बाजरी, ज्वारी, गहू स्थिर, हरभरा हमी दराच्या आतच

औरंगाबाद बाजार समितीमधील गत आठवडाभरात तुरीची केवळ दोन वेळा मिळून ३६ क्विंटल आवक झाली. अनुक्रमे आठ व २८ क्विंटल आवक झालेल्या तूरीला सरासरी ५ हजार ३७५ ते ५ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला.
Market Rate
Market RateAgrowon

औरंगाबाद: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवड्यात १६ ते २१ मे दरम्यान आवक झालेल्या बाजरी, ज्वारी व गव्हाचे दर स्थिर राहिले. तुरीलाही सहा हजाराच्या आतच दर मिळाला. तर हरभऱ्याचे दर हमी दरापेक्षा कमीच राहील्याची स्थिती होती.

औरंगाबाद बाजार समितीमधील गत आठवडाभरात तुरीची केवळ दोन वेळा मिळून ३६ क्विंटल आवक झाली. अनुक्रमे आठ व २८ क्विंटल आवक झालेल्या तूरीला सरासरी ५ हजार ३७५ ते ५ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. हरभऱ्याची आवक दोन वेळा मिळून आठ क्विंटल झाली. अनुक्रमे तीन व पाच क्विंटल आवक झालेल्या हरभऱ्याचे सरासरी दर ४१०० ते ४३०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान राहिले. बाजरीचे आठवड्यात तीन वेळा मिळून ४२८ क्विंटल आवक झाली.

८६ ते २०२ क्विंटल दरम्यान आवक झालेल्या बाजरीला सरासरी १९०० ते १९७० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. ज्वारीची चार वेळा मिळून १७८ क्विंटल आवक झाली. या ज्वारीचे सरासरी दर २०२५ ते २०७५ रुपये प्रतिक्विंटल दरम्यान राहिले. सोयाबीनची चार वेळा मिळून १२६ क्विंटल आवक झाली. ७ ते ५३ क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या सोयाबीनला ५ हजार ७८० ते ६२०९ रुपये प्रति क्विंटल दरम्यान सरासरी दर मिळाला.

गव्हाची आवक ४९६ क्विंटल झाली. ६० ते १३१ क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या गव्हाला सरासरी २१०० ते २१५० रुपये प्रति क्विंटल दरम्यानचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्यावतीने देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com