Vegetable Market Rate : बहुतांश भाजीपाल्यांचे दर स्थिर

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २०) भाजीपाल्यांची सुमारे ९० ट्रक आवक झाली होती. आवक आणि मागणी संतुलित राहिल्याने बहुतांश भाजीपाल्याचे दर स्थिर होते.
Vegetable Market Rate
Vegetable Market RateAgrowon

पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Pune APMC) रविवारी (ता. २०) भाजीपाल्यांची सुमारे ९० ट्रक आवक (Vegetable Arrival) झाली होती. आवक आणि मागणी संतुलित राहिल्याने बहुतांश भाजीपाल्याचे दर (Vegetable Rate) स्थिर होते. आवकेमध्ये परराज्यांतून कर्नाटक, तमिळनाडू आणि गुजरात येथून सुमारे १० टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक येथून ५ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून २ टेम्पो शेवगा, राजस्थान येथून ८ टेम्पो गाजर, गुजरात येथून ३ टेम्पो भुईमूग शेंगा, मध्यप्रदेशातुन मटार १२ ट्रक, तमिळनाडू येथून तोतापुरी कैरी २०० गोणी, कर्नाटकातून घेवडा आणि पावटा प्रत्येकी २ टेम्पो, तर मध्य प्रदेशातून लसूण सुमारे १० ट्रक आवक झाली होती.

Vegetable Market Rate
Vegetable oil : वनस्पतिजन्य तेलाची अनोखी दुनिया

तर स्थानिक भागांतून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे ९०० गोणी, टोमॅटो सुमारे ९ हजार क्रेट्‌स, फ्लॉवर, सिमला मिरची आणि तांबडा भोपळा प्रत्येकी १० टेम्पो, हिरवी मिरची कोबी आणि गाजर प्रत्येकी ५ टेम्पो, भेंडी पाच आणि गवार ७ टेम्पो, कांदा सुमारे ५० ट्रक, आग्रा, इंदूर, स्थानिक भागातून बटाटा ५० ट्रक आवक झाली होती.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव- कांदा : १००-२००, बटाटा : १४०-२२०. लसूण : १५०-५००, आले : १००-४००, भेंडी : २५०- ४००, गवार : गावरान व सुरती ३००-५००, टोमॅटो : ८०-१००, दोडका : २००-२५०, हिरवी मिरची : २००-३००, दुधी भोपळा : १००-१५०, चवळी : २००-२५०, कारली : हिरवी २००-२५०, पांढरी :१६०-१८०, पापडी : ३००-३५०, पडवळ : २००-२५०, काकडी : १२०-१८०, फ्लॉवर : ८०-१२०, कोबी : ८०-१००, वांगी : २००-२५०, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : ८-१००, ढोबळी मिरची : २००-३००, तोंडली : कळी ३००-३५०, जाड : १५०-१८०, शेवगा : १०००-१२००, गाजर : ३००-४००, वालवर : ३५०-४००, बीट : २५०-३००, घेवडा : ३००-३५०,कोहळा : १००-१५०, आर्वी :२००-२५०, घोसावळे : २००-२२०, ढेमसे : २००-२५०, भुईमूग शेंग : ५००-५५०, मटार : ६००-६५०, पावटा : ५००- ५५०, तांबडा भोपळा : १००-१५०, कैरी तोतापुरी - ८००-९००, सुरण : २००-२५०, मका कणीस : ६०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००. पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे सव्वा लाख, तर मेथीची ५० हजार जुड्यांची आवक झाली होती.

Vegetable Market Rate
Vegetable Rate : सोलापुरात कारली, दोडका, गवारला उठाव, दरातही सुधारणा

पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : ८००-१५००, मेथी : १२००-१६००, शेपू : ८००-१२००, कांदापात : ८००-१२००, चाकवत : ४००-६००, करडई : ४००- ७००, पुदीना : ३००-८००, अंबाडी : ४००-६००, मुळे : ८००-१६००, राजगिरा : ४००-७००, चुका : ८००-१२००, चवळई : ४००-६००, पालक : ६००-१३००.

फुलबाजार

लग्न हंगामामुळे विविध प्रकारच्या कटफ्लॉवरला मागणी वाढली असून, दर मात्र स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : १०-३०, गुलछडी : २०-५०, अॅस्टर (४ जुड्या) ८-१५, सुटा ८०-१२०, कापरी : २०-३०, शेवंती : २०-५०, (गड्डीचे भाव) गुलाब गड्डी : १०-३०, गुलछडी काडी : ५०-१२०, डच गुलाब (२० नग) : ८०-२२०, जरबेरा : ४०-६०, कार्नेशियन : १५०-२००, शेवंती काडी १००-२००, लिलीयम (१० काड्या) ८००-१२००, ऑर्चिड ४००-५००, ग्लडिओ (१० काड्या) : ६०-१२०, चमेली : ४००-६००.

