Chana Market : नाफेड खुल्या बाजारात हरभरा विक्री करणार

चालू हंगामात देशात हरभऱ्याचे विक्रमी उत्पादन झाले. तर नाफेडने २५ लाख ५० हजार टन हरभरा हमीभावाने खरेदी केला. सरकारकडे २३ लाख टन कडधान्याचा बफर स्टॉक असणे आवश्यक आहे; मात्र प्रत्यक्षात जवळपास ३६ लाख टन साठा आहे.
Chana Market
Chana MarketAgrowon

पुणे ः सध्या बाजारात हरभऱ्याचे दर (Chana Rate) दबावात आहेत. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांत सणांमुळे हरभऱ्याला मागणी (Chana Demeand) वाढेल. त्यामुळे दरही वाढतील, अशी अपेक्षा होती; मात्र नेमके याच काळात नाफेड (NAFED) बफर स्टॉकमधील हरभरा (Chana Buffer Stock) बाहेर काढून खुल्या बाजारात विकणार आहे. नाफेडच्या या विक्रीचा हरभरा दरावरही परिणाम होऊ शकतो, असे जाणकारांनी सांगितले.

Chana Market
Chana Rate : सणासुदीत हरभरा दर सुधारतील का ?

चालू हंगामात देशात हरभऱ्याचे विक्रमी उत्पादन झाले. तर नाफेडने २५ लाख ५० हजार टन हरभरा हमीभावाने खरेदी केला. सरकारकडे २३ लाख टन कडधान्याचा बफर स्टॉक असणे आवश्यक आहे; मात्र प्रत्यक्षात जवळपास ३६ लाख टन साठा आहे. यात ३० लाख टनांपेक्षा अधिक हरभरा आहे. तर मूग एक लाख टन, तूर सव्वा लाख टन, उडीद १० हजार टन आणि मसूर ६ हजार टन आहे. नाफेडकडील ३० लाख टन हरभरा साठ्यापैकी ५ लाख टन माल २०२०-२१ च्या हंगामातील आहे. तो हरभरा आता नाफेडने विक्रीसाठी बाहेर काढलाय. त्यासाठी ऑनलाइन निविदा मागविल्या जाणार आहेत. हा हरभरा चालू बाजारभावानुसार राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकात विकला जाईल.

Chana Market
Chana Rate : सणासुदीत हरभरा दर सुधारतील का ?

सध्या हरभऱ्याचा बाजारभाव हमीभावापेक्षाही कमी आहे. केंद्र सरकारने यंदा हरभऱ्यासाठी ५२३० रुपये हमीभाव जाहीर केला आहे; मात्र बाजारात सध्या ४ हजार २०० ते ४ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान हरभरा विकला जातोय. नाफेडही याच भावाने हरभरा विकणार आहे; मात्र नाफेडने बफर स्टॉकमधील अतिरिस्त साठा दर कमी असताना खुल्या बाजारात न विकता रेशनवर द्यावा किंवा आंतरराष्ट्रीय बाजारात विकावा, असे जाणकारांचे मत आहे.

नाफेडने खुल्या बाजारात हरभऱ्याचा साठा विकल्यास सध्याच्या बाजारभावावर परिणाम होणार नाही, असेही काही जाणकारांनी सांगितले. सणांच्या काळात हरभऱ्याला मागणी असते. सध्या तूर, मूग आणि उडीद पिकाची परिस्थिती चांगली नाही. त्यामुळे या पिकांचे दर जास्त राहू शकतात. या काळात हरभऱ्याला मागणी राहील. तसेच सध्या पावसाची स्थिती पाहता रब्बीसाठी वातावरण पोषक असेल का, याविषयी वेगवेगळी मते मांडली जात आहेत. पुढील काही दिवसांत चित्र स्पष्ट होईल. पाऊस कमी राहिल्यास नाफेडने साठ्यातील हरभरा विकला तरी दर कमी होणार नाहीत, असा अंदाज या जाणकारांनी व्यक्त केला आहे.

पावसामुळे घरी किंवा गोदामांमध्ये साठवलेल्या हरभऱ्याचे पावसामुळे नुकसान होत असते. त्यामुळे पाऊस थांबला आणि सणांमुळे मागणी वाढली की शेतकरी आणि व्यापारी हरभरा विक्रीसाठी बाहेर काढत असतात. यातच आता नाफेडही ५ लाख टन हरभरा विकणार आहे. त्यामुळे बाजारावर दबाव येईल.
प्रेम कोगटा, अध्यक्ष, जळगाव दाल मिल ओनर्स असोसिएशन.
शिल्लक साठ्यांचा मार्केटवरील दबाव कमी करण्यासाठी निर्यातीला चालना द्यावी. हरभरा विक्रीच्या निविदा स्थानिक बाजारासाठी न काढता आंतराष्ट्रीय बाजारासाठी काढाव्यात. शिल्लक साठे हे आंतरराष्ट्रीय बाजारात विकावे. हरभऱ्याच्या शिल्लक साठ्यांचा दबाव कमी करण्यासाठी गव्हाच्या धर्तीवर सरकारी पातळीवर निर्यातीचा ‘जी टू जी’ निर्यातीचा पर्यायही आहे. केंद्र शासनाने तसा निर्णय घ्यावा.
दीपक चव्हाण, शेतीमाल बाजार अभ्यासक.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com