Turmeric Market : हिंगोलीत हळदीचे कमाल दर ७००० रुपयांवर

Turmeric Rate : हिंगोली बाजार समितीअंतर्गत संत नामदेव हळद मार्केटमधील हळदीचे कमाल दर अनेक महिन्यांनंतर ७००० रुपयांवर पोहोचले आहेत.
Turmeric Market
Turmeric MarketAgrowon

Hingoli News : हिंगोली बाजार समितीअंतर्गत संत नामदेव हळद मार्केटमधील हळदीचे कमाल दर अनेक महिन्यांनंतर ७००० रुपयांवर पोहोचले आहेत. दरात सुधारणा झाल्यामुळे हळदीची आवक वाढली आहे.

मंगळवारी (ता. १६) हळदीची सुमारे १५०० क्विंटल आवक झाली. हळदीला प्रतिक्विंटल किमान ६१०० ते कमाल ७१०० रुपये, तर सरासरी ६६०० रुपये दर मिळाले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली

संत नामदेव हळद मार्केटमध्ये सोमवारी (ता. १५) हळदीची ५००० क्विंटल आवक झाली. हळदीला प्रतिक्विंटल किमान ६१०० ते कमाल ७३०० रुपये, तर सरासरी ६७०० रुपये दर मिळाले. शनिवारी (ता. १३) हळदीची १८०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ६००० ते कमाल ७२०० रुपये, तर सरासरी ६६०० रुपये दर मिळाले.

Turmeric Market
Turmeric Processing : बसमतमधील हळदीप्रक्रिया केंद्राचे उपकेंद्र दापोलीत

शुक्रवारी (ता. १२) हळदीची २५०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ५५४० ते कमाल ६६०० रुपये, तर सरासरी ६०७० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. ११) हळदीची ३००० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ५८०० ते कमाल ६९०० रुपये, तर सरासरी ६३५० रुपये दर मिळाले.

Turmeric Market
Turmeric Market : हळदीची ४५ ते ५५ लाख पोती विक्रीविना शिल्लक

हिंगोली जिल्ह्यासह मराठवाडा, विदर्भातील अनेक जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणावर हळदीची आवक होत असल्याने मे महिन्यापासून आठवड्यातील सोमवार ते शुक्रवार हे पाच दिवस हळदीची आवक घेतली जात आहे. गतवर्षी (२०२२) एप्रिल महिन्यात प्रतिक्विंटल सरासरी ७२९० रुपये मिळाले होते.

यंदा (२०२३) एप्रिल महिन्यात हळदीची २३ हजार ३२० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल सरासरी ५८९८ रुपये दर मिळाले. मे महिन्यात गेल्या तीन दिवसांत हळदीचे कमाल दर ७ हजार रुपयांवर पोहोचले आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

सध्या मोठ्या प्रमाणावर हळदीची आवक होत आहे. अवकाळी पावसात भिजल्याने हळदीचा दर्जा खालावला आहे. चांगल्या प्रतीच्या हळदीच्या दरात सुधारणा होऊन अनेक महिन्यांनंतर दर सात हजारांवर गेले आहेत.
- नारायण पाटील, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, हिंगोली

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com