Marigold Rate : शिवार खरेदी, लिलावात मंदी; मात्र विक्रेत्यांची चांदी

झेंडू दराचा रंग फिका; व्यापारी आणि विक्रेत्यांनी साधले दर
Marigold Rate
Marigold RateAgrowon

नाशिक : चालू वर्षी अतिवृष्टी (Wet Drought) व संततधार पावसामुळे (Heavy Rainfall) झेंडू लागवडीचे (Marigold Sowing) मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामुळे दसरा सणाला झेंडूच्या फुलांनी चांगलाच भाव खाल्ला. पुढेही दिवाळी बाजारात दर चढेच राहतील अशी अपेक्षा होती. मात्र शेतकऱ्यांकडून फुलांची खरेदी ३० रुपयांच्या खाली खरेदी केली गेली. त्यामुळे शिवार खरेदी, बाजारातील लिलावात मंदी राहिली.

Marigold Rate
Satana APMC : सटाणा बाजार समितीत कांद्याचा ट्रॅक्टर चोरीचा प्रयत्न

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी (ता. २४) दुपारनंतर व्यापारी व किरकोळ विक्रेत्यांनी सकाळी १०० रुपयांपासून ते दुपारनंतर ४०० रुपयांपर्यंत विक्री केली. त्यामुळे पिकवणारा अडचणीत तर विकणारे मालामाल झाले.

मागील दोन वर्षांत शेतकऱ्यांनी लागवडी करूनही कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बाजारात निर्बंध असल्याने अपेक्षित उठाव नव्हता. वातावरण निवळल्याने बाजारात गर्दी होऊ लागल्याने दोन पैसे होतील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र ही आशा फोल ठरली आहे. चालू वर्षी दसऱ्याला किलोमागे २० ते २५ रुपये अधिक दर मिळाल्याने ४० ते ८५ रुपये प्रतिकिलो दराने विक्री झाली. मात्र दिवाळी बाजारात किलोमागे ३० ते ४० रुपयांनी दर घसरल्याचे पाहायला मिळाले.

नाशिक शहरातील पंचवटी परिसरात वाहनांमधून आवक झाली होती. थेट विक्रीत ८० ते ते १५० रुपये प्रतिक्रेटप्रमाणे झेंडू उत्पादकांनी विक्री केली. तर किरकोळ विक्रीत हीच फुले १०० ते ३०० रुपयांपर्यंत विकले गेले.

प्रतवारीचा दरावर परिणाम

पावसामुळे फुले काळी पडल्याने प्रतवारीचाही मोठा परिणाम होताच. मात्र या शेतकऱ्यांनी चांगला मार्ग काढत माल तयार केला. असे असताना दिवाळी बाजारात विक्रीत अपेक्षित परतावा मिळालेला नाही. त्यामुळे दिवाळीचा बाजार या वर्षी उत्पादकांसाठी अडचणीचा तर विक्रेत्यांसाठी फायद्याचा राहिल्याची एकंदर स्थिती होती.

चांदवड बाजार समितीच्या झेंडू खरेदी विक्री केंद्राची दरस्थिती

तारीख. . .लाल...पिवळा...कलकत्ता

२२...१५...१५...१९

२३...२४...२२...०

२४...२२...२४...०

लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी स्थानिक बाजारात दरात काही अंशी तेजी दिसून आली. मात्र नंतर आवक वाढल्याने दर कमी झाले. गुजरातमध्ये पाडव्याच्या मागणीमुळे दर थोडेफार टिकून राहिले. अन्यथा, मोठी घसरण झाली असती. शेतकऱ्याच्या एकीकडे उत्पादन घटले. मात्र अपेक्षित परतावा मिळाल्याचे दिसून आले नाही.

- सुनील जगताप, फूल व्यापारी व आडतदार, चांदवड

व्यापाऱ्यांनी २० ते २५ रुपये प्रति किलोने जागेवर लूट भावात शिवार खरेदी केली. हीच फुले चढ्या भावाने विक्री केली. दिवाळीचा बजार उत्पादक शेतकऱ्यांसाठी अडचणीचा राहिला.

- ज्ञानेश्‍वर भिका शिंदे, झेंडू फूल उत्पादक, सुभाषनगर, ता. देवळा

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com