गव्हाच्या व्यापारी आणि निर्यातदारांमध्ये वाद

गव्हाच्या निर्यातबंदीमुळे व्यापारी आणि बहुराष्ट्रीय कंपनी यांच्यात वाद निर्माण झाले आहेत. आता हे वाद न्यायालयापर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.
गव्हाच्या व्यापारी आणि निर्यातदारांमध्ये वाद
Wheat traders and exportersAgrowon

गव्हाच्या निर्यातबंदीमुळे (Wheat Export ban) व्यापारी आणि बहुराष्ट्रीय कंपनी यांच्यात वाद निर्माण झाले होते. आता हे वाद न्यायालयापर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. निर्यातबंदीचा आदेश पुढे करत व्यापाऱ्यांचा माल खरेदी करणे बहुराष्ट्रीय व्यापार कंपन्यांनी थांबवले आहे.

बहुराष्ट्रीय कंपन्या निर्यात बंदीच्या सरकारी आदेश आणि करारांना पुढे करत आहेत. तर व्यापारी म्हणतात आम्ही गहू निर्यात करत नाहीत तर बहुराष्ट्रीय कंपन्यांना विकत आहोत. त्यामुळे दोघांतील वाद आता न्यायालयापर्यंत पोहचला.

Wheat traders and exporters
गव्हाच्या निर्यातबंदीत शिथिलता; इजिप्तला जणाऱ्या खेपेस परवानगी

बहुराष्ट्रीय कंपन्यांनी व्यापाऱ्यांसोबत केलेले खरेदीचे करार रद्द केल्याचेही व्यापारी सांगत आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी व्यापारी कायदेशीर मार्गाने जाण्याचा विचार करत आहेत. मात्र छोट्या व्यापाऱ्यांना या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या विरोधात न्यायालयात जाणे शक्य नसल्याचेही व्यापारी सांगत आहेत.

निर्यातबंदीच्या निर्णयामुळे व्यापारी आणि निर्यातदार यांच्यातील संबंध बिघडले आहेत. तर निर्यातदार म्हणतात त्यांचे हात सरकारी निर्णयामुळे बांधले गेले आहेत.

त्रिवेदी ट्रेडर्सचे मनीष अग्रवाल सांगतात, “आम्ही ११ मे रोजी मालगाडीमध्ये माल भरला होता. मात्र त्यानंतर अचानक आम्हाला नोटीस पाठवण्यात आली, ज्यामध्ये खरेदीचे सर्व व्यवहार रद्द झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे आमचे नुकसान झाले आहे.” मागच्या आठवड्यात केंद्र सरकारने गव्हाची निर्यात बंद केली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com