Vegetable : नगरला बटाटे, टोमॅटोची अधिक आवक

नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटो, बटाट्याची आवक मागील आठवड्यात अधिक होती.
Tomato Potato Market
Tomato Potato MarketAgrowon

नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटो (Tomato), बटाट्याची आवक (Potato arrival) मागील आठवड्यात अधिक होती. गवारच्या दरात काहीशी वाढ झाल्याचे पहायला मिळाले. बाजार समितीत दर दिवसाला साधारणपणे १३०० ते १४०० क्विंटलची आवक झाल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले.

Tomato Potato Market
Vegetable : थेट ग्राहकांना‘भाजीपाला बास्केट'ची विक्री

नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील आठवड्यात दर दिवसाला टोमॅटोची १५६ क्विंटलची आवक होऊन ३०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला, वांगीची २७ क्विंटलची आवक होऊन १५०० ते ५ हजार, फ्लॉवरची १८ ते २० क्विंटलची आवक होऊन १ हजार ते ४ हजार, कोबीची ५४ क्विंटलपर्यंत आवक होऊन ७०० ते तीन हजार पाचशे, काकडीची ३५ क्विंटलपर्यंत आवक होऊन ५०० ते दीड हजार, गवारची १७ ते २० क्विंटलची आवक होऊन ५ हजार ते १० हजार, घोसाळ्याची १० क्विंटलपर्यंत आवक होऊन १५०० ते २५००, दोडक्याची ५ क्विंटलपर्यंत आवक होऊन २ हजार ते ५ हजार ५००, कारल्याची ४५ क्विंटलपर्यंत आवक होऊन अडीच हजार ते साडेचार हजार, भेंडीची ३५ ते ४० क्विंटलची आवक होऊन १८०० ते ४५००, वाल शेंगाची १५ क्विंटलपर्यंत आवक होऊन साडेतीन हजार ते सहा हजार, घेवड्याची १५ क्विंटलपर्यंत आवक होऊन ४ हजार ते ५ हजार, बटाट्याची ५७५ क्विंटलची आवक होऊन १७०० ते २२००, हिरव्या मिरचीची ५० क्विंटलपर्यंत आवक होऊन २४०० ते ४५०० रुपये, शेवग्याच्या शेंगाची ५ क्विंटलपर्यंत आवक होऊन २५०० ते तीन हजार, ढोबळी मिरचीची २५ क्विंटलपर्यंत आवक होऊन २५०० ते ४ हजार रुपयांपर्यंत दर मिळाला.

Tomato Potato Market
Vegetable : नाशिकमध्ये वालपापडी-घेवड्याची आवक वाढून दरात घसरण

भुईमूग शेंगाची २० क्विंटलपर्यंत आवक होऊन ३ हजार ते ४३०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. मका कणसाची ५० क्विंटलपर्यंत रोज आवक होत असून १५०० ते १८०० रुपयांचा दर मिळाला. वाटाण्याला ३५०० ते ५ हजारांपर्यंत तर डांगराला ८०० ते १२०० रुपयांपर्यंत दर मिळाला. मेथी, पालक, चुका, शेपू, चवळी, कोथिंबीर, मुळा, कढीपत्ता, कांदापात, पुदीना, आदी पालेभाज्यांना मागणी चांगली राहिली.

डाळिंब, मोसंबीची अधिक आवक

नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या फळांत डाळिंब, मोसंबीची अधिक आवक होत आहे. मोसंबीची दर दिवसाला ५० क्विंटलपर्यंत आवक होऊन एक हजार ते साडेचार हजार, डाळिंबाची ६० क्विंटलपर्यंत आवक होत असून १ हजार ते १२ हजाराचा दर मिळाला. पपईची ५ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते साडेतीन हजार, सीताफळाची ४ क्विंटलपर्यंत आवक होऊन १ हजार ते साडेपाच हजार, संत्र्यांची पाच क्विंटलपर्यंत आवक होऊन एक हजार ते पाच हजारापर्यंत , केळीची १० क्विंटलपर्यंत आवक होऊन १ हजार ते २ हजार, पेरूची १५ क्विंटलपर्यंत आवक होऊन ५०० ते ६ हजारांचा दर मिळाला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com