Cotton Market : जागतिक कापूस उत्पादन खरंच वाढलं का?

अगदी मागील आठवड्यापर्यंत कापूस बाजार व्यवस्थित सुरु होता. कापूस दरात वाढही झाली. मात्र चीनमध्ये अचानक कोरोना वाढला आणि बाजारात चर्चा सुरु झाली.
कापूस उत्पादकांना जागतिक व्यापारात उतरण्याची संधी
कापूस उत्पादकांना जागतिक व्यापारात उतरण्याची संधीAgrowon

………….
अनिल जाधव
पुणेः यंदा जागतिक कापूस उतापादन (Cotton Production) वाढेल, असा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाने (USDA) जाहीर केला. तसेच वापरही कमी राहील, असे म्हटले होते. जागतिक कापूस वापरावर यंदा वाढलेली महागाई (Inflation) आणि कोरोना (Corona) स्थितीचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अगदी मागील आठवड्यापर्यंत कापूस बाजार व्यवस्थित सुरु होता. कापूस दरात वाढही झाली. मात्र चीनमध्ये अचानक कोरोना वाढला आणि बाजारात चर्चा सुरु झाली. पण कापसाच्या वायदेबाजारावर त्याचा सध्यातरी परिणाम जाणवत नाही. पण भविष्यात कोरोना परिस्थिती वाढल्यास त्याचा काहीसा परिणाम होऊ शकतो. मात्र बाजारात सध्या चर्चा सुरु आहे त्या प्रमाणात बाजारात बाजार पडेल, असे सध्यातरी वाटत नाही.

कारण यंदा जसे कापूस मागणीच्या बाजुने अडचणी आहेत तसेच पुरवठ्याच्या बाजुनेही मर्यादा आहेत. त्यामुळे जगतिक कापूस मागणी आणि पुरवठा कसा आहे? कापूस उत्पादनाचे ताजे अंदाज काय आहेत? जर, तरच्या परिस्थितीत बाजार कसा राहू शकतो? याचा घेतलेला आढावा

जगात यंदा महत्वाच्या कापूस उत्पादक देशांमध्ये पिकाला कमी पाऊस, अतिवृष्टी आणि दुष्काळाचा फटका बसला. परिणामी अमेरिकेच्या कृषी विभागाने यंदा जागतीक कापूस उत्पादनाचा अंदाज यंदा वाढवला आहे.

………..
अंस राहील उत्पादन
मागील हंगामात म्हणजेच २०२१-२२ मध्ये जगात कापसाचे एकूण उत्पादन १ हजार ४६० लाख गाठींवर झाले होते. मात्र यंदा उत्पादन १८ लाख गाठींनी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यंदाचे कापूस उत्पादन १ हजार ४७८ लाख गाठींवर स्थिरावेल, असा अंदाज आहे. जागतिक कापूस उत्पादनचा विचार करता २०२०-२१ पासून सलग दुसऱ्या वर्षी घट झाली आहे.

…………..
वापर घटणार
यंदा जागतिक कापूस उत्पादन वाढणार आहे. मात्र जागतिक कापूस वापर कमी होईल, असं युएसडीएनं म्हटले आहे. मागील हंगामात जगात १ हजार ४९० लाख गाठी कापसाचा वापर झाला होता. मात्र यंदा कापूस वापर १ हजार ४१८ लाख गाठींवरच स्थिरावेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

कापूस उत्पादकांना जागतिक व्यापारात उतरण्याची संधी
Cotton Market : ‘सीसीआय’ची कलदगावात कापूस खरेदी; आठ हजार दर


कोणता देश सर्वाधिक उत्पादन घेतो
चीन भारतापेक्षा जास्त कापूस उत्पादन घेतो. सध्या एकूण जागतिक कापूस उत्पानदात चीनचा वाटा २५ टक्क्यांवर आहे. त्यानंर भारतही याचदरम्यान उत्पादन घेतो. अमेरिका १२.६९ टक्के कापूस उत्पादीत करतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com