Soybean Rate : सोयाबीनचे वाढलेले दर टिकतील का?

देशात पावसाने उघडीप दिल्यानंतर सोयाबीन काढणी जोमात सुरु आहे. मात्र अनेक शेतकरी काढणी केल्यानंतर लगेच बांधावरून सोयाबीन विक्री करताना दिसत आहेत. या शेतकऱ्यांना काहीसा कमी दर मिळत आहे. तर बाजारात सोयाबीन दरात काहीशी सुधारणा झाली आहे.
Soybean Rate
Soybean RateAgrowon

कापूस बाजार सुस्त

1. देशात स्थानिक बाजारात सध्या कापसाला अपेक्षेपेक्षा कमी दर मिळत आहेत. सध्या देशातून कापड निर्यात घटलीय. परिणामी सूतिगरण्यांकडून कापसाला कमी उठाव मिळतोय. त्यामुळे दर सध्या दबावात असल्याचे व्यापारी सांगत आहेत. सध्या देशात कापसाला किमान ७ हजार ५०० रुपये तर कमाल ९ हजार ५०० रुपये क्विंटल दर मिळतोय. बाजारात कापसाची मागणी वाढल्यानंतर दर सुधारतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी ९ हजार रुपयांची दरपातळी लक्षात ठेऊन टप्प्याटप्प्याने विक्री करणं फायदेशीर ठरेल, असं जाणकारांनी सांगितलं.

तूर दरातील तेजी कायम

2. मोझांबिक देशातून जास्तीत जास्त तूर आयातीसाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. मोझांबिकमधून तूर निर्यात काही करणास्तव ठप्प झाली होती. मात्र भारत सरकारने मध्यस्थी करून मार्ग काढल्यामुळे तूर आयातीचा मार्ग मोकळा झालाय. सरकार यंदा आफ्रिकी देशांमधून विक्रमी तूर आयात करणार असल्याचं सांगितलं जातं. मात्र देशातील उत्पादन कमी असल्यानं त्याचा बाजारावर फारसा परिणाम होणार नाही, असंही जाणकार सांगत आहेत. तुरीचा बाजार ७ हजार ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकतात, असा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय.

Soybean Rate
Onion Rate : उन्हाळ कांद्याला दराचा आधार

कांद्याचे दर सुधारले

3. खरिपातील कांदा लागवडी कमी झाल्या. तसंच मागील हंगामातील चाळीत साठवलेल्या कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यामुळे पुढील काळात कांद्याचा कमी पुरवठा होण्याची शक्यता निर्माण झाली. परिणामी कांदा दरात काहीशी सुधारणा पाहायला मिळत आहे. सध्या प्रति क्विंटल १ हजार ७०० ते २ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान कांदा विकला जातोय. बाजारातील स्थिती पाहता कांदा दर तजीतच राहतील, असा जाणकारांचा अंदाज आहे.

Soybean Rate
Turmeric Processing : फिरता हळद प्रक्रियेचा जुगाड

हळदीचे दर दबावात

4. राज्यातील बाजारात सध्या हळदीचे दर दबावात आहेत. मागील वर्षापासून हळदीला बाजारात कमी दर मिळत आहे. कोरोनानंतर निर्यातही घटली. परिणामी हळदीला उठाव कमी राहून दर दबावात आले. तसंच सध्या बाजारातील आवकही कमी आहे. मात्र प्रक्रिया उद्योगाकडून मागणी कमी आहे. त्यामुळे हळदीला कमी उठाव आहे. सध्या हळदीला सरासरी प्रतिक्विंटल ५ हजार ५०० ते ७ हजार रुपये दर मिळतोय. ही दरपातळी पुढील काही महिने कायम राहू शकते, असा अंदाज हळद बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय.

सोयाबीनचे वाढलेले दर टिकतील का?

5. देशात पाऊस थांबल्यानंतर सोयाबीनची काढणी (Soybean Harvesting) आणि विक्री वाढली. ऑक्टोबरच्या पहिल्या २० दिवसांमध्ये विविध भागांमध्ये झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची दमछाक झाली. मात्र आठवडाभरापासून पावसाने उघडीप दिलीय. त्यामुळे सोयाबीन उत्पादक (Soybean Belt) पट्ट्यात शेतकऱ्यांची सोयाबीन काढणीसाठी धावपळ उडाली आहे. यंदा शेतकरी जागेवरच सोयाबीन विक्री (Soybean Sale) करताना दिसत आहेत. पावसात ओल्या झालेल्या सोयाबीनची गुणवत्ता (Soybean Moisture) कमी झाली. त्यातच त्याची टिकवणक्षमता कमी आहे. त्यामुळे सोयाबीनची लगेच विक्री करत असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारा दरही (Soybean Rate) काहीसा कमी आहे.

सध्या बांधावरून खरेदी होणाऱ्या सोयाबीनला सरासरी ४ हजार ३०० ते ४ हजार ७०० रुपये क्विंटल दर मिळतोय. मात्र दुसरीकडे सोयाबीनच्या बाजारभावात सुधारणा झालेली दिसतेय. काल सोयाबीनचा सरासरी दर हा ४ हजार ९०० ते ५ हजार १०० रुपये होता. तर आज सोयाबीनच्या दरात क्विंटलमागे ५० ते १०० रुपयांची सुधारणा झाली होती. अनेक बाजारांमध्ये ५ हजार ते ५ हजार २०० रुपयांच्या दरम्यान सोयाबीनचे व्यवहार झाले. सोयाबीनचे दर या दरपातळीवर टिकून राहू शकतात. शेतकऱ्यांनी ५ हजार ते ६ हजार रुपयांची दरपातळी लक्षात ठेऊन टप्प्याटप्पयाने विक्री करावी, असं जाणकारांनी सांगितलं.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com