Onion Market : शिरूरमध्ये आता रोज भरणार कांदा बाजार

अनेक शेतकरी, खरेदीदार वाहतूकदार यांना एकाचवेळी कांदा विक्रीसाठी आणताना अडचण होत होती. हे लक्षात घेऊन शिरूर बाजार समितीने नवीन मार्केट यार्डामध्ये कांद्याचे जाहीर लिलाव आठवड्यातील शनिवार वगळता दररोज होणार असल्याचा निर्णय घेतला आहे.
Onion Market
Onion MarketAgrowon

शिरूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन मार्केट यार्डावर कांदा मार्केट (Shirur Onion market) हे आठवड्याच्या काही ठरावीक दिवशी चालू राहत होते. त्यामुळे कांद्याच्या आवकेमध्ये (Onion Arrival) लक्षणीय वाढ होत होती.

अनेक शेतकरी, खरेदीदार वाहतूकदार यांना एकाचवेळी कांदा विक्रीसाठी आणताना अडचण होत होती. हे लक्षात घेऊन शिरूर बाजार समितीने नवीन मार्केट यार्डामध्ये कांद्याचे जाहीर लिलाव आठवड्यातील शनिवार वगळता दररोज होणार असल्याचा निर्णय घेतला आहे.

Onion Market
Onion Planter : नाशिकमधील शेतकऱ्यांना भावतेय कांदा रोपे ‘ट्रान्स्प्लान्टर’ तंत्रज्ञान

कांदा मार्केटमध्ये दररोज नवीन कांद्याची सुमारे ६५०० पिशवीची आवक होते. बुधवारी (ता. १८) चांगल्या प्रतीच्या कांद्यास १५०० ते १७५० प्रति क्विंटल याप्रमाणे दर मिळाला.

परिसरातील पारनेर, श्रीगोंदा, खेड, दौंड, जुन्नर या तालुक्यांतील शेतकऱ्यांनाही हे जवळचे मार्केट असल्यामुळे अनेक शेतकरी कांदा येथे विक्रीसाठी आणतात.

शेतकऱ्यांसाठी ही जवळची आणि हक्काची बाजारपेठ आहे. त्यातच शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च व वेळेची मोठी बचत असल्याने तालुक्यात व परिसरात अनेक शेतकरी कांद्याची लागवड करतात.

Onion Market
Onion Cultivation : कांदा लागवड करताना या गोष्टी लक्षात ठेवा

बाजार समितीने यार्डावर शेतकऱ्यांचा कांदा उतरविण्यासाठी प्रशस्त असे चार शेड, लाइट, स्वच्छतागृह, सीसीटीव्ही इत्यादी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उभारलेल्या आहेत.

येथील कांदा टिकाऊ असून, त्यास चांगली मागणी असल्याने कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, तमिळनाडू, पश्‍चिम बंगाल, झारखंड, आसाम तसेच राजस्थान, दिल्ली, जम्मू-काश्मीर अशा विविध राज्यांमध्ये विक्रीसाठी पाठविला जातो.

शेतावर कांदा विक्री केलेल्या अनेक व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या फसवणूक केल्याच्या तक्रारी बाजार समितीकडे येत असून, त्यांनी वजन, बाजारभाव तसेच विक्रीच्या रकमेबाबत फसवणूक होऊ शकते. त्यासाठी शिरूर बाजार समितीच्या नवीन मार्केट यार्डावर रविवार ते शुक्रवार दररोज सकाळी १० वाजेपर्यंत कांदा विक्रीसाठी आणावा.

- शंकर कुंभार, प्रशासक, शिरूर बाजार समिती, शिरूर

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com