उडदाचे दर वाढतील का ?

देशात सध्या उडदाचे दर तेजीत आहेत. सध्या उडदाला सरासरी प्रति क्विंटल ७ हजार ५०० रुपयांपर्यंत दर मिळतोय. मात्र देशातील काही बाजारांमध्ये नवीन उडदाची आवक सुरु झाली. पुढील काळात नवीन उडदाची आवक वाढणार आहे.
Black Gram
Black GramAgrowon

दहा वर्षांत हळद एकाच भावपातळीवर

1. सध्या बाजारात हळदीचे दर दबावात आहेत. निजामाबाद, सांगली या महत्त्वाच्या बाजारसमित्यांत हळदीचा दर नरमलेला आहे. खरं तर मागील दहा वर्षांत हळदीचा सरासरी दर एकाच पातळीवर फिरतोय. २००७ मध्ये हळदीला प्रति क्विंटल २००० रुपये दर होता. हळदीनं २०१० मध्ये १६ हजारांचा टप्पा गाठला होता. मात्र त्यानंतर एकाच वर्षात पुन्हा २८०० रुपयांचा निचांकी टप्पा गाठला. त्यानंतर दराने दोनदा ८ ते १० हजारांचा टप्पा पार केला. मात्र मागील दहा वर्षांत सरासरी दर ७००० ते ७२०० रुपयांदरम्यान रेंगाळतोय. सध्या बाजारात हळदीला ६ हजार ८०० ते ७ हजार ७०० रुपये दर मिळतोय. मागणी वाढल्यानंतर हळदीचे दर सुधारतील, असा जाणकारांचा अंदाज आहे.

Black Gram
Turmeric : हळदीच्या वायद्यांवर बंदी नकोच !

कमी आवकेमुळं कारली भाव खाणार

2. कारल्याला सध्या चांगला दर मिळतोय. नुकत्याच झालेल्या पावसानं कारल्याचं नुकसान झालंय. त्यामुळे बाजारातील आवक कमी होतेय. पुणे, नाशिक, नागपूर या मोठ्या बाजारसमित्या सोडल्या तर कारल्याची दैनंदिन आवक २० क्विंटलपेक्षाही कमी आहे. मात्र श्रावणामुळं भाजीपाल्याला उठाव आहे. त्यामुळं कारल्याच्या दरात काहीशी सुधारणा झालेली आहे. राज्यात सध्या प्रति क्विंटल २५०० ते ४५०० रुपयाने कारल्याचे व्यवहार होत आहेत. पुण्यात सर्वाधिक ४५०० रुपयांचा सरासरी दर मिळाला. कारल्याच्या दरात पुढील काळात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

Black Gram
Onion : कांदा रोपवाटिकांची अतिपावसाने हानी

कांदा दरावरील आवकेचा दबाव कायम

3. कांद्याचे दर सध्या दबावातच आहेत. कांदा दर वाढीसाठी नुकतचं एक दिवसाचं विक्री बंद आंदोलनही झालं. कांद्याला उठाव नसल्यानं दर दबावात असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगतिलं. बदलत्या वातावरणामुळं चाळीतील कांदा खराब होण्याचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे शेतकरी कांदा बाहेर काढत आहेत. परिणामी बाजारात आवकेचा दबाव वाढतोय. सध्या कांद्याला गुणवत्तेनुसार प्रति क्विंटल १००० ते १५०० रुपयांपर्यंत दर मिळतोय. नाशिक जिल्ह्यात सरासरी ११०० रुपये दर आहे. कांद्याचे दर पुढील काही दिवस दबावात राहू शकतात, असं जाणकारांनी सांगितलं.

Black Gram
Chana : हरभरा विक्रीचे चुकारे थकलेलेच

मागणीअभावी हरभरा दर नरमलेलेच

4. देशातील बाजारांमध्ये सध्या हरभरा दबावातच आहे. सरकारच्या ताज्या अंदाजानुसार देशात यंदा १३७ लाख टन हरभरा उत्पादन झालं. तर हरभरा वापर ९५ लाख टनांच्या दरम्यान आहे. मागणीपेक्षा हरभऱ्याचा पुरवठा अधिक आहे. परिणामी बाजारावर दबाव आलाय. नाफेडकडेही जवळपास २७ लाख टनांच्या दरम्यान हरभरा साठा आहे. हा साठा नाफेड बाहेर काढू शकते. त्यामुळं व्यापारी आवश्यकतेप्रमाणं व्यवहार करत आहेत. परिणामी हरभऱ्याचे दर दबावात आहेत. शुक्रवारी देशातील प्रमुख बाजारांमध्ये हरभऱ्याला प्रति क्विंटल ४ हजार ६०० ते ५ हजार रुपये दर मिळाला. हा दर टिकून राहण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.

उडदाचे दर वाढतील का ?

5. देशात सध्या उडदाचे दर (Udad Rate) तेजीत आहेत. बाजारातील कमी आवक (Udad Arrival) आणि घटलेल्या पेरणीमुळं (Udad Sowing) उडदाला आधार मिळाल्याचं जाणकारांनी सांगितलं. देशात आजपर्यंत उडदाचा पेरा गेल्या वर्षीपेक्षा सुमारे ५ टक्क्यांनी कमी आहे. यंदा मध्य प्रेदश, महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये उडदाची लागवड (Udad Cultivation) घटली. त्यातच पावसामुळे पिकाला फटका बसतोय. त्यामुळे उत्पादन कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारात उडदाचे दर तेजीत आहेत. तर बर्मा आणि म्यानमार या देशांतून आयात होणाऱ्या उडदाचेही दर चढे आहेत. आयात उडीद ७ हजार १०० ते ८ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल पडतोय.

देशातील काही बाजारांमध्ये सध्या नवीन उडदाची आवक सुरु झाली. मात्र मालामध्ये ओलावा अधिक येतोय. त्यामुळं या मालाचे दर हमीभावाच्या दरम्यान आहेत. मात्र ओलावा कमी झाल्यानंतर व्यापारी उडीद खरेदीत उतरतील. त्यामुळे पुढील काळात बाजारातील आवक वाढली तरी दर जास्त दबावात येणार नाहीत, असं जाणकारांनी सांगितलं. सध्या देशातील बाजारांमध्ये उडदाला ७००० ते ८ हजार १०० रुपये दर मिळतोय. मध्य प्रदेशात ७ हजार ते ७ हजार ९०० रुपयाने उडदाचे व्यवहार होत आहेत. तर महाराष्ट्रात ७ हजार ते ७ हजार ५०० रुपये दर मिळतोय. यंदा उडदाचे सरासरी दर ७ हजार रुपयांच्या दरम्यान राहतील, असा जाणकारांचा अंदाज आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com