Onion Rate : कांदा संपला अन्‌ बाजारात दर वाढू लागले

वर्षापासून कांद्याला दर मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त होते. दरवाढीच्या प्रतीक्षा करत शेतकऱ्यांनी नाइलाजाने मिळेल त्या दरात कांदा विक्री केली.
onion
onionagrowon

नगर : वर्षापासून कांद्याला दर (Onion Rate) मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त होते. दरवाढीच्या प्रतीक्षा करत शेतकऱ्यांनी नाइलाजाने मिळेल त्या दरात कांदा विक्री केली. आता शेतकऱ्याच्या चाळीतील कांदा संपला अन बाजारातील दर वाढू लागले. काल (शनिवारी) नगर येथील बाजार समितीत (Nagar APMC) झालेल्या लिलावात चांगल्या प्रतिच्या कांद्याला ३८०० रुपये पर्यंत प्रतिक्विंटल दर मिळाला. गेल्या वर्षभरातील हा उच्चांकी दर आहे.

नगर जिल्ह्यामध्ये खरीपांसह रब्बी व उन्हाळी कांदा उत्पादनाला शेतकरी प्राधान्य देतात. गेल्या वर्षी तर कांदा लागवडीने उच्चांक करत एकट्या नगर जिल्ह्यामध्ये वर्षभरात सुमारे सव्वा दोन लाख हेक्टर क्षेत्रावर कांदा उत्पादन झाले. त्यात उन्हाळी क्षेत्र एक लाख ८० हजाराच्या जवळपास होते.

onion
Indian Agriculture : शेती शिक्षणात शेती शोषणाचा इतिहास मांडला जातो का ?

फेब्रुवारी, मार्च मध्ये कांदा काढणी झाली, मात्र तेव्हापासून कांद्याला दर मिळाला नाही त्यामुळे दर मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवला होता. अगदी दिवाळीपर्यंत अनेक शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवला.

मात्र, दर वाढीची अपेक्षा दिसेना, त्यातच सततचा पाऊस व वातावरणातील बदल यामुळे कांदा खराब होत होऊ लागल्याने अनेक शेतकऱ्यांनी मिळेल त्या दरात कांदा विक्री केली. आता केवळ पाच टक्केही शेतकऱ्याकडे कांदा शिल्लक नाही.

शेतकऱ्याच्या चाळीतील कांदा संपला आणि कांद्याला दर वाढू लागले. काल (सोमवारी) नगर मधील बाजार समितीत एक नंबरच्या कांद्याला ३८०० रुपयापर्यंत दर मिळाला आहे. बाजारात कांदा आवक घटू लागली आहे. शेतकऱ्यांनी विकलेला कांदा व्यापाऱ्यांनी साठवून ठेवला. आता तोच कांदा बाजारात निघू लागला असल्याचे बोलले जात आहे.

वर्षभरातील उच्चांकी दर

नगर जिल्ह्यात गेल्यावर्षभरात कांद्याला सरासरी दीड हजार रुपये पर्यंतच दर राहिला काल मिळालेला एक नंबर प्रतीच्या कांद्याचा ३१०० ते ३८०० रुपयाचा दर हा वर्षभरातील उच्चांकी दर आहे. दोन नंबर प्रतीच्या कांद्याला २२०० ते ३१००, तीन नंबरच्या कांद्याला ११०० ते २२०० व चार नंबरच्या कांद्याला ५०० ते ११०० रुपयाचा दर मिळाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com