Soybean Harvest: आता सोयाबीन, हरभरा आणि तांदळाची करा एकाच मशिनने काढणी

सोयाबीन काढणी हंगाम सुरू झाला की, शेतकऱ्यांना शेतमजुरांची टंचाईचा प्रश्न छळायला लागतो. त्यात अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे नुकसान होते.
Soybean Harvest
Soybean Harvest Agrowon

पुण्यातील मोशी (Moshi) येथे 'किसान' कृषी प्रदर्शन (Kisan Agriculture Exhibition) १४ ते १८ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनात विविध शेतीपूरक तंत्रज्ञान (Agriculture Technology) ठेवण्यात आले. त्याच प्रदर्शनातील आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून घेऊया.

Soybean Harvest
Soybean Market : अर्जेंटीना, ब्राझीलमध्ये सोयाबीन पिकाला कमी पावसाचा फटका?

सोयाबीन काढणी मशीन-

सोयाबीन काढणी हंगाम सुरू झाला की, शेतकऱ्यांना शेतमजुरांची टंचाईचा प्रश्न छळायला लागतो. त्यात अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे नुकसान होते. त्यामुळे शेतकरी पीक काढणीची घाई करत असतात. मात्र अनेकदा वेळेवर मळणीयंत्र, मजूर किंवा अवकाळी पाऊस दगाफटका करतोच.

त्यामुळे याच अडचणीवर आरजी अॅग्री टेक्निकल या कंपनीने पर्याय शोधलाय. या कंपनीचे सोयाबीन काढणीचे मशिन आता बाजारात आले आहे. विशेष म्हणजे एकाच मशीनच्या मदतीने सोयाबीन, हरभरा आणि तांदळाची काढणी करता येणार आहे.

३ हजार हॉर्स पॉवर क्षमता असलेल्या या मशीनची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या मशिनचे कटर बार ७ फुटचा आहे. त्यासोबतच दोन पात्यांमधील अंतर कमी आहे. जेणेकरून पिकाची काढणी व्यवस्थित करता येते. तसेच कंपनीने ९ हजार हॉर्स पॉवर क्षमतेचे मशीनही बाजारात दाखल केले आहे.

या मशीनमध्ये एसी केबिन आहे. तसेच उत्कृष्ट पद्धतीने केबिन डिझाईन केले आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेला व्हिडिओ पाहा.

फवारणी पंप-

शेतातील पिकांना फवारणी करताना पंपाचे ओझे त्रासदायक ठरते. तसेच फवारणीचे औषध पंपाद्वारे पाठीवर किंवा शरीरावर पडते. त्यातून अनेकदा शरिरीक इजा होते. त्यावर उपाय म्हणून आता नवीन फवारणी पंप बाजारात आला आहे. या पंपाची वैशिष्ट्ये काय आहेत तेच पाहूया.

वैशिष्ट्ये -

या पंपला चार चाक देण्यात आले आहेत. फवारणी करणारी व्यक्ती त्यावर बसून फवारणी करू शकते. पाठीवर ओझं घेऊन फवारणी करण्याची गरज नाही.

फळबागांच्या फवारणीला फायदेशीर. चार्ज होणाऱ्या बॅटरीवर हा पंप चालतो. बॅटरीची चार्जिंग ४ ते ५ तास टिकते. पंपाची किंमत एक लाख पस्तीस हजार.

अधिक माहितीसाठी खाली दिलेला व्हिडिओ पाहा.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com