Onion Export: कांदा निर्यातीतून मिळणाऱ्या उत्पन्नात मोठी वाढ

आधीच्या वर्षी ३७८ दशलक्ष डॉलर्स (Dollars) उत्पन्न मिळाले होते. रूपयांत हे उत्पन्न बघितले तर गेल्या वर्षीच्या तुलनेत २१ टक्के वाढ झाली आहे. २०२१-२२ मध्ये कांदा निर्यातीतून ३४३१ कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाले. (Indian Onion Export)
Onion Export
Onion ExportAgrowon

भारतीय कांद्याला (Indian Onion) बांगलादेश (Bangladesh) आणि नेपाळकडून (Nepal) मागणी वाढलीय. त्यामुळे निर्यातीतून (Export) डॉलरमध्ये मिळणाऱ्या उत्पन्नात २२ टक्के वाढ झाली आहे. भारताला २०२१-२२ मध्ये कांदा निर्यातीतून ४६० दशलक्ष डॉलर्स उत्पन्न मिळाले.

आधीच्या वर्षी ३७८ दशलक्ष डॉलर्स उत्पन्न मिळाले होते. रूपयांत हे उत्पन्न बघितले तर गेल्या वर्षीच्या तुलनेत २१ टक्के वाढ झाली आहे. २०२१-२२ मध्ये कांदा निर्यातीतून ३४३१ कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाले. त्या आधीच्या वर्षी २८२६ कोटी रूपये मिळाले होते.

बांगलादेश हा भारतीय कांद्याचा सगळ्यात मोठा खरेदीदार आहे. बांगलादेशने २०२१-२२ मध्ये ६.५८ लाख टन कांदा खरेदी केला. आधीच्या वर्षीच्या तुलनेत १९ टक्के अधिक कांदा खरेदी केला. तर या निर्यातीपोटी भारताला बांगलादेशकडून मिळालेल्या उत्पन्नात ७२ टक्के वाढ झाली. त्याच प्रमाणे श्रीलंकेला होणाऱ्या कांदा निर्यातीत १२.५ टक्के वाढ झाली. त्यापोटी मिळालेल्या उत्पन्नात २५ टक्के वाढ झाली.

भारतातून नेपाळला होणाऱ्या कांदा निर्यातीत ४८ टक्के वाढ झाली. निर्यातीतून मिळणारे उत्पन्न ६९ टक्के वाढले. मलेशिया हा बांगलादेशच्या खालोखाल भारतीय कांद्याचा दुसरा मोठा खरेदीदार देश आहे. मलेशियाच्या कांदा खरेदीत १४ टक्के घट झाली आहे.

२०२१-२२ मध्ये मलेशियाने भारताकडून १.७० लाख टन कांदा खरेदी केला होता. २०२०-२१ मध्ये मात्र १.९८ लाख टन कांदा खरेदी केला होता. परंतु रूपया कमजोर झाल्यामुळे आणि वाहतुकीचे भाडे वाढल्याने निर्यातीतून मिळणाऱ्या उत्पन्नात ६.५ टक्के वाढ झाली आहे.

संयुक्त अरब अमिरातीला होणारी कांदा निर्यात २८ टक्के घटली आहे. तसेच निर्यातीतून मिळणारे उत्पन्नही कमी झाले आहे. मार्चपर्यंत भारतीय कांद्याचे दर चढे होते, त्या तुलनेत पाकिस्तानतला कांदा स्वस्त होता. त्यामुळे संयुक्त अरब अमिरातीने भारताकडून कमी कांदा खरेदी केला.

भारताच्या एकूण कांदा निर्यातीत गेल्या वर्षीच्या तुलनेत किंचत घट झाली आहे. परंतु तरीही कांदा निर्यातीतून मिळणारे उत्पन्न मात्र वाढले आहे. त्याचे एक कारण म्हणजे डॉलरच्या तुलनेत रूपयाची झालले घसरण. आणि दुसरे कारण म्हणजे वाहतुकीच्या भाडेदरात झालेली मोठी वाढ.

आजच्या घडीला भारतीय कांद्याला ठीकठाक मागणी आहे. आशियायी देशांमध्ये कांदा निर्यात सुरू आहे. चीनमध्ये नुकतीच कांद्याची काढणी सुरू झाली आहे. इजिप्तमध्येही लवकरच नवं पीक येईल. पश्चिम आशियातून येणाऱ्या मागणीवर काही परिणाम होईल; परंतु भारतीय कांद्याचे परंपरागत खरेदीदार असलेल्या देशांमध्ये मागणी कायम राहण्याची चिन्हे आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com