यांवरील बंदी तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी होत आहे.
Soybean Rate
Soybean RateAgrowon

कापसाचा दर टिकून राहणार

1. देशातील अनेक भागांत पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. या पावसामुळं काढणीला आलेल्या कापसाचं नुकसान होण्याची शक्यता व्यक्त होतेय. तर दुसरीकडं देशातील अनेक बाजारांमध्ये आता नवा कापूस दाखल झालाय. नव्या कापसाचे सौदे प्रतिक्विंटल ९ हजार ते १० हजार रुपयांच्या दरम्यान होत आहेत. त्यातच यंदा गेल्या वर्षीपेक्षा कापूस उत्पादन ५० ते ६० लाख गाठींनी वाढेल, अशा बातम्या उद्योगाच्या गोटातून पेरल्या जात आहेत. मात्र पिकाची स्थिती पाहता उत्पादन गेल्या वर्षीएवढंच राहील आणि सध्याचा दर टिकून राहील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

Soybean Rate
Cotton Cultivation : शेतकरी नियोजन पीक ः कपाशी

बटाट्याचे भाव वाढण्याची शक्यता

2. सध्या बटाट्याला चांगला दर मिळतोय. उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि आसाम ही महत्वाची बटाटा उत्पादक राज्ये आहेत. मात्र या राज्यांमधील बटाटा उत्पादन यंदा कमी पाऊस आणि दुष्काळामुळं घटलंय. त्यामुळं सध्या बटाटा भाव खातोय. सध्या बटाट्याला प्रतिक्विंटल १८०० रुपये ते २२०० रुपये दर मिळतोय. हा दर काही दिवस टिकून राहण्याची शक्यता आहे. दोन महिन्यानंतर बटाट्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं पुढील काळातील नियोजन करून बटाटा लागवडही फायदेशीर ठरू शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

Soybean Rate
Sugar Export : साखर विक्रीचा कोटा वाढवल्यामुळे ‘इस्मा’ची नाराजी

साखरेच्या दरात सुधारणा होण्याचा अंदाज

3. साखरेचे दर सध्या काहीसे वाढले आहेत. जून ते सप्टेंबर या कालावधीत देशातील बाजारात साखरेचे दर पहिल्यांदाच क्विंटलमागं दीडशे ते दोनशे रूपयांनी सुधारले. सध्या महाराष्ट्रात साखरेचे दर प्रतिक्विंटल ३ हजार ३०० रुपये ते ३ हजार ५०० रुपयांदरम्यान आहेत. तर उत्तर प्रदेशात साखरेला ३ हजार ५०० ते ३ हजार ७०० रुपये दर मिळतोय. पुढील हंगामात भारतातून आंतरराष्ट्रीय बाजारात कमी साखर निर्यात झाल्यास पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. परिणामी जागतिक बाजारात साखरेच्या दरात तेजी येण्याची शक्यता आहे. त्यामुळं भारतातील बाजारपेठेतही साखरेचे दर वाढू शकतात, असा साखर उद्योगाचा अंदाज आहे.

Soybean Rate
Banana Farming : सोलापूर जिल्ह्यात वेलची, ‘रेड बनाना’ केळीवाणांचा यशस्वी प्रयोग

केळीतील दरवाढीचा कल कायम राहणार

4. सध्या सणासुदीचे दिवस आहेत. गणेशोत्सव आणि श्रावणातही केळीला उठाव होता. यामुळं केळी दरातील घसरण थांबली होती. गणेशोत्सवामध्ये केळीला कमाल १३०० रुपये दर मिळाला. पण मृग बहरातील केळीची आवक आता कमी झाली. तसंच कांदेबाग केळीचीही आवक वाढलेली नाही. फक्त आगाप लागवडीच्या कांदेबाग केळीची आवक सुरू आहे. यामुळं दरात काहीशी सुधारणा झाली आहे. कमी दर्जाच्या केळीला राजस्थान, नागपूर, छत्तीसगड आदी भागांत उठाव आहे. सध्या दर्जेदार केळीचे दर १६५० रुपये प्रतिक्विंटलवर पोचले. तर मध्यम दर्जाच्या केळीचे दर १००० ते १२५० रुपयांदरम्यान आहेत. पुढे नवरात्रोत्सव आहे. यामुळे केळी दर टिकून राहतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

वायदेबंदीमुळं सोयाबीन उत्पादकांना फटका?

5. सध्या नवं सोयाबीन बाजारात दाखल (Soybean Arrival) होतंय. मात्र दर (Soybean Rate) काय राहू शकतात? याच अंदाज शेतकऱ्यांना येत नाहीये. कारण सोयाबीनच्या वायद्यांवर बंदी (Soybean Futures Ban) आहे. केंद्र सरकारनं खाद्यतेलाचे दर (Edible Oil Rate) नियंत्रणात आणण्यासाठी ऑक्टोबर २०२१ मध्ये मोहरी आणि डिसेंबर २०२१ मध्ये सोयाबीनच्या वायद्यांवर बंदी घातली. मात्र वायदे बंदीनंतरही खाद्यातेलाचे दर कमी झाले नाहीत. नेमका हाच धागा पकडून मस्टर्ड ऑईल प्रोड्यूसर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात मोपा आणि द सेंट्रल ऑर्गेनायझेशन फाॅर ऑईल इंडस्ट्री अॅन्ड ट्रेड या संघटनेने सोयाबीन आणि मोहरीच्या वायद्यांवरील बंदी उठवण्याची मागणी केली आहे. सेबीला लिहिलेल्या पत्रात उद्योगांनी म्हटलंय, की वायद्यांवर बंदी घालूनही खाद्यतेलाचे दर कमी झाले नव्हते, हे सरकारच्याच आकडेवारीवरून स्पष्ट होते.

दरवाढीसाठी मुख्य कारण म्हणजे आपण आयातीवर अवलंबून आहोत. त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारातील दरवाढ झाली की लगेच देशातही दर वाढले होते. तर आंतरराष्ट्रीय बाजारात दर कमी झाल्यानंतर देशातही दर कमी झाले. त्यामुळं खाद्यतेल दरवाढीला वायदे कारणीभूत नव्हते, हे स्पष्ट झालंय. मात्र वायद्यांमुळं शेतकऱ्यांना दराची माहिती मिळते. आता सोयाबीन हंगाम अगदी तोंडवार आलाय. या काळात शेतकऱ्यांना भविष्यातील दराची माहिती मिळणं गरजेचं आहे. त्याशिवाय सोयाबीन उत्पदकांना चांगला दर मिळणार नाही. त्यामुळं सरकारनं तेलबियांच्या वायद्यांवरील बंदी तत्काळ मागे घ्यावी, अशी मागणीही उद्योगांनी केलीये. सध्या सोयाबीनचे दर दबावात आहेत. वायदे बंद असल्यानं शेतकऱ्यांना दराचा नेमका अंदाज येत नाहीये. वायदे सुरु झाल्यानंतर सोयाबीन केव्हा विकायचं हे शेतकरी ठरवू शकतात, त्यामुळं वायदे सुरु करण्याची मागणी शेतकरीही करत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com