शेळ्या-मेंढ्या, बोकडांची ऑनलाइन खरेदी-विक्री

शेळ्या-मेंढ्या आणि बोकड यांचा व्यापार देखील ऑनलाइन किंवा ॲपद्वारे होऊ लागला आहे. याकरता एनसीडीईएक्स ई-मार्केट्स लिमिटेड (NeML) आणि कर्नाटक शीप अँड वूल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (कर्नाटकात मेंढी आणि लोकर विकासासाठी स्थापन करण्यात आलेले महामंडळ) या दोन संस्थांनी एकत्र येऊन नुकतेच एक ॲप सादर केले आहे.
Goat Farming
Goat FarmingAgrowon

शेळ्या-मेंढ्या आणि बोकड यांचा व्यापार देखील ऑनलाइन (Goat, Sheep Online Trading) किंवा ॲपद्वारे होऊ लागला आहे. याकरता एनसीडीईएक्स (NCDEX) ई-मार्केट्स लिमिटेड (NeML) आणि कर्नाटक शीप अँड वूल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (Karnataka Sheep And Wool Development Corporation) (कर्नाटकात मेंढी आणि लोकर विकासासाठी स्थापन करण्यात आलेले महामंडळ) या दोन संस्थांनी एकत्र येऊन नुकतेच एक ॲप सादर केले आहे. त्यामुळे आता शेळ्या, मेंढ्या आणि बोकड यासारख्या पशुधनाचा ऑनलाईन व्यापार करण्याची सोय उपलब्ध झाली आहे. देशातील पशुधन व्यवसायाचा आवाका खूप मोठा आहे. सध्या देशामध्ये सुमारे ५५ कोटी एवढी पशुसंख्या असून, केवळ मेंढ्यांची संख्या ८-१० कोटी एवढी मोठी आहे. तसेच बकऱ्यांची संख्यादेखील १५ कोटी च्या आसपास आहे. पशुधनामध्ये कर्नाटकचा क्रमांक दहावा लागतो.

मागील पाच-सहा वर्षांमध्ये किरकोळ आणि घाऊक व्यापार क्षेत्रामध्ये ‘ऑनलाईन’ पद्धतीचा वापर जोरात होताना दिसत आहे. दोन वर्षांपूर्वी आलेल्या कोव्हीड-१९ च्या साथीमुळे संपूर्ण जग लॉकडाउनमध्ये गेले होते. तो काळ ऑनलाइन व्यापार वृद्धिंगत होण्यासाठी सर्वोत्तम कालावधी होता असेच म्हणावे लागेल. त्याच काळात कृषी क्षेत्रातील स्टार्टअप्सचे पेव फुटले. ते वारे अजूनही ओसरलेले नाही. या काळात कित्येक ॲप्लिकेशन्स (ॲप) निघाली. त्याद्वारे कृषी आणि इतर कमोडिटीजची ऑनलाईन पद्धतीने देवाणघेवाण तसेच आर्थिक व्यवहारदेखील होऊ लागले. मात्र काही बाजार या ऑनलाइन क्रांतीपासून अजूनही दूर राहिले आहेत. सामान्य शहरी माणसाचा थेट संबंध नसलेला तरी शेवटचा ग्राहक म्हणून बाजारावर प्रभाव असणारा पशुधन बाजार किंवा शेळ्या-मेंढ्या आणि बोकड यांचा व्यापार हा हजर बाजार पद्धतीनेच होत राहिला.

Goat Farming
Goat Farming : गाभण शेळ्यांचे व्यवस्थापन

मात्र आता या बाजारात देखील तंत्रज्ञानाचा शिरकाव झाला आहे. शेळ्या-मेंढ्या आणि बोकड यांचा व्यापार देखील ऑनलाइन किंवा ॲपद्वारे होऊ लागला आहे. याकरता एनसीडीईएक्स ई-मार्केट्स लिमिटेड (NeML) आणि कर्नाटक शीप अँड वूल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (कर्नाटकात मेंढी आणि लोकर विकासासाठी स्थापन करण्यात आलेले महामंडळ) या दोन संस्थांनी एकत्र येऊन नुकतेच एक ॲप सादर केले आहे. त्यामुळे आता शेळ्या, मेंढ्या आणि बोकड यांसारख्या पशुधनाचा ऑनलाइन व्यापार करण्याची सोय उपलब्ध झाली आहे. एनईएमएल या एनसीडीईएक्स कमोडिटी एक्सचेंजची ग्रुप कंपनी असलेल्या संस्थेने यापूर्वी कर्नाटक सरकारसाठी मंडी आधुनिकीकरण योजना राबवली होती. त्याअंतर्गत राज्यातील सुमारे ६५ बाजार समित्या एकमेकांशी ऑनलाइन जोडून दिल्यामुळे तेथील शेतकऱ्यांना स्पर्धात्मक बाजारपेठ उपलब्ध झाली होती. आता या नवीन ॲपद्वारे पशुपालक शेतकऱ्यांना एक नवी संधी मिळाली आहे.

