उन्हाळ्यामुळे कळमना बाजारात भाजीपाला तेजीत

उन्हाळ्यामुळे भाजीपाला चांगलाच तेजीत आला आहे.
Vegetable Market
Vegetable MarketAgrowon

नागपूर : उन्हाळ्यामुळे भाजीपाला चांगलाच तेजीत आला आहे. कळमना बाजार समितीत गेल्या आठवड्यात आवक होणाऱ्या मुळ्याला १२०० ते १५०० असा प्रति क्विंटल असा दर होता. या आठवड्यात मात्र मुळ्याच्या दरात तेजी येत २५०० ते ३००० याप्रमाणे मुळ्याचे व्यवहार झाले. आवक गेल्या आठवड्यातील वीस किलोमीटरच्या तुलनेत ६० क्विंटल वर पोहोचली असताना देखील दरात तेजी आल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.

कळमना बाजार समितीत मुळ्यासोबत हिरवा भाजीपाला देखील भाव खाऊन जात आहे. मेथी गेल्या आठवड्यात २५०० ते ३००० रुपये प्रति क्विंटल होती. या आठवड्यात मेथीच्या दरात तेजी येत ३५०० ते ४००० रुपयांवर दर पोहोचले. मेथीची आवक ६० क्विंटल इतकी आहे. त्याच वेळी पालकांच्या दरात मात्र घसरण अनुभवण्यात आली. गेल्या आठवड्यात ७० क्विंटल आवक होणाऱ्या पालकाचे दर ३००० ते ३५०० रुपये होते. या आठवड्यात आवक ६० क्विंटल तर दर १५०० ते २००० रुपये होते. बाजारात कच्च्या आंब्याची आवक नियमित होत आहे. गेल्या आठवड्यात १४० क्विंटल आंबा आवक होती. चार हजार ते पाच हजार असा दर होता. या आठवड्यात आवक १२० क्विंटल तर दर ३५०० ते ४५०० रुपयांवर आले होते. फणसाची नियमित आणि मोठी आवक होत आहे. गेल्या आठवड्यात २५०० ते २८०० असा फणसाचा दर होता आवक ३२० क्विंटलची नोंदविण्यात आली. या आठवड्यात आवक २५० क्विंटल तर दर २५०० ते २७०० असा होता. गाजराच्या दरात मध्यंतरी तेजी अनुभवण्यात आली होती. १५०० ते २००० रुपयांवर दर पोहोचले होते. आता मात्र १२०० ते १४०० याप्रमाणे गाजराचे व्यवहार होत आहेत. बाजारातील काकडीची आवक २०० क्विंटल वर पोहोचली आहे. त्याच वेळी दर मात्र १२०० ते १४०० रुपये असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. पत्तागोबीची आवक ५५० क्विंटल तर दर ८०० ते १००० रुपयांवर स्थिर आहेत. बाजारातील कारल्याची आवक देखील नियमित होत असून ती १०० क्विंटलच्या घरात आहे. मध्यंतरी दरात घसरण झाली असताना आता कारल्याचे व्यवहार १८०० ते २००० रुपये प्रति क्विंटलने होत आहे. ढोबळी मिरची ३००० ते ३५०० रुपये असून आवक ८० क्विंटल आहे.

बाजारात ५०० क्विंटलच्या घरात सोयाबीनची आवक आहे. सोयाबीनला कमीत कमी ७३०० तर जास्तीत जास्त ७३३४ रुपये दर मिळत आहे. तुरीची आवक एक हजार क्विंटल आणि दर ६००० ते ६१५० रुपये होते. जवस आवक एक क्विंटलची तर दर ५००० ते ५२०० असा होता. हरभऱ्याला ४२३० ते ४४६४ असा दर मिळत ३००० क्विंटलची आवक नोंदविण्यात आली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com