गुजरातमध्ये यंदा विक्रमी १० लाख हेक्टरवर उन्हाळी पिकांची पेरणी

गुजरातमध्ये यावर्षी कडधान्ये, तेलबिया , तृणधान्ये आणि भाजीपाला या उन्हाळी पिकांची विक्रमी पेरणी क्षेत्रात वाढ झाली आहे.
Summer Crop Sowing
Summer Crop SowingAgrowon

गुजरातमध्ये यावर्षी कडधान्ये, तेलबिया , तृणधान्ये आणि भाजीपाला या उन्हाळी पिकांची विक्रमी पेरणी (Record Sowing Of Summer Crop) क्षेत्रात वाढ झाली आहे. पुरेशा पाण्याची उपलब्धता आणि मागणी वाढल्याने पिकांच्या किमतींमध्ये झालेली वाढ हे या मागचे कारण आहे. (Summer Sowing In Gujarat)

Summer Crop Sowing
उन्हाळ कांद्याची एकरी उत्पादकता घटणार?

फायनान्शियल एक्सप्रेसने ही बातमी दिली आहे. गुजरात सरकारच्या कृषी मंत्रालयाच्या (Gujarat Agriculture Ministry) आकडेवारीनुसार, चालू उन्हाळ हंगामात उन्हाळी पिकांच्या लागवडीखालील क्षेत्राने १० लाख हेक्टरचा टप्पा पार केला आहे. गेल्या तीन वर्षाच्या सरासरी ८.९ लाख टनांच्या तुलनेत यंदा पेरणी क्षेत्रात २३ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या हंगामात गुजरातेत ८.१ लाख हेक्टर क्षेत्रावर उन्हाळ पिकांची पेरणी झाली होती.

Summer Crop Sowing
नाशिकमधील उन्हाळ कांद्याचा साठा अखेरीकडे

गुजरातमध्ये कडधान्यांच्या पेरणीखालील क्षेत्र तीन वर्षांच्या सरासरी ५४ हजार हेक्टरच्या तुलनेत ९० हजार हेक्टरवर पोहोचले आहे. गेल्या उन्हाळी हंगामात संपूर्ण गुजरातमध्ये ६३ हजार हेक्टरवर कडधान्यांची पेरणी (Summer Pulses Sowing) झाली होती. तर तेलबियांचे पेरणी क्षेत्र (Summer Oil Seed Sowing) एक लाख हेक्टरवरून १.६ लाख हेक्टरवर पोहोचले आहे. तीळाच्या पेरणी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने तेलबियांचे क्षेत्र वाढले आहे. याशिवाय, राज्यात भूईमुगाचे पेरणी क्षेत्रदेखील ४९ हजार २०० हेक्टरवरून ६० हजार हेक्टरपर्यंत वाढले आहे. विशेषत: सौराष्ट्र आणि उत्तर गुजरातमध्ये भूईमुगाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.

पिकांनी मिळणारी किमान आधारभूत किंमत, विविध शेतमालांना मिळणारा उच्च बाजारभाव आणि पाण्याची उपलब्धता यामुळे राज्यातील उन्हाळी पेरणी क्षेत्रात वाढ होत आहे. गेल्या वर्षी राज्यातील काही भागात मॉन्सून लांबल्यामुळे शेतकरी तीनही हंगामात पिके घेत आहेत, असे गुजरात कृषी विभागाचे सहसंचालक सी.एम. पटेल यांनी म्हटले आहे.

खेडूत एकता मंचचे विश्वस्त सागर राबरी यांच्या मते, या उन्हाळी हंगामात राज्यातील शेतकऱ्यांचा कडधान्य पिकांकडे ओढा आहे. कारण गेल्या दोन वर्षात कडधान्य पिकांमधून त्यांना चांगले उत्पन्न मिळाले आहे. याशिवाय राज्यातील काही शेतकरी उन्हाळी सोयाबीनचा प्रयोग करत असल्याचेही राबरी यांनी नमूद केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com