ऊस गाळप हंगाम समाप्त

१३२० लाख टन उसाचे गाळप; १३७.२७ लाख टन साखर तयार
ऊस गाळप हंगाम समाप्त
SugarcaneAgrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
पुणे ः राज्यातील २०० पैकी १९८ साखर कारखान्यांची (Sugar Factory) धुराडी बंद झाली आहे. १३२० लाख टन उसाचे (Sugar) यशस्वी गाळप केले आहे. आतापर्यंत १३७.२७ लाख टन साखर तयार झाली आहे.

कोल्हापूर विभागातील सर्व म्हणजे ३६, पुणे विभागातील ३० पैकी २९, सोलापूर विभागातील ४७, नगर विभागातील २८ तर औरंगाबाद विभागातील २५ पैकी २४ साखर कारखाने बंद झालेले आहेत. नांदेडमधील सर्व म्हणजे २७, अमरावतीमधील ३ तर नागपूरमधील चारही कारखाने बंद झालेले आहेत.

राज्यात आता राजगड सहकारी साखर कारखाना (अनंतनगर, ता. भोर) व संत मुक्ताईनगर शुगर अॅन्ड एनर्जी (घोडसगाव, ता. मुक्ताईनगर) यासह औरंगाबाद विभागातील एक कारखाना अजून काही दिवस चालू राहण्याची शक्यता आहे. “नियोजनाप्रमाणे राज्यातील सर्व उसाचे गाळप झालेले आहे.

मराठवाड्यासह आता कोणत्याही भागात गाळपाविना ऊस शिल्लक नाही. काही भागातील उर्वरित ऊस गाळण्यासाठी दोन कारखाने पुढील २-३ दिवस चालू राहतील,” अशी माहिती साखर आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.

२०० कारखान्यांचा गाळपात सहभाग
राज्यात यंदा १०१ सहकारी आणि ९९ खासगी अशा एकूण २०० कारखान्यांनी गाळपात भाग घेतला. यातील १९८ साखर कारखाने १३ जूनअखेर बंद झालेले आहेत. गेल्या हंगामात याच कालावधीत १९० कारखाने बंद झालेले होते. गेल्या हंगामात राज्यात १०१३ लाख टन ऊस गाळप करून १०६.४० लाख टन साखर तयार केली गेली होती.

राज्यातील साखर कारखाने, साखर आयुक्तालय, राज्य शासनाची यंत्रणा आणि शेतकरी यांच्या उत्तम समन्वयातून यंदाचा ऊस गाळप हंगाम यशस्वीपणे पार पडला आहे. शेतकऱ्यांना सर्वाधिक एफआरपी पेमेंट करून देणारा हंगाम म्हणून यंदाच्या गाळपाची नोंद राज्याच्या साखर उद्योगाच्या इतिहासात होईल.”
- शेखर गायकवाड, साखर आयुक्त.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com