‘कोरोमंडल’ च्या पाली युनिटमधून ‘एसएसपी’चा पहिला ट्रक रवाना

फॉस्फेटिक खत निर्मिती आणि विपणन करणारी देशातील महत्त्वाची कोरोमंडल इंटरनॅशनल लि. (Coromandel International ltd) ही कंपनी महाराष्ट्रात सक्रिय आहे.
Coromandel
CoromandelAgrowon

पाली (जि. रायगड)ः कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड (Coromandel International ltd) यांच्या पाली (जि. रायगड) येथील युनिटमध्ये नुकताच नव्या तंत्रज्ञानाच्या साह्याने कायापालट करण्यात आला. या नव्या तंत्रज्ञानाच्या साह्याने ग्रोमोर सिंगल सुपर फॉस्फेट या खताच्या उत्पादनाचा पहिला ट्रक शुक्रवारी (ता. १५ जुलै) कोल्हापूर बाजारपेठेतील व्यापारी पारसेवर कृषी सेवा केंद्राच्या मागणीनुसार रवाना करण्यात आला.

यावेळी आयोजित केलेल्या विशेष सोहळ्यामध्ये कंपनीचे एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट कालिदास प्रामाणिक, एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट अमिर अल्वी, असोसिएट व्हाइस प्रेसिडेंट डॉ. बिनय परिदा, सिंगल सुपर फॉस्फेट उत्पादन प्रमुख राजेश पस्तिया आणि लॉजिस्टिक्स प्रमुख विवेक शर्मा असे कंपनीतील विविध मान्यवर उपस्थित होते.

फॉस्फेटिक खत निर्मिती आणि विपणन करणारी देशातील महत्त्वाची कोरोमंडल इंटरनॅशनल लि. ही कंपनी महाराष्ट्रात सक्रिय आहे. देशभरात ८ विविध ठिकाणी उत्पादन स्थळे असून, एकूण उत्पादनक्षमता १० लक्ष मेट्रिक टन इतकी आहे.

पाली युनिटची प्रति दिन २०० मेट्रिक टन सिंगल सुपर फॉस्फेट उत्पादनाची क्षमता आहे. या युनिटची उभारणी आणि कामकाज डिसेंबर २०२१ पासून विरेश सोनी पाहत आहेत. येथे लवकरच ‘ग्रोप्लस’ या वैशिष्ट्यपूर्ण खताचे उत्पादनही येथे घेण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याचे कालिदास प्रामाणिक यांनी सांगितले.

या युनिटमुळे विशेषतः पश्चिम महाराष्ट्र, लातूर विभाग आणि काही प्रमाणात मराठवाड्यापर्यंत ‘एसएसपी’ चा पुरवठा अधिक सोईस्कर होणार असल्याचे महाराष्ट्राचे असोसिएट व्हाइस प्रेसिडेंट जितेंद्र कोळपे यांनी प्रसंगी नमूद केले.या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र विभागामार्फत डीजीएम अरुण वाळूंज, डॉ. विनेश रेगे व ब्रँड मॅनेजर प्रबंध राऊळ यांनी कष्ट घेतले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com