Tur Rate : तुरीचे दर आणखी वाढणार का?

देशात सध्या तुरीची मोठ्या प्रमाणात टंचाई भासत आहे. त्यामुळं निर्यातदार देशांनीही तुरीचे दर वाढले आहेत. परिणामी आयात तुरही महाग पडत आहे. देशात यंदा तूर लागवड कमी होऊन उत्पादनही घटण्याचा अंदाज आहे.
tur rate
tur rate agrowon

झेंडू दरात मोठी तेजी

1. दसऱ्याला झेंडूला विशेष मान असतो. त्यामुळं दसऱ्याच्या आदल्या दिवशी बाजारात झेंडूच्या फुलांची आवक वाढते. राज्यभरात आज झेंडू फुलांची मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली. आज पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर आणि कोल्हापूर बाजार समित्यांमध्ये झेंडूची आवक ५०० ते १५०० क्विंटलच्या दरम्यान झाली. मात्र मागणी असल्यानं या झेंडूला प्रतिक्विंटल ५ हजार ते ८ हजार रुपये दर मिळाला. पण काही ठिकाणी दर ३ हजार रुपयांपासूनही सुरु झाला होता.

tur rate
Soybean Harvesting : सोयाबीन ची काढणी करताना या गोष्टी लक्षात घ्या

सोयाबीन उतारा घटला

2. राज्यात सध्या सोयाबीन काढणीला प्रारंभ झालाय. मात्र यंदा पिकाला पावसाचा फटका बसलाय. यंदा शेतकऱ्यांना केवळ तीन ते आठ क्विंटलदरम्यान सरासरी उतारा मिळतोय. यातून खर्चाचा ताळमेळही जुळवणं कठीण झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय. आता पावसानं उघाड दिल्यानंतर सोयाबीनच्या मळणीला जोमानं सुरुवात झालीये. त्यामुळं पुढील काही दिवसांमध्ये बाजारात सोयाबीन आवक वाढेल. दुसरीकडं बाजारात नव्या सोयाबीनला सरासरी प्रतिक्विंटल ४ हजार ७०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. हंगामाच्या प्रारंभी शेतकऱ्यांना किमान सरासरी ५ हजार रुपये दर मिळू शकतो. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन विक्री करावी, असं आवाहन जाणकारांनी केलंय.

हळदीचे दर दबावातच

3. देशात मागीलवर्षी हळदीचं सरासरी ८० लाख पोती उत्पादन झालं होतं. मराठवाड्यात अपेक्षेपेक्षा हळदच्या क्षेत्रात जास्त वाढ झाली. त्यामुळं उत्पादनही जास्त राहीलं. मार्च ते मे या तीन हळदीला विशेष मागणी असते. या काळात हळदीच्या दरात ५०० ते ८०० रुपयांनी तेजी होती. मात्र जुलै महिन्यापासून हळदीच्या दरात घसरण सुरु झाली. त्यामुळं व्यापारी आणि शेतकऱ्यांनी हळदीची विक्री थांबवली होती. परिणामी सध्या देशात ४५ लाख पोती हळद शिल्लक असल्याचं सांगितलं जातं. सध्या हळदीला ६ हजार ७०० ते ७ हजार ५०० रुपये दर मिळतोय. हळदीच्या दरात लगेच मोठ्या तेजीची अपेक्षा नाही, असं जाणकारांनी सांगितलं.

tur rate
Urad Rate: उडीद पिकाच्या नुकसानीमुळे शेतकरी चिंतेत

उडदाच्या दरातील तेजी टिकून

4. देशात सध्या तुरीसह उडदाची मोठ्या प्रमाणात टंचाई भासत आहे. त्यातच यंदा खरिपातील उडीद लागवड सोडतीन टक्क्यांनी घटली. त्यातच पिकाला पावसाचा मोठा फटका बसला. त्यामुळं उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. परिणामी बाजारात उडीद आणि उडदाच्या डाळीचे दर वाढले. पुढील काळात हे दर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं नाफेड आयात उडदाची खरेदी करत आहे. नाफेडने आत्तापर्यंत सरासरी ७ हजार ३८९ रुपये प्रतिटनानं जवळपास साडेचार हजार टन उडदाची खरेदी केली. देशातील बाजारात ६ हजार ते ८ हजार रुपये दर मिळतोय. यंदा उडदाचे दर तेजीत राहतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

तुरीचे दर आणखी वाढणार का?

5. देशात तुरीचे दर (Tur Rate) तेजीत आहेत. सध्या तुरीला सरासरी ७ हजार ते ८ हजार रुपये दर मिळतोय. यंदा देशात तुरीची लागवड (Tur Cultivation) जवळपास साडेचार टक्क्यांनी घटली. त्यातच तूर पिकाची लागवड उशीरा झाली. अनेक तूर उत्पादक भागांमध्ये लागवडयोग्य पाऊस उशीरा झाला. तसचं पावसाळ्यात चारही महिन्यांमध्ये काही दिवस सतत पाऊस पडला. तर पावसाचा खंडही होता. त्यामुळं तूर पिकाचं नुकसान (Tur Crop Damage) होतंय. तसचं तूर पिकावर वांझ रोग, वाढ खूंटणं, पानं पिवळी पडणं आदी रोगांचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळं यंदा तूर उत्पादन २५ ते २७ लाख टनांच्या दरम्यान राहील, असा अंदाज उद्योगातून व्यक्त होतोय.

असं झाल्यास तूर आयात मागीलवर्षीप्रमाणं झाली तरी देशात तुटवडा भासेल. याची जाणीव स्टाॅकिस्ट आणि उद्योगांना आहे. त्यामुळं ते तुरीचा साठा बाहेर काढताना दिसत नाहीत. परिणामी बाजारात तुरीचा पुरवठा मर्यादीतच होतोय. यामुळं तुरीचे दर तेजीत आहेत. आयात तूरही सध्या सरासरी ८ हजार रुपयांच्या दरम्यान पडतेय. त्यामुळं देशातील बाजारही दराभोवती फिरतोय. तुरीच्या दरानं ८ हजार रुपयांचा टप्पा पार केल्यानंतर मागणी काहीशी कमी होतेय. दर काहीसे कमी झाले की पुन्हा मागणी येऊन दर पुर्वपातळी गाठतात. हे चक्र मागील काही दिवसांपासून सुरु आहे. देशातील तूर बाजाराची स्थिती पाहता पुढील काळात तुरीला सरासरी ८ हजार ते ९ हजार रुपये दर मिळू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com