Tur : देशात तुरीचं उत्पादन घटणार?

मागील हंगामात तुरीचे उत्पादन (Tur Production) घटले होते. उत्पादन कमी राहूनही सरकारच्या आयातीमुळे (Tur Import) शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळाले. त्यामुळं चालू खरिपात आत्तापर्यंत तुरीची (Tur Sowing) लागवड कमी झाली.
Tur Import
Tur ImportAgrowon

देशातून यंदा कांदा निर्यात वाढतेय

भारतीय कांद्याला जगभरातून मागणी असते. त्यामुळं अनेक देशांमध्ये कांदा निर्यात होतो. एप्रिल आणि मे महिन्यात देशातून ३ लाख ४० हजार टन कांद्याची निर्यात झाली. मागील वर्षी याच दोन महिन्यांत २ लाख ८४ हजार टन कांदा निर्यात झाला होता. म्हणजेच मागीलवर्षीपेक्षा यंदा जवळपास ५६ हजार टनांनी अधिक निर्यात झाली. यंदा एप्रिल आणि मे महिन्यात कांद्याचे दर कमी होते. त्यामुळं निर्यात वाढली, असं जाणकारांनी सांगितलं. देशात अद्यापही कांद्याचे दर वाढलेले नाही, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.

Tur Import
युरोपियन युनियनमध्ये Extreme Heat मुळे पिकांना फटका|Soybean Market|ॲग्रोवन

सोयाबीनच्या वायद्यांत सुधारणा

अमेरिकेतील सोयाबीन पिकाला दुष्काळाचा फटका बसतोय. त्यामुळं अमेरिकेतील सोयाबीन उत्पादनाच्या अंदाजात कपात होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त होतेय. याचा परिणाम बाजारावरही जाणवतोय. गुरुवारी सीबाॅटवर सोयाबीनच्या वायद्यांमध्ये सुधारणा पाहायला मिळाली. वायद्यांमध्ये १.३१ टक्क्यांची वाढ होऊन १४.२९ डाॅलर प्रतिबुशेल्सवर पोचले होते. ११ जुलैनंतर हा दर सर्वाधिक ठरला. चालू हंगामात ब्राझील आणि अर्जेंटीनात सोयाबीनचं उत्पादन घटलं. त्यामुळं अमेरिकेतील उत्पादनावर भीस्त आहे. मात्र अमेरिकेतही पिकाची स्थिती चांगली नसल्यानं दर सुधारत आहेत.

Tur Import
Maize : मका पिकाला अमेरिकन लष्करी अळीचा विळखा

दक्षिण आफ्रिकेत मका उत्पादन घटणार

दक्षिण आफ्रिका जगातील महत्वाचा मका उत्पादक देश आहे. जगात दक्षिण आफ्रिकेचा १० वा क्रमांक लागतो. मात्र यंदा येथे मका उत्पादन कमी राहण्याचा अंदाज व्यक्त होतोय. दक्षिण आफ्रिका सरकारच्या मते यंदाचं मका उत्पादन ९.८ टक्क्यांनी कमी राहील. इथं यंदा १४७ लाख टन मका उत्पादनाचा अंदाज आहे. मागील वर्षी १६३ लाख टन मका हाती आला होता. यापैकी ७५ लाख टन पांढरा म्हणजेच मानवी आहारासाठीच्या मक्याचं उत्पादन होईल, तर ७२ लाख टन पिवळ्या मक्याचं उत्पादन होण्याचा अंदाज आहे. दक्षिण आफ्रिकेत मका उत्पादन घटीच्या अदंजानंतर दरातही सुधारणा पाहायला मिळाली.

हरभरा दर अजूनही दबावात

देशातील बाजारात हरभरा दर अजूनही दबावात आहेत. सरकारनं हरभऱ्यासाठी ५ हजार २३० रुपये हमीभाव जाहीर केला होता. मात्र शेतकऱ्यांना हरभरा खुल्या बाजारात विकावा लागला. शेतकऱ्यांना ४ हजार ५०० ते ४ हजार ९०० रुपये प्रतिक्विटंल दर मिळाला. जुलै महिन्यापासून हरभरा दर सुधारतील असा अंदाज होता. मात्र अद्यापही दर हमीभावापेक्षा कमीच आहेत. गुरुवारी देशात हरभऱ्याचा सरासरी दर ४ हजार ९०० ते ५ हजार ५० रुपयांच्या दरम्यान होता. सध्या शेतकऱ्यांकडं हरभरा नगण्य शिल्लक आहे. त्यामुळं बाजारातील आवकही कमी आहे. तरीही दर दबावात आहेत.

देशात तुरीचं उत्पादन घटणार?

खरिपात तूर, मूग आणि उडिद ही महत्वाची कडधान्ये पिके (Pulses Crop) आहेत. चालू आठवड्यापर्यंत देशात जवळपास ९१ लाख हेक्टरवर कडधान्याचा पेरा (Pulses Sowing) झाला होता. मागीलवर्षीच्या तुलनेत कडधान्य पेरा ६.४९ टक्क्यांनी अधिक झाला. यात मुगाची लागवड (green Gram Sowing) सर्वाधिक वाढली. मुगाच्या लागवडीत ३१.२९ टक्क्क्यांनी वाढ झाली. तर उडदाचा पेरा (Black Gram Sowing) जवळपास ८ टक्क्यांनी वाढला. मात्र तुरीच्या लागवडीत (Tur Sowing) २०.२५ टक्क्यांनी घट झाली. मागीलवर्षी याच काळात ३९ लाख हेक्टरवर तूर लागवड झाली होती. मात्र यंदा ३१ लाख हेक्टरपर्यंत पेरा होऊ शकला. (Tur Production)

तूर लागवडीत देशात कर्नाटक, महाराष्ट्र आणि तेलंगणा ही महत्वाची राज्ये आहेत. कर्नाटकातील तूर लागवड २१ टक्क्यांनी कमी राहिली. कर्नाटकात १० लाख हेक्टरवर लागवड झाली. तर महाराष्ट्रातही १६ टक्क्यांनी क्षेत्र कमी झालंय. महाराष्ट्रात ९.११ लाख हेक्टरवर तूर पीक आहे. तेलंगणात मात्र ४५ टक्क्यांनी पेरा कमी झाला. तेलंगणात जवळपास ५ लाख हेक्टरवर तुरीची लागवड झाली. मागीलवर्षी तुरीचा विक्रमी पेरा होऊनही उत्पादन घटलं होतं. मात्र सरकारनं स्वस्त तुरीची आयात केली. त्यामुळं बाजारात दर दबावात राहीले. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा एक हजार ते १२०० रुपये कमी दर मिळाला. त्यामुळं शेतकरी यंदा तुरीला कमी प्राधान्य देत आहेत. तूर लागवडीतील घट अशीच कायम राहिल्यास यंदा देशात उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा घटू शकतं. त्यामुळं दराला आधार मिळू शकतो, असं जाणकारांनी सांगितलं.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com