‘सुमील केमिकल’ ची पेटंटप्राप्त दोन उत्पादने बाजारात दाखल

सुमील केमिकल इंडस्ट्रीज प्रा. लि. यांनी पेटंटप्राप्त अशी दोन उत्पादने बाजारात आणली आहे.
‘सुमील केमिकल’ ची पेटंटप्राप्त दोन उत्पादने बाजारात दाखल
Sumeel ChemicalAgrowon

सुमील केमिकल इंडस्ट्रीज प्रा. लि. यांनी पेटंटप्राप्त अशी दोन उत्पादने बाजारात आणली आहे. ट्रायोन झेड एफ एस आणि ब्लॅकबेल्ट यांचे अनावरण संचालक सुकेतू दोशी, राष्ट्रीवय व्यवसाय व्यवस्थापक एन. बी. पटेल, पीक संरक्षण प्रमुख राधेश्याम, डिजिटल मार्केटिंग प्रमुख महेश सोनवणे, वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक विशाल वरवंटे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील अधिकारी वर्ष आणि २०० हून अधिक व्यावसायिक भागीदार उपस्थित होते.

या वेळी बोलताना सुकेतू दोशी यांनी सांगितले की, पेटंटप्राप्त ‘ट्रायोन झेडएफएस’ हे डब्ल्यूजी तंत्रज्ञानामधील जगातील पहिले कीटकनाशक आणि पोषक द्रव्यांचे अद्वितीय संयोजन आहे. यात वनस्पतीच्या सुरक्षितता आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी निष्क्रिय घटकाऐवजी सल्फर (७०%) आणि झिंक ऑक्साइड (१३%) वापरले आहे. तर ‘ब्लॅकबेल्ट’ हे ड्राय कॅप तंत्रज्ञान असलेले उत्पादन पिकांला हानिकारक किडीमुळे होणाऱ्या परिणामाचा प्रतिकार करण्यास सक्षम बनवते. हे उत्पादन पर्यावरणपुरक असून, अवशेष राहत नसल्याचा दावा त्यांनी केला.

या उत्पादनाच्या चाचण्या विश्वभारती विद्यापीठ (पश्चिम बंगाल), अन्नामलाई विद्यापीठ (तमिळनाडू), डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (दापोली, महाराष्ट्र) येथे करण्यात आल्या असून, सकारात्मक परिणाम मिळाले आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com