कळमणा बाजारात टोमॅटो दरात सुधारणा

आवक स्थिर असताना टोमॅटोच्या दरात मात्र तेजी अनुभवली जात आहे. कळमना बाजार समितीत गेल्या आठवड्यात टोमॅटोचे दर २५०० ते ३००० रुपये प्रति क्विंटल होते.
Tomato Rate
Tomato Rate Agrowon

नागपूर : आवक स्थिर असताना टोमॅटोच्या दरात मात्र तेजी अनुभवली जात आहे. कळमना बाजार समितीत गेल्या आठवड्यात टोमॅटोचे दर २५०० ते ३००० रुपये प्रति क्विंटल होते. आता हे दर ४५०० ते ५५०० रुपये पोहोचल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. बाजारात टोमॅटोची आवक ५०० क्विंटलच्या घरात आहे.

व्यापारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजारात होणारी टोमॅटोची आवक ही नागपूर, भंडारा तसेच मध्यप्रदेशच्या काही जिल्ह्यातून होत आहे. तापमानात झालेली वाढ त्यासोबतच वाढती मागणी या कारणामुळे दर वधारल्याचे सांगण्यात आले. बाजारात चवळी शेंगांची पन्नास क्विंटल आवक असून गेल्या आठवड्यात १५०० ते २००० रुपये असा दर होता. या आठवड्यात चवळी शेंगच्या दरात सुधारणा होत हे दर २००० ते २२०० रुपयांवर पोहोचले. बाजारातील भेंडीची आवक १०० क्विंटल तर दर १५०० ते २००० रुपये होते. गेल्या आठवड्याच्या तुलनेत भेंडीच्या दरात घसरण झाल्याची माहिती आहे. २५०० ते ३००० रुपयांपर्यंत भेंडीचे दर पोहोचले होते.

Tomato Rate
शेतकरी पीक नियोजन : टोमॅटो

गवार शेंग देखील बाजारात नियमित दाखल होत आहे. या शेंगांची आवक १०० क्विंटल असून गेल्या आठवड्यात २५०० ते २७०१ असा दर होता. या आठवड्यात गवार शेंगाचे दर २५०० ते ३००० रुपयांवर पोहोचले आहेत. बाजारातील वाल शेंगांची आवक १५ क्विंटल आहे. वाल शेंगाचे दर गेल्या आठवड्यात ४००० ते ४५०० असे होते आता दरात सुधारणा होत ४५०० ते ५५०० रुपये झाले आहेत. व्यापारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कच्च्या पपईची आवक तीस क्विंटलची आहे. १२०० ते १५०० असा दर पपईवा मिळत आहे. हिरव्या मिरचीचे गेल्या आठवड्यात २००० ते २५०० या दराने व्यवहार झाले आता दरात सुधारणा होत ३५०० ते ४००० रुपये असा दर मिळत आहे. ढोबळी मिरचीची आवक १०० क्विंटल तर दर ३००० ते ४००० असे आहेत.

कोथिंबीर आवक १५० क्विंटल आणि दर २५०० ते ३००० रुपये असे नोंदविण्याय आले. दुधी भोपळा आवक २५० क्विंटल आणि दर ८०० ते १००० रुपये असा होता. कारली आवक १०० क्विंटल आणि दर २००० ते २५०० असा मिळाला. फुलगोबीची आवक ४५० क्विंटल आणि दर १८०० ते २००० रुपये असा होता.

भुसार बाजार स्थिती
बाजारात ज्वारीची आवक तीन क्विंटल तर २५०० ते २८०० दर ज्वारीला मिळाला. सरबती गव्हाची आवक १००० क्विंटल आणि दर २४०० ते २७०० असा होता. तांदुळाची आवक ४५ क्विंटल तर दर २८०० ते ३२०० असा होता. बाजारात हरभऱ्याची नियमित आवक असून ती २६८६ क्विंटल आहे. हरभऱ्याचे दर ४००० ते ४२३४ असे स्थिर आहेत अशी माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. तुरीचे व्यवहार ५९०० ते ६२०० रुपये याप्रमाणे झाले. बाजारात तुरीची आवक ६४४ क्विंटल इतकी होती. मुगाची आवक ७० क्विंटल असून दर ४८०० ते ६००० रुपये आहेत. बाजारातील सोयाबीनचे व्यवहार ५६०० ते ६८५० रुपये होत असून आवक ४३६ क्विंटल आहे

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com