Vegetable Market Rate
Vegetable Market : नाशिकमध्ये वालपापडी घेवड्याची आवकेत वाढ;दरात घसरण

फळबाजार

फळ बाजारात रविवारी (ता.२०) लिंबांची सुमारे २ हजार गोणी आवक झाली होती. इतर आवकेमध्ये डाळिंब २५ टन, पपई १० टेम्पो, चिक्कू सुमारे दीड हजार गोणी आणि बॉक्स, मोसंबी ४० टन, संत्रा २५ टन, पेरू सुमारे दीड हजार क्रेट, कलिंगड ५ तर, खरबूज ६ पिकअप, सीताफळ ६० टन आवक झाली होती. तर सोलापूर जिल्ह्यांमधून विविध बोरांची सुमारे ३०० गोणी आवक झाली होती.

विविध फळांचे दर पुढीलप्रमाणे : लिंबे (गोणीस) - २००-४००, डाळिंब (किलो) गणेश - २०-६०, भगवा ८०-२५०, आरक्ता ३०-८०, पपई प्रति किलो -५-२५, पेरू (२० किलो) -२००-३००, सीताफळ - २०-७०, कलिंगड १५-२५ खरबूज २०-३५, मोसंबी ३ डझन २५०-५००, ४ डझन १५०-२५०. संत्रा (१० किलो) २००-६००. बोरांची प्रति १० किलोचे दर चण्यामण्या - ४५०-५००, चेकनट ८००-९००, चमेली २५०-३००, उमराण १२० ते १५०

मटण-मासळी

थंडी सुरू झाल्याने गणेश पेठेतील मासळीच्या घाऊक बाजारात रविवारी (ता.२०) मासळीच्या आवकेत घट झाली होती. विविध मासळीच्या दरांत १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली होती. मासळीच्याआवकेत खोल समुद्रातील मासळीची सुमारे १२ टन, खाडीची आणि मासळची प्रत्येकी सुमारे ३०० किलो आवक झाली होती. तर आंध्र प्रदेश येथून रहू, कटला आणि सिलनची सुमारे १५ टन आवक झाली होती.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) : पापलेट : कापरी : १६००-१७००, मोठे : १४००-१५००, मध्यम : ९००-१०००, लहान : ९००-१०००, भिला : ५५०-६००, हलवा : ५५०-६००, सुरमई : ५५०-६००, रावस : ५५०-६००, मोठा ः ९००, घोळ : ८५०, करली : ३२०-३६०, करंदी (सोललेली) : ४००-४४०, भिंग : ३६०-४००, पाला : १०००-१२००, वाम : ६००-७००, ओले बोंबील : १२०-१८०.

कोळंबी : लहान २००-३२०, मोठी : ३६०-५५०, जंबो प्रॉन्स : १२००-१४००, किंग प्रॉन्स : ६५०-८००, लॉबस्टर : १८००, मोरी : २००-२८०, मांदेली : १००-१४०, राणीमासा : १००-२००, खेकडे : २५०-२८०, चिंबोऱ्या : ४८०-५५०.

खाडीची मासळी : सौंदाळे : २४०-२८०, खापी : १८०-२००, नगली : ४००-४८०, तांबोशी : ४००-४८०, पालू : २४०-२८०, लेपा : २४०-२८०, बांगडा : लहान १००-१४०, मोठा १६०-१८०, शेवटे : २००-२४०, पेडवी : १००, बेळुंजी : १२०-१४०, तिसऱ्या : २४०, खुबे : १२०-१४०, तारली : १००-१२०.

नदीतील मासळी : रहू : १६०-२००, कतला : १६०-२००, मरळ : ४००-४८०, शिवडा : २४०-२८०, खवली : २००-२४०, आम्ळी : १२०-१६०, खेकडे : ३२०-४००, वाम : ५५०-६००, चिलापी ः ५०-६०,

मटण : बोकडाचे ७००, बोलाईचे ७००, खिमा ७००, कलेजी ७४०.

चिकन २००, लेगपीस २५०, जिवंत कोंबडी १४०, बोनलेस ३००.

अंडी : गावरान (शेकडा) ९४०, डझन १२०, प्रतिनग १०. इंग्लिश (शेकडा) ५६७, डझन ७८, प्रतिनग ६.५०.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com