Onion : कांदाविक्री बंद आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद

उन्हाळ कांद्याला उत्पादन खर्चाच्या तुलनेत अपेक्षित दर मिळत नसल्याची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर २५ रुपये प्रतिकिलो दर मिळावा अन्यथा मंगळवारपासून (ता. १६) राज्यातील शेतकरी बेमुदत कांदाविक्री बंद करतील, असा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने दिला होता
Onion
OnionAgrowon

नाशिक : उन्हाळ कांद्याला उत्पादन खर्चाच्या (Onion Production Cost) तुलनेत अपेक्षित दर (Onion Rate) मिळत नसल्याची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर २५ रुपये प्रतिकिलो दर मिळावा अन्यथा मंगळवारपासून (ता. १६) राज्यातील शेतकरी बेमुदत कांदाविक्री बंद (Onion Sale Ban Movement) करतील, असा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने दिला होता; मात्र याच दिवशी पतेती सणामुळे काही बाजार समित्यांमध्ये कामकाज बंद होते. तर लासलगाव, पिंपळगाव बसवंत या प्रमुख बाजार समित्यांमध्ये आवक मोठ्या प्रमाणावर घटली. त्यामुळे आंदोलनाला संमिश्र यश आले; मात्र दरात कुठलीच सुधारणा दिसून आली नाही. बुधवारी (ता. १७) आवक पुन्हा वाढल्याचे दिसून आले.

जिल्ह्यात कांदाविक्री बंदच्या आवाहनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला; मात्र दरात घसरण झाल्याने फटका बसला. कांदा उत्पादक संघटनेने वातावरणनिर्मिती करूनही मागणीला अपेक्षित यश आले नाही. आर्थिक गरज असणाऱ्या शेतकऱ्यांनी हा कांदा बाजारात आणून विक्रीला पसंदी दिल्याचे दिसून आले.

Onion
Onion : कांदाविक्री बंदच्या मुद्द्यांवर शेतकऱ्यांत संभ्रम

जिल्ह्यात शनिवारी (ता. १३) लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याची आवक १८,४६८ क्विंटल झाली होती. त्यास प्रतिक्विंटल दर किमान ६०० कमाल १४५६ तर सरासरी १,१५१ रुपये मिळाले होते. तर मंगळवारी (ता. १६) आवक १,१८५ क्विंटल झाली होती. त्यास प्रतिक्विंटल दर किमान ५०० कमाल १,३०० तर सरासरी १,१२० रुपये मिळाले होते. त्यामुळे आवक कमी होऊनही दरात घसरण दिसून आली. बुधवारी (ता. १७) सकाळच्या सत्रात ९,१६५ क्विंटल आवक झाली. किमान ६०० आणि कमाल १,४६१ तर सरासरी १,१८० रुपये दर मिळाले. त्यामुळे आवक वाढ होऊन दरात सुधारणा झाल्याचे पाहायला मिळाले.

Onion
Onion : कांदा रोपवाटिकांची अतिपावसाने हानी

मंगळवारी (ता. १६) उमराणे, मनमाड, सिन्नर, चांदवड, अंदरसूल उपबाजार (येवला) येथे आवक दबावात राहिली. तर पतेतीमुळे कसमादे भागातील कळवण, नामपूर या बाजार बंद होते. केंद्र व राज्य सरकारचे कांदा उत्पादकांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी सुरुवातीला बेमुदत बंदची हाक दिली; मात्र नंतर प्रायोगिक तत्त्वावर कांदाविक्री बंद आंदोलन केले जाणार असल्याचे सांगत निर्णय बदलण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम होऊन काही अंशी फटका बसला.

कांदा दर वाढावे यासाठी आंदोलन पुकारले होते. पुरवठ्यावर परिणाम होऊन दर वाढतील, अशी रणनीती आखली होती; मात्र काही शेतकरी संघटनांनी त्यास विरोध करून फुगा फुटला.

- भारत दिघोळे, अध्यक्ष-महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना.

बाजार समित्यांमधील दर स्थिती (ता. १७)

बाजार समिती...किमान...कमाल...सरासरी

लासलगाव...६००...१,४६१...१,१८०

पिंपळगाव बसवंत...८००...१,७८०...१,२५०

मनमाड...७००...१,३८२...१,०५०

सटाणा...२००..१,४०५...१,०७५

चांदवड...८५२...१,३९२...१,१००

सिन्नर...३००...१,२८५...१,१००

देवळा...१००...१,३००...१,२००

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com