Sugar Rate : साखरेच्या मागणी, दरातही विशेष वाढ नाही

आंतरराष्ट्रीय बाजारात उड्डाण घेणारे साखर दर स्थानिक बाजारात मात्र नरमच आहेत. सध्या देशात कोणतेही महत्त्वाचे सण नसल्याने साखरेच्या मागणी व दरात विशेष वाढ झाली नसल्याचे चित्र आहे.
Sugar Export | Sugar Market
Sugar Export | Sugar MarketAgrowon

कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात उड्डाण घेणारे साखर दर (Sugar Rate) स्थानिक बाजारात मात्र नरमच आहेत. सध्या देशात कोणतेही महत्त्वाचे सण नसल्याने साखरेच्या मागणी (Sugar Demand) व दरात विशेष वाढ झाली नसल्याचे चित्र आहे.

केंद्राने साखर कारखान्यांना जानेवारीसाठी २२ लाख टनांचा कोटा दिला आहे. सध्या दर प्रति क्विंटल ३२०० ते ३३०० रुपये आहेत. दिवाळीनंतर स्थिर झालेल्या दरात वाढ झाली नसल्याचे साखर बाजारातील सूत्रानी सांगितले.

Sugar Export | Sugar Market
Sugar Production : देशात साखर उत्पादनाचा शंभर लाख टनांचा आकडा ओलांडला

दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर साखरेला चांगली मागणी होती. या कालावधीत ३४०० ते ३५०० रुपये क्विंटल रुपये दर होते. दिवाळीनंतर हळूहळू मागणी कमी झाली. नियमित मागणी वगळता अन्य कोणत्याही घटकांकडून विशेष मागणी नसल्याने दरातही फारशी वाढ होत नसल्याचे चित्र आहे.

Sugar Export | Sugar Market
Sugar Export : मुदतीअगोदरच सर्व साखर निर्यात होणार

देशांतर्गत बाजारात सण उत्सव व उन्हाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर शीतपेय कंपन्यांकडून साखरेला मागणी असते. जानेवारीत संक्रात वगळता इतर कोणतेही महत्त्वाचे सण नसल्याने साखरेला विशेष मागणी नसल्याचे कारखाना सूत्रांनी सांगितले. फेब्रुवारीपर्यंत अशी स्थिती राहील, असा अंदाज आहे. लग्नसराई असली तरी त्याचा फारसा अनुकूल परिणाम साखर मागणीवर झाला नसल्याचे कारखानदारांनी संगितले.

आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर स्थानिक दरापेक्षा क्विंटलला ३०० ते ४०० रुपयांनी अधिक आहेत. चांगले दर असूनही निर्यातीचा कोटा मर्यादित असल्याने जादा प्रमाणात साखर बाहेरच्या देशांना कारखाने विकू शकत नाहीत.

इंडियन शुगर मिल्सच्या महितीनुसार देशात डिसेंबरअखेर ११६ लाख टन साखरेची निर्मिती झाली आहे. यातील काही साखर निर्यातीसाठी बाहेर गेली तरी बहुतांश भिस्त स्थानिक साखरेच्या विक्रीवरच राहणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com