Goat Farming
Goat Farming : शेतकरी नियोजन - शेळीपालन

पशुपालन विक्रेते आणि खरेदीदार या दोघांनाही या मंचावर नोंदणी (रजिस्ट्रेशन) करावी लागेल. त्यानंतर विक्रेत्यांना प्रत्येक पशुसाठी एक क्यू.आर. कोड दिला जाईल. त्याद्वारे खरेदीदारांना त्या प्राण्याची संपूर्ण माहिती उपलब्ध होऊन सौदा प्रक्रिया सुलभ होईल. खरेदीदारांनी लावलेल्या बोली प्रत्येक पशुसाठी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने एकत्रित करून सर्वात स्पर्धात्मक बोली निवडली जाईल. त्यानंतरची आर्थिक आणि डिलिव्हरी प्रक्रिया दोन-तीन दिवसांत पार पडेल. या प्रक्रियेमध्ये खरेदीदार आणि विक्रेते यांना काही अनामत रक्कम द्यावी लागणार असल्यामुळे दोघांपैकी कुणाचीही फसवणूक केली जाण्याची शक्यता राहणार नाही.

पहिल्याच दिवशी लिशियस या प्रसिद्ध ऑनलाइन मांस-मच्छी विक्रेत्या कंपनीने एका शेतकऱ्यांकडून १३ मेंढ्या ऑनलाइन खरेदी करून थेट बँक खात्यात पैसे पाठवले असल्याचे कंपनीने म्हटले आहे. एवढेच नव्हे तर यापुढील काळात लिशियस मोठ्या प्रमाणात या ॲपचा वापर करणार असल्याचे देखील कंपनीने जाहीर केले आहे.

या ॲपमुळे आजवर केवळ खेड्यापाड्यांमधील जत्रा किंवा मेळावे आणि स्थानिक पशुबाजारांमधून नगण्य किंमतीमध्ये प्राणी विकत घेऊन ते कत्तलखाने, निर्यातदार आणि देशांतर्गत व्यापारी कंपन्यांना मोठ्या रकमेमध्ये विकणाऱ्या मध्यस्थांच्या मोठ्या साखळीला शह बसण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यापुढील काळात अश्या ऑनलाइन मंचांचा प्रसार इतर राज्यांमध्ये देखील होईल. आणि त्यामधून कृषिमाल क्षेत्रात ऑनलाइन क्रांतीमुळे झालेले चांगले बदल पशुधनक्षेत्रात देखील पाहायला मिळतील. ग्रामीण अर्थव्यवस्थेला ते पूरक ठरेल.

देशातील पशुधन व्यवसायाचा आवाका खूप मोठा आहे. सध्या देशामध्ये सुमारे ५५ कोटी एवढी पशुसंख्या असून, केवळ मेंढ्यांची संख्या ८-१० कोटी एवढी मोठी आहे. तसेच बकऱ्यांची संख्या देखील १५ कोटींच्या आसपास आहे. पशुधनामध्ये कर्नाटकचा क्रमांक दहावा लागतो. तसेच देशात एकूणच शेळी, मेंढी आणि बकरी पालनाचा व्यवसाय सतत वाढत आहे. तसेच भारतातून मांस-मच्छी निर्यात सतत वाढताना दिसत आहे. शेतकऱ्यांना शेतीतून येणारी मिळकत बेभरवशाची झालेली असताना पशुपालन व्यवसाय जोडधंदा म्हणून यशस्वी होताना दिसत आहे. या पार्श्‍वभूमीवर ऑनलाइन खरेदी-विक्रीची सेवा देणाऱ्या या ॲपचे महत्त्व लक्षात येईल.

इलेक्ट्रॉनिक व्यापाराचे फायदे

शेतीमाल किंवा पोल्ट्री आणि पशुधन बाजार या दोहोंच्या बाबतीत पारंपरिक हजर बाजारांची व्यवस्था कशी काम करते, ते आपण उघड्या डोळ्याने बघत आहोत. या बाजारव्यवस्थेवर असलेले आडत्यांचे-मध्यस्थांचे वर्चस्व, तेथील अकार्यक्षम व्यापार प्रक्रिया आणि आर्थिक व्यवहार जोखीम, त्यातून उत्पादक आणि ग्राहक या दोघांचे होणारे शोषण हे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे देशातील बाजार समित्या. मूठभर परंतु संघटित खरेदीदार व्यापारी आणि हजारो- तेसुद्धा विखुरलेले- उत्पादक विक्रेते यामुळे स्पर्धात्मक बाजारपेठ उभी राहण्यास आडकाठी होते.

प्रचलित व्यवस्थेतील दोष सुधारण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा परिणामकारक उपयोग होऊ शकतो. इलेक्ट्रॉनिक लिलाव किंवा व्यापार पद्धतीमध्ये देशपातळीवरील सर्व खरेदीदारांना लिलावात भाग घेण्याची संधी उपलब्ध होते. त्यामुळे उत्पादकांचा माल घेण्यासाठी खरेदीदार व्यापाऱ्यांमध्ये स्पर्धा होऊन त्यातून शेतकऱ्याला किंवा विक्रेत्याला चांगला भाव मिळतो. यातून एनसीडीईएक्स ई-मार्केट्स लिमिटेड (NeML) या कंपनीचा जन्म झाला. या कंपनीने मागील दहा-बारा वर्षांत ऑनलाईन व्यापार तंत्रज्ञानाचा वापर करून नाशवंत कृषिमाल, दुग्ध व्यवसाय, अन्नधान्य, सरकारी अन्नधान्य आणि इतर कृषिमाल लिलाव या क्षेत्रात विस्तार केला आहे.

तर याच तत्त्वावर ई-नाम किंवा इलेक्ट्रॉनिक राष्ट्रीय कृषी बाजार ही संकल्पना पुढे येऊन आज त्याचादेखील मोठा विस्तार होत आहे. या यशामुळे आज देशात शेकडो ऑनलाइन व्यापारी मंच निर्माण झाले आहेत आणि त्याहून जास्त पुढील काळात निर्माण होणार आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com