बाजार समिती अनधिकृत लिंबे फळे विक्रेत्यांवर कारवाई

गेली अनेक वर्षांपासुन पुणे बाजार समितीमध्ये अनधिकृतपणे लिंबे आणि फळे विक्री करणाऱ्या सुमारे १०० विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
Pune APMC
Pune APMCAgrowon

पुणे ःगेली अनेक वर्षांपासुन पुणे बाजार समितीमध्ये अनधिकृतपणे लिंबे (Lemon) आणि फळे विक्री (Fruit Seller) करणाऱ्या सुमारे १०० विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे वाहतुकीस होणारा अडथळा दूर होण्याबरोबरच अनधिकृत व्यवयासाद्वारे होणारी मुजोरी मोडण्यात बाजार समितीला यश आले आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीला प्रशासक मधुकांत गरड (Madhukant Garad) यांनी धडक कारवाई करत दिलासा दिला आहे.

Pune APMC
Lemon : अकोला जिल्ह्यात रुजतेय लिंबाचे हस्त बहर तंत्र

यावेळी बाजार समितीचे सचिव राम घाडगे, अतिरिक्त सचिव नितीन रासकर, फळे भाजीपाला विभाग प्रमुख बाबा बिबवे, कांदा बटाटा विभाग प्रमुख दत्ता कळमकर, आडते असोसिएशचे अध्यक्ष बापु भोसले, सचिव करण जाधव, माजी अध्यक्ष विलास भुजबळ, कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष नांगरे आदी उपस्थित होते.

Pune APMC
APMC : बाजार समित्यांवर सगळ्याचं नेत्यांचा डोळा ?

कारवाई बाबतची माहिती प्रशासक गरड यांनी रविवारी (ता.२१) पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी गरड म्हणाले,‘‘ बाजार आवारात गेल्या अनेक वर्षांपासून अनधिकृतरित्या किरकोळ लिंबाची विक्री होत होती. या विक्रेत्यांची संख्या वाढून १०० पर्यंत गेली होती. हे विक्रेते पांढऱ्या पट्ट्या‍याच्या बाहेर बसून विक्री करत असल्‍याने, त्याचा शेतमाल वाहतुक करणाऱ्या शेतकरी आणि ग्राहकांच्या वाहनांना अडथळा निर्माण करत होते.

अनेक वेळा शेतमालाची वाहने लावण्यासाठी देखील ते अडचणीचे ठरत होते. यामुळे वाहतुक कोंडीचा प्रश्‍न देखील निर्माण झाला होता. या समस्येबाबत आडते असोसिएशनसह विविध बाजार घटकांनी कारवाईची मागणी केली होती. यासाठी लिंबे विक्रेत्यांच्या बैठका घेऊन, त्यांना ते बेकायदेशीररित्या विक्री करत असल्याचे समजावून सांगितले. अनेक दिवस त्यांच्याशी संवाद साधत त्यांना व्यवसायास मज्जाव करण्यात आला आहे. यामुळे अनेक वर्षांपासून सुरु असलेली बेकायदा लिंबू विक्री बंद करण्यात आली आहे. ही कारवाई नियमितपणे राबविण्यात येणार आहे.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com