Onion Market : लासलगाव बाजार समितीत रोखले कांद्याचे लिलाव

बाजारात उन्हाळ कांदा दरात सध्या घसरण झाली आहे त्यामुळे उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे.
Onion Market
Onion MarketAgrowon

नाशिक : बाजारात उन्हाळ कांदा दरात (Summer Onion Rate) सध्या घसरण झाली आहे त्यामुळे उत्पादन खर्चही (Onion Production Cost) वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवार (ता.२१) रोजी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती (Lasalgaon Onion Market) आवारात सकाळी १० वाजता कांद्याचे लिलाव (Onion Auction) रोखले.

Onion Market
Onion Cultivation : धुळ्यातील कांदा लागवड कमीच

कांद्याला प्रतिकिलो ३० रूपये दर मिळावा, अशी मागणी करत संघटनेचे पदाधिकारी व कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली.यावेळी केंद्र व राज्य सरकार, तसेच नाफेडच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कांद्याला उत्पादन खर्चाच्या खाली दर मिळत असल्याने राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव रोखून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

यावेळी कांदा उत्पादक संघटनेचे जिल्हा युवक अध्यक्ष केदारनाथ नवले, येवला तालुकाध्यक्ष विजय भोरकडे, रवींद्र पगार,प्रवीण गायकवाड, गोकुळ भोरकडे,बाळासाहेब बनकर,ज्ञानेश्वर चांदवडे आदी शेतकरी उपस्थित होते यावेळी लासलगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ व पोलीस यावेळी लक्ष ठेवून होते. अखेर प्रातिनिधिक आंदोलन झाल्यानंतर लिलाव पुन्हा पूर्ववत सुरू झाले.

Onion Market
Onion Rate : लासलगावी उन्हाळ कांद्याला ५०० ते २७२१ रुपये दर

यावेळी दिघोळे म्हणाले,राज्यातील लाखो कांदा उत्पादक शेतकरी कांद्याला योग्य दर मिळत नसल्याने आर्थिक संकटात सापडले आहेत.कांद्याचा उत्पादन खर्च प्रति किलोला २० रुपयांच्या वर येत असताना यावर्षी शेतकऱ्यांच्या कांद्याला संपूर्ण वर्षभर कवडीमोल दर मिळाले आहेत.

त्यामुळे शेतकऱ्यांचे कांदा विक्रीतून दिवसागणिक कोट्यवधींचे नुकसान होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ साली शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू अशी घोषणा केली.मात्र शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट न होता आता खर्च दुप्पट झाला आहे.उत्पन्न निम्मे झाल्याने सरकारच्या करणी आणि कथनीमध्ये मोठा फरक असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

करण्यात आलेल्या मागण्या:

-कांद्याला प्रतिकिलो ३० रूपये दर मिळावा.

-शेतकऱ्यांचे होणारे हे नुकसान थांबवण्यासाठी केंद्र सरकारने जास्तीत जास्त कांदा परदेशात निर्यात करावा.

-मागील काही महिन्यांपासून कमी दरात विकलेल्या कांद्याला राज्य सरकारने १० रुपये प्रति किलो याप्रमाणे नुकसान भरपाई अनुदान द्यावे.

लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा लिलाव रोखून केलेले आंदोलन हे प्रातिनिधिक आहे. येत्या दोन चार दिवसात कांद्याचे दर न सुधारल्यास संघटनेच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव रोखून मंत्रालयासमोर कांदा ओतून आंदोलन केले जाईल.
भारत दिघोळे,अध्यक्ष-महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com