इंडोनेशियातील २ लाख टन पामतेल भारताकडे रवाना

खाद्यतेलाच्या किमतीत घट झाल्यास खाद्यान्न आणि इंधन दरवाढीने त्रस्त झालेल्या भारत सरकारला काहीसा दिलासा मिळेल. मार्च महिन्यात ७.६८ टक्क्यांवर असलेल्या खाद्य महागाईने एप्रिल महिन्यात ८.३८ टक्क्यांवर झेप घेतली होती.
इंडोनेशियातील २ लाख टन पामतेल भारताकडे रवाना
Palm OilAgrowon

इंडोनेशियातुन रवाना झालेले २ लाख टन क्रूड पाम तेल येत्या आठवड्यात भारतात दाखल होणार आहे. त्यामुळे देशातील खाद्यतेलाचा साठा वाढेल आणि किमतीही उतरतील, असा विश्वास व्यापारी सूत्रांनी व्यक्त केला आहे.

इंडोनेशियाने २३ मे २०२२ रोजी पाम तेलाच्या निर्यातीवर घातलेली बंदी उठवली. त्यानंतर सोमवारी (दिनांक २४ मे) कच्च्या पाम तेलाचा साठा जहाजाद्वारे भारताकडे रवाना करण्यात आला आहे. या आठवड्याच्या अखेरीस हा साठा भारतात दाखल होईल. १५ जून अखेरपर्यंत हे खाद्यतेल किरकोळ बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असेल, असे सनवीन समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप बाजोरिया म्हणाले आहेत.

कच्च्या पाम तेलाच्या किमती उतरल्याने साबण, वनस्पती तूप, शँम्पो, बिस्किट्स, चॉकलेट्स इत्यादींच्या किमतीत घट होण्याची शक्यता या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली आहे. २८ एप्रिलला इंडोनेशियाच्या पामतेलाच्या निर्यातीवर बंदी घातली. त्यामुळे देशभरात खाद्यतेलाच्या किमतींचा भडका उडाला. भारताकडून १३० ते १३५ लाख टन खाद्यतेलाची आयात केली जाते. ज्यातील ८० ते ८५ लाख टनांची अथवा ६५ टक्के आयात पाम तेलाची असते. त्यातील ४५ टक्के पामतेल हे इंडोनेशिया आणि मलेशियाकडून आयात केल्या जाते.

अलीकडच्या काही आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारातील सर्वच प्रकारच्या खाद्यतेलाच्या किंमती नरमल्या आहेत. मात्र भारतीय रुपयाचे अवमूल्यन झाल्याने भारताला त्याचा लाभ होऊ शकत नसल्याचे जेमिनी एडिबल ऑइल अँड फॅट्सचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप चौधरी यांनी म्हटले आहे. असे असले तरी खाद्यतेलाचे दर स्थिर आहेत. रशिया आणि अर्जेन्टिनामधून येणारा सूर्यफूल तेलाचा पुरवठा वाढला असून देश आपली खाद्यतेलाची गरज भागवू शकतो, असेही चौधरी यांनी नमूद केले आहे.

खाद्यतेलाच्या किमतीत घट झाल्यास खाद्यान्न आणि इंधन दरवाढीने त्रस्त झालेल्या भारत सरकारला काहीसा दिलासा मिळेल. मार्च महिन्यात ७.६८ टक्क्यांवर असलेल्या खाद्य महागाईने एप्रिल महिन्यात ८.३८ टक्क्यांवर झेप घेतली होती. पुरवठा साखळी सुरळीत झाल्याने २०२२-२०२३ च्या मध्यात पाम तेलाच्या किंमतीत घट होण्याचा अंदाज क्रिसिल रिसर्चचे संचालक पुषण शर्मा यांनी वर्तवला आहे.

रुपया घसरलेला असला तरीही येत्या २ ते ३ महिन्यांनी पामतेलाच्या किमती घसरल्याचा लाभ बिस्कीट, चॉकलेट उत्पादन क्षेत्रात दिसून येईल, असा विश्वास व्यक्त करतानाच शर्मा यांनी हा लाभ उत्पादकांपुरताच सीमित राहणार असून ग्राहकांना त्याचा लाभ होण्याची शक्यता नाकारली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com