Fertilizer : ‘एक राष्ट्र एक खत’ धोरण केंद्राकडून लागू

राज्य संचलित सर्व कंपन्या, खत विपणानातील खासगी व सरकारी अंगीकृत कंपन्यांना बोधचिन्ह वापरणे बंधनकारक असेल. खताच्या गोणीवर एका बाजूने दोन तृतीयांश जागा नव्या बोधचिन्हासाठी वापरली जाईल.
 Fertilizer
FertilizerAgrowon

पुणे ः केंद्र शासनाने रासायनिक अनुदानित खतांसाठी (Subsidies Fertilizer) ‘एक राष्ट्र एक खत’ धोरण (One Nation One Fertilize Policy) लागू केले आहे. त्यामुळे सरकारी व खासगी खत उत्पादक कंपन्या (Fertilizer Producer) आता खतांच्या पिशव्यांवर एकसमान बोधचिन्ह वापरावे लागेल. येत्या दोन ऑक्टोबरपासून या धोरणाची अंमलबजावणी होईल.

 Fertilizer
Fertilizer : शेतकऱ्यांना आधार खताच्या ‘बफर स्टॉक’चा

​राज्याच्या कृषी विभागातील अधिकारी, खत उत्पादकांचे प्रतिनिधी तसेच निविष्ठा विक्री व्यवसायातील संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. केंद्रीय रसायने व खते मंत्रालयातील खते विभागाच्या सहसचिव नीरजा आदिदम यांनी खत उत्पादक कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांना ‘एक राष्ट्र एक खत’ धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. “यापुढे पंतप्रधान भारतीय जनउर्वरक परियोजना (पीएमबीजेपी) या नावाने सर्व कंपन्या अनुदानित खते एका बोधचिन्हाखालीच विकतील. त्यामुळे यापुढे खतांना केवळ युरिया, डीएपी असे न म्हणता खताच्या गोणीवर भारत युरिया, भारत डीएपी, भारत एमओपी, भारत एनपीके असा उल्लेख करावा,” असे आदेश खते मंत्रालयाने दिले आहेत.

 Fertilizer
Fertilizer : खत लिंकिंगविरोधात खत विक्रेतेच आक्रमक

राज्य संचलित सर्व कंपन्या, खत विपणानातील खासगी व सरकारी अंगीकृत कंपन्यांना बोधचिन्ह वापरणे बंधनकारक असेल. खताच्या गोणीवर एका बाजूने दोन तृतीयांश जागा नव्या बोधचिन्हासाठी वापरली जाईल. तसेच एक तृतीयांश जागेवर खत उत्पादक कंपन्यांना नाव, बोधचिन्ह व कायद्यानुसार अत्यावश्यक असलेली माहिती छापावी लागेल. या धोरणाची अंमलबजावणी करताना खत कंपन्यांनी खत नियंत्रण आदेश १९८५ तसेच वेष्टणसहित वस्तू कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.

येत्या महात्मा गांधी जयंतीपासून नव्या स्वरूपातील बोधचिन्हांसह देशभर समान वेष्टण सामग्रीत खते विकली जातील. यामुळे शेतकऱ्यांचा संभ्रम होणार नाही. आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो. जुन्या वेष्टणातील खतांचा साठा संपविण्यासाठी कंपन्यांना चार महिन्याचा कालावधी दिला आहे.
मनमोहन कलंत्री, अध्यक्ष, अॅग्रो इनपुट डीलर्स असोसिएशन

खतांचा वापर राजकीय प्रचारासाठी नको येत्या १५ सप्टेंबरपासून कोणत्याही खत कंपनीने जुन्या धोरणाप्रमाणे छापलेल्या गोण्यांची खरेदी करू नये. त्यानंतर दोन ऑक्टोबरपासून नवे बोधचिन्ह छापलेल्या गोण्यांमधून खतांची विक्री करावी. ३१ डिसेंबरपर्यंत बाजारातील सर्व जुन्या गोण्यांचा साठा संपवावा, असे आदेश केंद्र शासनाने दिले आहेत. मात्र केंद्राने हा निर्णय घेताना बोधचिन्हामध्ये ओढूनताणून भाजपचा उल्लेख आणल्याबद्दल निविष्ठा उद्योगातील काही कंपन्यांच्या प्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली आहे. खतांच्या गोण्यांवर आता पीएमबीजेपी असे नमूद करावे लागेल. खतांचा वापर राजकीय प्रचारासाठी नको, असेही मत व्यक्त केले जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com