Onion : लासलगाव बाजार समिती परिसरात कांद्याची ट्रॉली उलटली

शेतकऱ्याचा पाण्यात भिजलेला कांदा उचलून घेण्यासाठी बाजार समिती प्रशासनाने मदत केली; मात्र देशात नावाजलेल्या बाजार समितीच्या परिसरात शेतकऱ्यांना सुविधा दिल्या जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
Onion
OnionAgrowon

नाशिक : कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती (Lasalgon Onion Market) परिसरात कांदा विक्रीसाठी (Onion Sale) येणाऱ्या शेतकऱ्यांची वाहनांसह मोठी वर्दळ असते; मात्र या ठिकाणी रस्त्याच्या साइडपट्ट्या व्यवस्थित बुजवल्या नसल्याने कांद्याने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली उलटून शेतकऱ्याला मोठा मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजार समिती व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठिसळ कामकाजावर नाराजी व्यक्त केली.

Onion
Onion : कांदाविक्री बंद आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद

याबाबत सविस्तर माहिती अशी की, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कोटमगाव रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज कांदा बाजार आवारात नाल्याचे बांधकाम झाले नसल्यामुळे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या साइडपट्ट्या व्यवस्थित भरल्या गेलेल्या नाहीत. मंगळवारी (ता. २३) दुपारी साडेचार वाजता पिंपळगावनजीक येथील शेतकरी संदीप घोडे हे कांदा विक्रीसाठी घेऊन आले होते; मात्र कांद्याने भरलेली ट्रॉली उलटल्यामुळे ट्रॉलीतील कांदा नाल्यातील साचलेल्या पाण्यात पडून खराब झाला.

Onion
Onion : कांदाविक्री बंदच्या मुद्द्यांवर शेतकऱ्यांत संभ्रम

शेतकऱ्याचा पाण्यात भिजलेला कांदा उचलून घेण्यासाठी बाजार समिती प्रशासनाने मदत केली; मात्र देशात नावाजलेल्या बाजार समितीच्या परिसरात शेतकऱ्यांना सुविधा दिल्या जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची दुरुस्ती करणे, बाजार समिती परिसरात तशा सुविधा देऊन शेतकऱ्यांची गैरसोय टाळणे औचित्याचे आहे; मात्र असे असताना झालेल्या अपघातामुळे हा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला

रस्त्याच्या कडेच्या साइडपट्ट्यांचे काम अर्धवट असून व्यवस्थित झालेले नाही. बाजार समितीच्या भूमिगत नाल्याचे काम झालेले नाही. त्यामुळे येथे तुंबलेल्या पाण्यात ट्रॉली उलटून गुडघाभर पाण्यात पडली. बाजार समितीने कांदा उचलून दिला; मात्र कांद्याचे नुकसान झाल्याने आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे बाजार समिती सार्वजनिक बांधकाम विभाग व बाजार समितीने नुकसान भरपाई द्यावी.
संदीप हिरामण घोडे, नुकसानग्रस्त शेतकरी.
लासलगाव पिंपळगाव रस्त्याचे काम सुरू आहे. मुरुम टाकून साइडपट्ट्या भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशाच शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर २ चाकी असल्याने मुरुमात अडकून उलटला; मात्र दुर्घटना घडल्यानंतर बाजार समितीने वाहन व ट्रॉली उभी करून दिली. कांदा बाजारातील मजुरांमार्फत भरून दिला. शेतकऱ्याची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जाते.
नरेंद्र वाढवणे, सचिव-कृषी उत्पन्न बाजार समिती, लासलगाव, जि. नाशिक.
मागील वर्षीही वाहतूक खोळंबली जात असल्याने रस्ते दुरुस्तीबाबत निवेदन दिले होते. बाजार समितीत गटारीची कामे अपूर्ण आहेत. बाजार समितीने नाले बांधले असते तर घटना घडली नसती; मात्र बाजार समिती प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने असे प्रकार घडतात. शेतकरी हिताची राहिलेली कामे लवकरात लवकर मार्गी लावावी, अशी मागणी बाजार समिती व्यवस्थापनाकडे केली आहे.
प्रकाश पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com