Cotton Rate : समाज माध्यमात फिरणारे बाजार दर फसवे

गेल्या काही वर्षांत हंगामात बाजारातील दरांच्या पावत्या समाज माध्यमात धुमाकूळ घालताना दिसतात. बाजारात क्विंटल-दोन क्विंटल मालाला उच्चांकी दर देऊन त्याच्या पावत्या जाणीवपूर्वक प्रसारित केल्या जातात.
Fake Market Rate
Fake Market RateAgrowon

अकोला ः गेल्या काही वर्षांत हंगामात बाजारातील दरांच्या (Fake Market Rate) पावत्या समाज माध्यमात धुमाकूळ घालताना दिसतात. बाजारात क्विंटल-दोन क्विंटल मालाला उच्चांकी दर देऊन त्याच्या पावत्या जाणीवपूर्वक प्रसारित केल्या जातात. काही पावत्यांवर तर खोडाखोड करून दर वाढवण्यात येत असल्याची शंका वारंवार व्यक्त केली जात होती.

Fake Market Rate
Cotton Rate : पांढऱ्या सोन्याची झळाळी कायम

जिल्ह्यातील कापूस बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या अकोट बाजार समितीने या प्रकाराला आक्षेप घेत थेट पोलिसांत तक्रार केली. चुकीची कापूस भावाची सौदापट्टी व्हाटसॲपग्रुपवर प्रसारित करणाऱ्यांविरुद्ध थेट कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Fake Market Rate
Cotton Rate : मानवत बाजार समितीत लिलावाद्वारे कापूस खरेदी सुरु

अकोट बाजार समितीचे सचिव सुधाकर किसनराव दाळू यांनी नुकतीच अकोट पोलिसांत या बाबत लेखी तक्रार केली. या अनुषंगाने त्यांनी म्हटले की, ४ नोव्हेंबरला बाजार समितीच्या यार्डवर कापूस लिलावात ८२०० ते ८८४५ या दराने कापूस विक्री झाला. मात्र जुन्या सौदापट्टीवर तारखेत बदल करून ४ नोव्हेंबरला कापूस बाजार भाव १०१४० करण्यात आला होता.

Fake Market Rate
Cotton Rate : देशातील कापूस उत्पादन खरंच वाढणार का ?

यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. चुकीची सौदापट्टी व्हाटसॲप ग्रुपवर शेतकऱ्यांपर्यंत पोचवली जात आहे. अशा प्रकारची चुकीची माहिती प्रसारित करणाऱ्या व्यक्तींवर कार्यवाही करण्याची मागणीच दाळू यांनी केली आहे.

शेतकऱ्यांची होते फसवणूक

या भागात काही बाजारात सोयाबीन, कापसाला उच्चांकी दर दिल्या गेल्‍याच्या पावत्या सातत्याने फिरतात. मात्र, हा दर त्या दिवशी मोजक्याच मालाला दिलेला राहतो. उर्वरित हजारो क्विंटल माल कमी दराने विक्री होतो. असे असताना केवळ उच्चांकी दर मिळाल्याच्या पावत्या समाज माध्यमातून फिरल्याने शेतकऱ्यांची एक प्रकारे फसवणूक होते. बाजारात माल विक्रीला नेलेल्या सर्वसामान्यांच्या पदरात कमी दर मिळाल्यानंतर निराशा पसरते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com