Onion Market : कांद्याने बळीराजाच्या डोळ्यांत आणले अश्रू

सद्यःस्थितीत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यातच अवकाळी पावसाचा फटका बसल्याने कांद्याचे भाव कमालीचे घसरल्याने कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.
Onion Market
Onion Market Agrowon

Nanadurbar News : सद्यःस्थितीत कांद्याची आवक (Onion Arrival) मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यातच अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) फटका बसल्याने कांद्याचे भाव (Onion Rate) कमालीचे घसरल्याने कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.

शेतकऱ्यांना बाजार समितीत सहा ते सात रुपये किलो दर मिळत आहे. हा दर कवडीमोल असल्याने खर्चही निघत नाही. यात कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

लागवड खर्चही निघेनासा झाला आहे. जिल्हाभरात अवकाळी पावसाने व त्यात व्यापाऱ्यांकडून कवडीमोल कांद्याला मिळत असल्याने कांद्याने यंदा शेतकरी पुरता रडकुंडीस आला आहे.

शेतकऱ्याने सहा ते सात रुपये किलो या दराने घाऊक बाजारपेठेत विक्री केलेला कांदा सामान्य ग्राहकांना ग्रामीण भागातील आठवडेबाजारात मात्र १५ ते २० रुपये किलो याप्रमाणे खरेदी करावा लागत असल्याने शेतकऱ्यांचा तोटा व व्यापाऱ्यांचा फायदा होत आहे. जिल्हाभरात रब्बी हंगामात एक ते दीड हजार हेक्टरवर कांद्याचे उत्पादन घेतले जाते.

शेतकऱ्यांनी या वर्षी मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड केली. लागवडीपासून ते काढणीपर्यंतचा खर्च वजा केला असता कांदा विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली.

Onion Market
Onion Market : मंचर बाजारात कांद्याची विक्रमी आवक

कांदा साठविण्याची व्यवस्था असावी

जिथे पिकते तिथे प्रक्रिया उद्योग नसल्याने वाढीव उत्पन्न उत्पादकाला मिळत नाही. शेतकऱ्यांना वाढीव व भरघोस उत्पन्न मिळावे यासाठी शेतकरी प्रोड्यूसर कंपन्यांनी एकत्र येऊन प्रक्रिया उद्योग सुरू करावेत, तसेच कृषी विभागाने साठवणूक गृहासारखी शाश्‍वत उपाययोजना करावी, अशी मागणी कांदा उत्पादकांकडून करण्यात येत आहे.

Onion Market
Onion Trader : कांद्याच्या बोगस पावत्या दिल्यास, व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करणार

लागवडीपासूनच कांद्याला ग्रहण

ऐन लागवडीच्या वेळी महाविरतणने थकीत बिलापोटी शेतातील वीजपुरवठा खंडित केला होता. त्यामुळे कांद्याला पाहिजे त्या प्रमाणात पाणी मिळाले नाही.

कांदाचाळ फायदेशीर

जिल्ह्यात एक ते दीड हजार हेक्टरवर कांद्याची लागवड करण्यात येते. एकरी ६० ते ७० क्विंटल उत्पादन होते. कांद्याला भाव मिळावा, यासाठी शेतकऱ्यांनी त्याची साठवणूक केल्यास फायदेशीर ठरेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदाचाळ तयार करायला हवी; परंतु त्यासाठी शासनाची योजनासुद्धा शेतकऱ्यांपर्यंत जाणे गरजेचे आहे, असे शेतकरी म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com