Agrowon Podcast : तुरीच्या दरातील तेजी वाढेल का?

Tur Production : देशातील तूर उत्पादन यंदा मोठ्या प्रमाणात घटले. यंदा सरकारचे १० लाख टन आयातीचे उद्दीष्ट असले तरी गेल्यावर्षीपेक्षा जास्त आयात होण्याची शक्यता कमीच असल्याचे आयातदार सांगत आहेत.
Price Rise
Price Rise Agrowon

Tur Market : देशातील तूर उत्पादन (Tur Production) यंदा मोठ्या प्रमाणात घटले. यंदा सरकारचे १० लाख टन आयातीचे उद्दीष्ट असले तरी गेल्यावर्षीपेक्षा जास्त आयात (Tur Import) होण्याची शक्यता कमीच असल्याचे आयातदार सांगत आहेत. म्हणजेच यंदा देशात तुरीचा तुटवडा (Tur Shortage) राहणार आहे. त्यामुळे तुरीचे दर (Tur Rate) तेजीत आहेत. पण तुरीच्या दरातील तेजी पुढील काळात टिकेल का? सध्या तुरीला काय भाव मिळतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.

1. सोयाबीनचा बाजार स्थिर


आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात नरमाई आली आहे. सोयापेंडचे वायदे १३.०५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर बंद झाले होते. तर सोयापेंडच्या वायद्यांनी ४०९ डाॅलरचा टप्पा गाठला होता. देशातील बाजारात मात्र सोयाबीनचे दर स्थिर होते.

सोयाबीनला सरासरी ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. सोयाबीनचे दर काही काळ टिकून राहू शकतात असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यसकांनी व्यक्त केला. 

2.  कापूस भाव दबावातच

देशातील बाजारात कापसाचे सध्या दबावात आहे. कपासाला प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार २०० ते ७ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तर बाजारातील आवक सरासरीपेक्षा जास्त आहे.

रोज ८० हजार गाठींच्या दरम्यान कापूस बाजारात येत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे ८६.६३ सेंट प्रतिपाऊंडवर होते.

देशातील बाजारात कापसाची आवक कमी झाल्यानंतर दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला. 

Price Rise
Cotton Market: कापूस दरवाढीला मजबूत आधार असताना दबावातच का?

3. गव्हाच्या दरात सुधारणा


देशातील बाजारात सध्या गव्हाचे भाव सुधारले आहेत. बाजारातील गहू आवक सध्या कमी दिसते. सरकारची खरेदीही सुरु आहे. त्यातच गहू पिकाला यंदा बदलत्या वातावरणाचा फटका बसत आहे. त्यामुळे खुल्या बाजारात दरात सुधारणा झाली.

त्यामुळे सध्या गव्हाला प्रतिक्विंटल २ हजार ते २ हजार ३०० रुपयांचा भाव मिळत आहे. गव्हाचे भाव पुढील काळात आणखी सुधारण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली. 

Price Rise
Wheat market : गव्हाच्या दरात पुन्हा सुधारणा

4. ज्वारीचे दर तेजीत

ज्वारी सध्या बाजारात चांगलाच भाव खात आहे. बाजारातील आवक कमी होत आहे. यंदा देशातील ज्वारी उत्पादनाला फटका बसला. खरिपातील उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी झाले. तर रब्बी हंगामात लागवड वाढूनही बदलत्या वातावरणाचा पिकाला फटका बसला.

परिणामी सध्या बाजारातील आवक कमी आहे. त्यामुळे ज्वारीचे दर तेजीत आहेत. सध्या ज्वारीला प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ते ४ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे.

ज्वारीचे दर पुढील काळातही टिकून राहू शकतात, असा अंदाज ज्वारी बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. 

5. देशातील तूर उत्पादन यंदा मोठ्या प्रमाणात घटले. देशाला वर्षाला ४५ लाख टनांची गरज असते. पण यंदा उत्पादन ३० लाख टनांवरच स्थिरावेल, असा अंदाज आहे. सरकारने आयातीतून गरज भागविण्याचे उद्दीष्ट ठेवले.

पण जागतिक पातळीवर तुरीचे उत्पादन कमी होते. त्यामुळे आयातीवरही मर्यादा आहेत. देशात गेल्याहंगामात ८ लाख ५० हजार टनांची आयात झाली होती.

यंदा सरकारचे १० लाख टन आयातीचे उद्दीष्ट असले तरी गेल्यावर्षीपेक्षा जास्त आयात होण्याची शक्यता कमीच असल्याचे आयातदार सांगत आहेत.

म्हणजेच यंदा देशात तुरीचा तुटवडा राहणार आहे. त्यामुळे तुरीच्या दरात पुढील काळातही वाढ होणार आहे. त्यामुळे सरकार सुरुवातीपासूनच बाजारावर लक्ष ठेऊन आहे.

सरकारने बाजारातील सर्व घटकांना आपल्याकडील तुरीच्या स्टाॅकची माहिती देण्यास सांगितले.

मुक्त आयात धोरण राबवले. सरकराचं आयात करेल, अशी तंबीही दिली. पण तुरीच्या भावातील तेजी कमी होण्याचं नाव घेईना.

तुरीच्या दरातील तेजी पुढील काळातही टिकून राहील, असा अंदाज आहे. सध्या अनेक बाजारात तुरीचा भाव ९ हजारांवर पोचला.

पुढील काळता तुरीचा भाव १० हजारांचाही टप्पा गाठू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com