Agrowon Podcast : आल्याचा पुरवठा पुढील काळात वाढेल का?

Ginger Market : आल्याच्या दरातील वाढ गेल्या दोन महिन्यांपासून टिकून आहे. यंदा पाऊस आणि कडी-रोगामुळे आले उत्पादनात मोठी घट झाली होती. तर बाजारातील मागणी कायम आहे.
Ginger Market
Ginger MarketAgrowon

१) कापूस काहिसा नरमला (Cotton Rate)

देशातील बाजारात आज कापसाच्या दरात काहीशी नरमाई पाहायला मिळाली. अनेक बाजारांमध्ये कापूस भाव आज ५० ते १०० रुपयांनी कमी झाले होते. कापसाचा सरासरी भाव आज ७ हजार ते ७ हजार ५०० रुपयांवर आला.

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे ८५ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशातील वायद्यांमध्येही काहीशी नरमाई पाहायला मिळाली. सध्या बाजारातील कापूस आवक कमी होत आहे. पुढील काळात आवकेचा दबाव आणखी कमी होऊन दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

२) सोयाबीनमध्ये चढ उतार (Soybean Rate)

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात चढ उतार सुरु आहेत. सोयाबीनचे वायदे सायंकाळी चार वाजेपर्यंत १३.६० डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३९९ डाॅलरवर होते. देशात मात्र सोयाबीनचा भाव टिकून आहे.

सोयाबीनला सरासरी ४ हजार ६०० ते ५ हजार २०० रुपयांचा भाव मिळला. तर एनसीडीईएक्सच्या वेगवेगळ्या डिलेव्हरी केंद्रांवर ५ हजार १०० ते ५ हजार ४०० रुपयांचा भाव मिळाला. सोयाबीनच्या दरात पुढील काळात २०० रुपयांपर्यंत चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

३) मका दर दबावातच (Maize Rate)

देशातील बाजारात मक्याचे भाव अद्यापही दबावातच आहेत. मक्याची आवक काहिशी अधिक दिसते. मात्र मक्याला उठाव कमी आहे. निर्यातीची गतीही मंदावली आहे. याचा दबाव बाजारावर दिसत असल्याचे जाणकारांनी सांगितले.

सध्या मक्याला प्रतिक्विंटल सरासरी १ हजार ८०० ते २ हजार १०० रुपयांचा भाव मिळत आहे. पुढील काळात मक्याला उठाव वाढून दारत काहीशी सुधारणा अपेक्षित आहे, असे जाणकारांनी सांगितले.

Ginger Market
Maize Research Center : सिल्लोड तालुक्यात मका संशोधन केंद्र

४) तुरीच्या दरातील तेजी कायम (Tur Rate)

तुरीच्या दरातील तेजी आजही कायम होती. बाजारातील तुरीची आवक खूपच कमी आहे. त्यातच तुरीला चांगला उठाव आहे. आयातही कमीच होत आहे. त्यामुळे दरावाढीला आधार मिळतो. सध्या तुरीचे भाव ९ हजार ५०० ते १० हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत.

पुढील चार ते पाच महिने तुरीचा पुरवठा वाढण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळे तुरीच्या दरातील वाढ कायम राहू शकते, असा अंदाज व्यापारी आणि उद्योगांनी व्यक्त केला.

५) आले दरातील तेजी पुढील काळात टिकेल का? (Ginger Rate)

आल्याच्या दरातील वाढ गेल्या दोन महिन्यांपासून टिकून आहे. यंदा पाऊस आणि कडी-रोगामुळे आले उत्पादनात मोठी घट झाली होती. तर बाजारातील मागणी कायम आहे. त्यामुळे चालू हंगामात आले पिकाला गेल्या १० वर्षांतील चांगला भाव मिळत आहे.

सध्या आल्याचे भाव १० ते १२ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान आहेत. यंदा आले उत्पादन किती होईल, याचा अंदाज येऊ शकला नाही. मागील चार ते पाच वर्षे आले पिकाने शेतकऱ्यांना चांगलेच अडचणीत आणले होते. यंदा काही भागातील शेतकऱ्यांनी लागवडीकडेही पाठ फिरवली होती. त्यामुळे उत्पादन घटण्यात हातभार लागला.

Ginger Market
Ginger Crop : आले पिकात गादी वाफ्याची उंची वाढवा

चालू वर्षी अगदी सुरुवातीपासूनच आल्याच्या दरात सुधारणा होण्यास सुरुवात झाली. टप्प्याटप्प्याने दरात वाढ होत गेली. आले बियाणे काढणी सुरू असताना दरात आणखी वाढ झाली. एप्रिलच्या सुरुवातीपासून दरातील तेजी वाढत गेली. मे महिन्यात तर दराने विक्रमी टप्प गाठला. आल्याला १२ ते १३ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला.

जून सुरू झाला तरी आले दरातील तेजी कायम आहे. सध्या मागणी जास्त आणि पुरवठा कमी आहे. यामुळे पुढील काळातही दर टिकून राहू शकतात, असा अंदाज आले बाजारातील व्यापारी आणि जाणकारांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com